मिपावरच्या धाग्यांसाठी रेटींग असावं का?
सर्वप्रथम सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा!
मिपावर रोज बरेचसे धागे काढले जातात.काही वाचनीय असतात तर काही धागे स्कोअर सेटलिंगसाठी,सहज काही वाटलं म्हणूनही काढले जातात.यामुळे होतं काय की चांगला वाचनीय धागा कुठेतरी तळाशी जातो.किंवा असा वाचनीय नसलेला धागा वाचनीय नाही हे सांगण्यासाठी म्हणून प्रतिसाद दिले जातात आणि स्कोअर वाढतो.मग कोणीतरी एवढे प्रतिसाद? म्हणून उत्सुकतेने धागा उघडतं आणि पदरी निराशा पडते. मग 'पूर्वीसारखं मिपा राहिलं नाही आता' हे पालुपद सुरु होतं.
हे सगळं टाळण्यासाठी मिपावरच्या धाग्यांसाठी रेटींगची किंवा लाईक/डिसलाईकचं टूल उपलब्ध करुन दिलं जावं का?
मिसळपाव