Skip to main content

शुध्दलेखन

मिपावर मुक्त लेखन विभाग सुरु करण्या विषयी.

Published on 06/06/2019 - 11:38 प्रकाशित
मिपावर मुक्त लेखन विभाग सुरु करण्या विषयी. सदस्य म्हणून मी इथे नवीन असलो तरी गेल्या कित्येक वर्षांपासून मिपाचा नियमित वाचक आहे. खूप चांगले लेख, कथा, कविता, चर्चा इथे वाचायला मिळाल्या आहेत. मिसळपाव, मनोगत, मायबोली, ऐसी अशा कित्येक मराठी संस्थळांवर वावर असला तरी बहुरंगी-बहुढंगी व दर्जेदार लेखनाचे प्रमाण आणि सातत्य मिपावर जास्त असल्याचे माझे निरीक्षण आहे. सध्या काही नवोदित लेखकांच्या धाग्यांवरील प्रतिसादांमधे शुद्धलेखन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कंपूबाजी, टिंगल टवाळी अशा विषयांवर साधक बाधक चर्चा वाचनात आली.

याद्या 14433