Skip to main content

विमा

इनश्युरन्सचा हप्ता कसा चुकतो ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 19/06/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नेमेची येतो पावसाळा तसे आम्ही विमा पॉलीस्या काढतो, आता एकदम मुद्यावर उडी मारतो, आधीच्या पिढ्यांचा विम्याचे हप्ते चुकण्याचा अनुभव पाहून, मी अगदी पहिली विमा पॉलीसी उतरवताना पासून; हप्ते वेळेवर न भरल्याने पॉलीसी बंद पडेल एवढा विमा न काढणे तसेच प्रिमीअम भरण्याच्या तारखेच्या आधीच्या तारखेला संपेल असे फिक्स डिपॉझीट आणि इतर गुंतवणूकीच्या व्यवस्थाही करण्याची दक्षता घेतली; तरीही विम्याच्या हप्त्याच्या तारखा चुकल्यावाचून राहील्या नाहीत. असे का होते ? तुमचेही विम्याचे हप्ते कधी चुकले आहेत का ? आणि ज्यांचा हप्ता आजतागायत एकदाही चुकला नसेल ती मंडळी त्यांचे आर्थीक व्यवस्थापन कसे करतात ?