Skip to main content

संगीत चर्चा

आत्म्याला झंकारुन टाकणारी गाणी

लेखक सागर यांनी सोमवार, 05/06/2017 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजीत ज्याला Soul Touching Songs म्हणतात. मराठीत आपण त्याला आत्म्याला झंकारुन टाकणारी गाणी म्हणूयात. तर तुम्हाला खूपच आवडलेली व अगदी आत्म्याला वा मनाला खूपच टच करणारी तुमच्या आवडीची गाणी येथे शेअर करावीत यासाठी ही पोस्ट. मी सुरुवात करतो: अलिकडेच मी मिले हो तुम हमको बड़े नसीबों से हे नेहा कक्कर ने गायलेले गाणे ऐकले आणि हे गाणे मला खूप आवडले. सुरुवात अशी झाली की माझ्या एका नातेवाईकाने सारेगमा शो मध्ये सत्यजित जेना या मुलाने अप्रतिमपणे गायलेले मिले हो तुम हमको हे गाणे ऐकले. ते मला खूपच आवडले. त्यामुळे वरिजनल ऐकू म्हणून तुनळीवर शोधले.

भारतीय चित्रपटांतील रागांवर आधारित/प्रेरित्/इतर भाषिक संगितातून ढापलेली गाणी

लेखक तुषार काळभोर यांनी गुरुवार, 26/01/2017 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
...तर, प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या पूर्वदिनी खरडफळ्यावर रागांवर आधारित गाणी/एकसारखी वाटणारी गाणी/पाश्चात्य संगीतावरून ढापलेली गाणी इत्यादी चर्चा चालू होती. माझ्या माहितीतील काही ढापलेली प्रेरित गाणी इथे देतोय. (अर्थात पुर्ण गाण्याचं संगीत तसंच्या तसं नाहिये, कधी कधी स्वत:चं पण थोडं इम्प्रोवायजेशन केलेलं आहे संगीतकारांनी!) मिपाकरांनी प्रतिसादात अशी काही गाणी देऊन परस्परज्ञानसंवर्धन करावे, ही ण्रम इनंती!