मिपावर मुक्त लेखन विभाग सुरु करण्या विषयी.
सदस्य म्हणून मी इथे नवीन असलो तरी गेल्या कित्येक वर्षांपासून मिपाचा नियमित वाचक आहे. खूप चांगले लेख, कथा, कविता, चर्चा इथे वाचायला मिळाल्या आहेत. मिसळपाव, मनोगत, मायबोली, ऐसी अशा कित्येक मराठी संस्थळांवर वावर असला तरी बहुरंगी-बहुढंगी व दर्जेदार लेखनाचे प्रमाण आणि सातत्य मिपावर जास्त असल्याचे माझे निरीक्षण आहे.
सध्या काही नवोदित लेखकांच्या धाग्यांवरील प्रतिसादांमधे शुद्धलेखन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कंपूबाजी, टिंगल टवाळी अशा विषयांवर साधक बाधक चर्चा वाचनात आली. आज माहितगार साहेब आणि आनन्दा साहेबांचे दोन प्रतिसाद वाचले आणि काही बाबी नव्याने लक्षात आल्या.
आपले विचार लेखनातून,प्रतिसादातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला नक्कीच आहे मग तो प्रस्थापित लेखक,वाचक असो कि नवोदित. प्रतिसादात किंगल टवाळी, हिणकस शेरेबाजी, व्यक्तिगत टीका झाली तर उदयोन्मुख लेखक,लेखिकांच्या मनोधैर्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. काही प्रसंगी हा अपराध माझ्याकडूनही घडला आहे. अशा प्रकारांमुळे लेखनातला आशय आणि विषय बाजूला पडून सदर लेखक,लेखिका संस्थळापासून किंवा लेखनापासून कायमचा दुरावण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला पुरेशा गांभीर्याने न केलेले लेखन, प्रमाणाबाहेर असलेल्या शुद्धलेखनातील चुका, चुकीच्या शब्दयोजना आणी फेसबुक whatsapp वरील मजकुर कॉपी पेस्ट करून काढलेले धागे वाचकांचा रसभंग करताना मिपाच्या दर्जालाही घातक ठरतात.
या गोष्टी टाळण्यासाठी मिपा प्रशासनास विनंती करू इच्छितो कि इथे लेख, कविता, तंत्रजगत, कलादालन प्रमाणे मुक्त लेखन असा विभाग सुरु करावा. त्याचा आराखडा असा असावा.
मुक्त लेखन
- नवोदितांनी आपले लेखन थेट साहित्य प्रकारात प्रकाशित न करता आधी या विभागात करावे.
- हा विभाग वाचनमात्र असावा
- शक्य असल्यास प्रतिसाद द्या ऐवजी व्यक्तिगत संदेश पाठवा असा पर्याय उपलब्ध असावा.
- वाचकांनी आपल्याला अपेक्षित सुधारणा, दुरुस्त्या लेखकाला व्यक्तिगत संदेशाच्या माध्यमातून कळवाव्या.
- लेखकाने सुचवण्यात आलेल्या सुधारणांचा विचार करून आवश्यक असल्यास योग्य ते बदल करून मग लेखन उचित साहित्य प्रकारात प्रकाशित करावे.
- सुधारित लेखन प्रकाशित केल्यावर संपादक मंडळास विनंती करून मुक्त लेखन विभागातून आधीचे लेखन काढून टाकण्यास कळवावे.
वर्गीकरण
मिसळपाव
जाता जाता - मुक्त लेखन साठी
In reply to जाता जाता - मुक्त लेखन साठी by हस्तर
शब्द चांगला आहे.
मुक्त लेखन असा विभाग सुरु करावा.
In reply to मुक्त लेखन असा विभाग सुरु करावा. by धर्मराजमुटके
एवढा पण नको
In reply to मुक्त लेखन असा विभाग सुरु करावा. by धर्मराजमुटके
तसच काहीसं.
मुक्तपीठ नुसतं नावच पुरेसं आहे.
In reply to मुक्तपीठ नुसतं नावच पुरेसं आहे. by जॉनविक्क
लुना वाले ब्रम्हे ईथे पण?
In reply to लुना वाले ब्रम्हे ईथे पण? by नावातकायआहे
लुना वाले ब्रम्हे ईथे पण
In reply to लुना वाले ब्रम्हे ईथे पण? by नावातकायआहे
"लुना वाले ब्रम्हे" हे काय प्रकरण आहे?
In reply to "लुना वाले ब्रम्हे" हे काय प्रकरण आहे? by गड्डा झब्बू
http://michkashala.blogspot
In reply to http://michkashala.blogspot by आनन्दा
=))
In reply to http://michkashala.blogspot by आनन्दा
हा हा हा जबरी आहेत कि हे ब्रम्हे आजोबा.
१. नवोदितांनी आपले लेखन थेट
In reply to १. नवोदितांनी आपले लेखन थेट by चौथा कोनाडा
+101
In reply to १. नवोदितांनी आपले लेखन थेट by चौथा कोनाडा
मला हे नाही पटत. असं करणं
In reply to मला हे नाही पटत. असं करणं by इरामयी
(उच्च दर्जाचे लेखकु) आणि इतर (तुच्छ नवोदीत!) अशी विभागणी होऊ
चौ. को यांच्याशी सहमत
यापेक्षा लगेच लेखनाची घाई ना करता, काही काळ वाचनमात्र राहून जे लिहीन ते शुध्द, सुसंबद्ध, सखोल, तर्कशीर, दर्जेदार लिहीन हे ठरवल्यास आहे त्या सेटअप मध्ये लेखन करता येईलच की !/code> +१ कसं आहे की, मीही मिपावर नवीनच आहे. टंकताना माझ्याकडूनही चुका होतात. झाल्या आहेत. पण त्या नकळत घडल्या व वाचकांनाही ते कळते. त्यामुळेच कोणी त्याचा बाऊ करत नाही. पण काही जण शुद्धलेखनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, सांगूनसुद्धा अशुद्ध लिहीत आहेत याला कोडगेपणा म्हणतात. आपल्या अशुद्ध लिहीण्याचा दुसर्याला होणारा त्रास पाहून या लोकांना विकृत आनंद होत असावा. अशा विकृत प्रवृत्तीचे समर्थन कसे केले जाऊ शकते? कारण शुद्ध लिहीले नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मी इथे मुद्दाम अशुद्ध लिहून प्रतिसाद दिला आहे. आणि शेवटी असे धागे यापुढे न वाचण्याचा पर्याय वाचकांसमोर आहेच. त्यापेक्षा सं.मं.ने जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने काढलेले धागे ओळखून वेळीच उडवून टाकावेत किंवा वाचनमात्र करावेतIn reply to चौ. को यांच्याशी सहमत by श्वेता२४
त्यापेक्षा सं.मं.ने
In reply to त्यापेक्षा सं.मं.ने by टवाळ कार्टा
अजून एक लैच अपेक्षा
In reply to चौ. को यांच्याशी सहमत by श्वेता२४
पण काही जण शुद्धलेखनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत
लेखाशी सहमत
माझी वाईट सवय ..
In reply to माझी वाईट सवय .. by चौकटराजा
काही गोष्टी समजुन घ्यायला फार
In reply to काही गोष्टी समजुन घ्यायला फार by आनन्दा
विराम चिन्हाबाबत पूर्ण सहमत.
In reply to विराम चिन्हाबाबत पूर्ण सहमत. by चौकटराजा
दुरुस्ती ..
In reply to माझी वाईट सवय .. by चौकटराजा
>>>मी लेखन केल्यावर ते
प्रतिसाद बदलण्यासाठी अगदी
In reply to प्रतिसाद बदलण्यासाठी अगदी by कंजूस
या विभागातले धागे वाचनमात्र असावेत
In reply to प्रतिसाद बदलण्यासाठी अगदी by कंजूस
नव्हे
In reply to नव्हे by चौकटराजा
काही तास कमी पडतील
ते मोकलाया चे क्रांतिकारक कवी
In reply to ते मोकलाया चे क्रांतिकारक कवी by भीमराव
मिपाच्या इतिहासातील सोनेरी पान आहे ते