मिपावरच्या धाग्यांसाठी रेटींग असावं का?
सर्वप्रथम सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा!
मिपावर रोज बरेचसे धागे काढले जातात.काही वाचनीय असतात तर काही धागे स्कोअर सेटलिंगसाठी,सहज काही वाटलं म्हणूनही काढले जातात.यामुळे होतं काय की चांगला वाचनीय धागा कुठेतरी तळाशी जातो.किंवा असा वाचनीय नसलेला धागा वाचनीय नाही हे सांगण्यासाठी म्हणून प्रतिसाद दिले जातात आणि स्कोअर वाढतो.मग कोणीतरी एवढे प्रतिसाद? म्हणून उत्सुकतेने धागा उघडतं आणि पदरी निराशा पडते. मग 'पूर्वीसारखं मिपा राहिलं नाही आता' हे पालुपद सुरु होतं.
हे सगळं टाळण्यासाठी मिपावरच्या धाग्यांसाठी रेटींगची किंवा लाईक/डिसलाईकचं टूल उपलब्ध करुन दिलं जावं का? उत्तम,चांगला,बरा,बिनमहत्वाचा अशी श्रेणी दिली जावी का? भटकंती, तंत्रविषयक, पाककला आणि कला प्रकारातल्या धाग्यांसाठी याची गरज नाही पण चर्चा,काथ्याकूट,जे न देखे रवी,जनातलं-मनातलं या प्रकारच्या धाग्यांसाठी हे का असू नये?
हे करायचं ठरवलं तर ते कशा प्रकारे करावं? म्हणजे आवडला/नाही आवडला या सुविधेसोबतच रेटींगचीही सोय असावी की दोन्हीपैकी एकच सोय असावी?
रेटींग द्यायचं ठरलंच तर ते कोणी द्यावं? सरसकट सर्वांनाच हा अधिकार असावा? की मिपाने त्यासाठी चांगली टीम निवडून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी? कारण WhatsApp वरुन gm/gn , J1 झालं का? याच्या पलिकडे न लिहिणारा माणूस मिपाचा सदस्य असू शकतो.
जी टीम बनवली जाईल त्यातील सदस्यही बायस्ड नसणं गरजेचं आहे.अन्यथा 'मागचे उट्टे काढण्यासाठी,सूड उगवण्यासाठी' आयतं हत्यार मिळायला नको.
ज्यांच्या धाग्याला बरा किंवा अगदी बिनमहत्वाचा असं रेटींग मिळेल त्यांनी निराश होण्याचं कारण नाही.पुढील धाग्यासाठी सुधारणा काय कराव्यात याच्या मार्गदर्शक सूचनाही त्याच 'बर्या किंवा बिनमहत्वाच्या' धाग्यावर दिल्या जाव्यात.जेणेकरुन पुढील धागा वाचनीय व्हावा.
काय वाटतं मिपाकरांना?
वर्गीकरण
वाचने
6228
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
आहे ते चांगले आहे. उगाच
याहीपेक्षाअजून एक आयडिया
नाही. रेटिंग नको. पण विषयानुरूप वर्गीकरण हवे.
अजिबात नको
In reply to अजिबात नको by गॅरी ट्रुमन
१०० % सहमत गॅटरू !
In reply to अजिबात नको by गॅरी ट्रुमन
पर्फेक्ट.. हेच म्हणायचे होते.
रास्त शन्का!
In reply to रास्त शन्का! by mayu4u
श्रेणीमुळे
मिपाचे ऐसी मध्ये रूपांतर
आभार!
अजिबात नको!
एखादा "तुंबलेला" कुठेतरी
नको.
ग्यारी ट्रुमन यांच्याशी सहमत
नाही.
>>>काही धागे स्कोअर
मिपा वरील लेख आणि
मुळात हा धागा आणि ही चर्चा
In reply to मुळात हा धागा आणि ही चर्चा by बोका-ए-आझम
वजा एक
रेटिंग नसावे
रेटींग/लाईक/ डीसलाईक हे
फोटू टाकन्या साठी कायतरी
कल्पना चांगली आहे पण
In reply to कल्पना चांगली आहे पण by स्थितप्रज्ञ
वा!
मिपावर like बटन असायला हवे आहे.
हाय ते बरं हाय...
हत्तीला ज्या नजरेने पाहाल तसा
मिपाचे सध्याचे मालक
लेखकांनी (आमच्यासारख्या