"वसुधैव कुटुंबकम" म्हणजे भारतीय संस्कृती असे सतत वाचनात येते. पंतप्रधान मोदींनी सुद्धा ह्या वचनाचा प्रयोग केला आहे आणि आम्ही सर्व जणांना ह्या वचनाचा अर्थ ठावूक आहे. जगतीकरण होण्याच्या शेकडो वर्षें आधी आमच्या पूर्वजांनी अस दृष्टीकोन ठेवला होता म्हणून आमची छाती गर्वाने फुगायला पाहिजे असे आमच्या मास्तरांनी शाळेंत सांगितलेले आठवते. (सादर मास्तर आर्यभट्टला सापेक्षता वादाचा सिद्धांत आधीपासून ठावूक होता कुणी विचारले असते तर त्याने सांगितले असते असे सुद्धा सांगत, असो).
पचौरी साहेबांनी नोबेल पीस मिळवताना आपल्या भाषणात ह्या वाक्याचा प्रयोग केला. त्याशिवाय अनेक शाळा, कोलेज, आपला झी टीवी इत्यादींचा हा आधिकारिक मोटो आहे.
माझ्या मते ह्या वचना इतके Abused वचन आपल्याला सापडणार नाही. सदर वचन महा उपनिषदात सर्व प्रथम आले होते पण तेथे त्याचा context फारच वेगळा होता. हे वचन लोकप्रिय झाले ते हितोपदेशामुळे. कथा काही अशी आहे.
एका जंगलांत हरणांचा एक कळप निर्भय पणे राहत असतो. एक दिवस ह्या जंगलांत एक लांडगा येतो. कोणीही लांडग्याला आधी पहिले नसते म्हणून हा प्राणी नक्की काय आहे हे समजत नाही. लांडगा हरणाच्या प्रमुख कडे जावून त्यांच्या कळपांत आश्रय मागतो. प्रमुख बाराकायीने पाहून "तू आमच्या सारखा नसल्याने माझ्या बांधवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मी तुला अंत घेवू शकत नाही" असे सांगतो. तिथे उपस्थित असलेला एक बुद्धिमान कावळा त्याला दुजोरा देतो.
ह्यावेळी लांडगा "वसुधैव कुटुंबकम" ह्या वचनाची आठवण हरणाला करून देतो. तात्विक चर्चेत "जग म्हणजे एक परिवार" असून मला आंत न घेवून हरण पूर्वग्रह बाळगून वागत आहे असा आरोप लांडगा करतो. शेवटी हरणाला guilty वाटून हरण लांडग्याला कळपांत घेतो. शेवटी कावळा लांडग्याला एक हरणाला मारताना रंगे हाथ पकडून देतो.
कथेचे तात्पर्य आणि वचनाचा प्रयोग ह्या कथेंत पूर्ण रूपाने वेगळा असून आम्ही लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने हे वचन अंध पणे वापरत आहोत. अनेक सुवचने कितीही चांगली वाटली तरी तारतम्य बाळगूनच त्याचा प्रयोग करावा असे कदाचित कथेचे तात्पर्य असावे. किंवा तात्विक चर्चेत अडकताना "what is at stake" हे पाहणे, आपल्या मुलभूत समजुतीची शहनिशा करणे इत्यादी करायला पाहिजे हे कदाचित ह्या कथेचे तात्पर्य असावे.
पचौरी साहेबांनी ह्या वाचनाचा प्रयोग नोबेल घेताना जगासमोर केला. सध्या ह्या पचोरी साहेबांवर गंभीर लैगिक अत्याचाराचा आरोप[१] आहे त्याशिवाय हे आकडे दाखवून त्यांनी नोबेल घेतले त्या आकड्यां वरच प्रचंड मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.[२] फक्त पचौरी साहेबांनीच ह्या वचनाचा मूळ स्वरूपांत प्रयोग करून लोणी खाल्ले आहे.
मागील लेखांत मी गांजा, भारतीय संस्कृती, जगातील इतर प्राचीन धर्म ह्याचा संबंध विशद केला होता. "जग म्हणजे एक परिवार" हि संकल्पना तशीच वैश्विक असून इतर अनेक संस्कृतीत अशी विचारधारा आढळते. ४५० ख्रिपु मध्ये एका पाश्चात्य विचारवंताने Cosmopolite शब्द सर्वप्रथम वापरला त्याचा अर्थ "मी ह्या सर्व जगाचा नागरिक आहे" असा होतो. कोलंबस जेंव्हा प्रथम अमेरिकेत आला तेंव्हा मूळ निवासी लोकांनी त्याला इतक्या वायीट दृष्टी कोनाने पहिले नव्हते त्यांचे विश्वास घात करून मूळ निवासी लोकांची कत्तल घडवली.[३]
आज युरोप मधील लिबरल लोक जेंव्हा सिरीया मधील लक्षावधी लोकांना आपल्या देशांत आश्रय देणे आपली नैतिक जबाबदारी मानतात त्याचे मूळ सुद्धा सर्व जगाला आपला परिवार मानण्याचे आहे. पण हितोपदेश मधील त्या विद्वान कावळ्या प्रमाणे त्यांनी आपली अक्कल वापरली आहे कि नाही ते काळच ठरवेल.
अन-रिलेटेड:
आपल्या घराच्या बाहेर आपल्याला वाघ दिसला तर आपण काय कराल ? तत्काळ दारे खिडक्या बंद करून पोलिस इत्यादींना फोन कराल. कारण वाघ माणसाना मारून खातो असा आपला पूर्वग्रह आहे. बाहेर जावून तो खराच वाघ आहे कि नाही, त्याचा उद्धेश तुम्हाला मारून खायचा आहे कि नाही ह्याची खातरजमा वगैरे करून नंतर पोलिसांना फोन करण्याच्या भानगडींत एखादा मूर्खच पडेल.
वर्गीकरण
वाचन संख्या
1695
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतीय संस्कृती
कोकणरेल्वेत एक विक्रेता येतो
मला अर्थ समजाला नाही !
In reply to कोकणरेल्वेत एक विक्रेता येतो by कंजूस
खरं सांगू?
Malahi nehami hech prashna