Skip to main content

तंत्र

दूरवरची स्पष्ट प्रतिमा

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 09/01/2026 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
दूरवरची स्पष्ट प्रतिमा दाखवणार्‍या दुर्बीण किंवा बायनॉक्लर्स, बायनॉक्युलर्स Binoculars चर्चेसाठी हा धागा काढत आहे. माझ्याकडे एक ऑलिंपस १०x५० आहे पण ती पडल्यामुळे जरा फोकस बिघडला आहे. म्हणजे दोन चित्रे दिसतात. कॉलिमेशम गेले आहे. एका डोळ्याने मात्र सुंदर स्पष्ट चित्र दिसते. चंद्र अप्रतिम दिसतो. गुरूचे चार चंद्र ही दिसतात. या शिवाय एक १२x५० ची जुनी झेनिथ आहे जपानी बनावटीची. पण त्यात प्रतिमेला हलक्याश्या सप्तरंगी कडा येतात. त्यामुळे ती जास्त चांगली असूनही अवकाश दर्शनासाठी फार वापरात येत नाही. आणि याशिवायही एक निकॉन ची ट्रॅव्हललाईट आहे. ही मी सदैव वापरतो.

मार्गदर्शन हवंय! मिनिएचर्स बद्दल!

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 24/04/2017 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंजु यांच्या धाग्यावर मी माझ्या व्हिज्युअल स्पेशिअल सेन्स बद्दल उल्लेख केला आहे.निसर्गाच्या या थोड्याशा वरदानामुळे लहानपणापासून एक छंद सोबतीला आहे. मिनिएचर्सचा!

मराठी संस्थळावर प्रकाशीत करण्यासाठी मुलाखत कशी घ्यावी ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/11/2015 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळच्या मिपा दिवाळी अंकात तीन मुलाखती आल्या त्या आधीही काही मुलाखती प्रसिद्ध झाल्याचे पाहिले. व्यक्तिशः या मुलाखती आवडल्याच त्या शिवाय मराठी संस्थळे आणि दिवाळी अंकांसाठी मुलाखत हा प्रकार जमेची बाजू होऊ शकेल असे वाटले. मराठी भाषेत व्यक्ती आणि प्रसंगांच्या व्यवस्थीत नोंदीं घेतल्या जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे विकिपीडियासारख्या ज्ञानकोशीय माध्यमात मूळ स्रोतातील माहितीची सातत्याने कमतरता जाणवत राहते. आडात नसेल तर पोहोर्‍यात कुठून येणार अशी गत असते.