Skip to main content

वसुधैव कुटुंबकम

च - एक abused वचन

लेखक साहना यांनी शुक्रवार, 18/03/2016 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
"वसुधैव कुटुंबकम" म्हणजे भारतीय संस्कृती असे सतत वाचनात येते. पंतप्रधान मोदींनी सुद्धा ह्या वचनाचा प्रयोग केला आहे आणि आम्ही सर्व जणांना ह्या वचनाचा अर्थ ठावूक आहे. जगतीकरण होण्याच्या शेकडो वर्षें आधी आमच्या पूर्वजांनी अस दृष्टीकोन ठेवला होता म्हणून आमची छाती गर्वाने फुगायला पाहिजे असे आमच्या मास्तरांनी शाळेंत सांगितलेले आठवते. (सादर मास्तर आर्यभट्टला सापेक्षता वादाचा सिद्धांत आधीपासून ठावूक होता कुणी विचारले असते तर त्याने सांगितले असते असे सुद्धा सांगत, असो). पचौरी साहेबांनी नोबेल पीस मिळवताना आपल्या भाषणात ह्या वाक्याचा प्रयोग केला.