Skip to main content

संस्कृति

महाराज, बुवा, स्वामी इत्यादि

लेखक शरद यांनी सोमवार, 07/11/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
महाराज, बुवा, स्वामी इत्यादी मी लहानपणापासून विद्यार्थीच राहिलो.जिथे जिथे जी जी माहिती मिळाली ती ती गोळा करत राहिलो. विज्ञान, साहित्य, धर्म,संगीत.चित्रकला, फ़ोटोग्राफ़ी सर्वात मांजरीच्या पिल्लाप्रमाणॆ ,कुतुहलाने डोकावत राहिलो. जमा काय झाले ते सोडून देऊ, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मार्कंडॆय़ाएवढे आयुष्य मिळाले तरी आपणाला माहित नाही असे बरेच काही राहून जाणार आहे. थोडक्यात,’ ही गोष्ट शक्य नाही, सगळे बुवा भोंदू असतात, हे असेच असते’ अशा प्रकारची विधाने करणे चूक आहे एवढे नक्की पटले. माझ्यापुरते उपनिषदातील पुढील विधान स्विकारणीय आहे. " जो कळले म्हणतो त्याला कळलेले नसते ..........