भारतीय चित्रपटांतील रागांवर आधारित/प्रेरित्/इतर भाषिक संगितातून ढापलेली गाणी
...तर, प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या पूर्वदिनी खरडफळ्यावर रागांवर आधारित गाणी/एकसारखी वाटणारी गाणी/पाश्चात्य संगीतावरून ढापलेली गाणी इत्यादी चर्चा चालू होती.
माझ्या माहितीतील काही ढापलेली प्रेरित गाणी इथे देतोय. (अर्थात पुर्ण गाण्याचं संगीत तसंच्या तसं नाहिये, कधी कधी स्वत:चं पण थोडं इम्प्रोवायजेशन केलेलं आहे संगीतकारांनी!) मिपाकरांनी प्रतिसादात अशी काही गाणी देऊन परस्परज्ञानसंवर्धन करावे, ही ण्रम इनंती! :)
तसेच रागांवर आधारित सारखी वाटाणारी गाणीसुद्धा टाकवीत.
(मुद्दाम गाणी एम्बेड करत नाहिये, पान जड होऊ नये म्हणून)
१) हिंदी : संगीतकार - सलील चौधरी, चित्रपट- छाया, गाणे = इतना न मुझसे तू प्यार बढा
आधारितः मोझार्टची ४० क्रमांकाची सिम्फनी
२) स्वतंत्र विभाग : राजेश रोशन
अ) हिंदी : चित्रपट : क्रिश, गाणे : दिल ना दिया (हृतिक व प्रियांकाचं सर्कसमधलं गाणं)
आधारित : तुर्कीचं सैनिकी गीत (!!!!!!!)
आ) हिंदी : चित्रपट : लावारिस, गाणे : तुमने जो कहा
आधारित : अॅम अ बार्बी गर्ल (अॅक्वा)
इ) हिंदी : चित्रपट : जुर्म, गाणे = जब कोई बात बिगड जाये
आधारित : Five Hundred Miles
ई) हिंदी : चित्रपट : करण अर्जुन, गाणे = जय काली
आधारित : इट्स ऑल राईट (ईस्ट १७)
ए) हिंदी : चित्रपट - आरजू, गाणे = हसीना गोरी गोरी (ही चोरी नाहिये, दरोडा आहे !!)
आधारित - इन द समरटाईम (शॅगी)
ऐ) हिंदी :चित्रपट- बातों बातों में, गाणे = न बोले तुम न मैने कुछ कहा
आधारितः When Johnny Comes Marching Home Hurrah! (देवा, उठाले रे !! अमेरिकन गृह युद्धाचं गीत!!! )
राजेश रोशनची आणखी पण असतील, मला शोधयचा कंटाळा आलाय.
३) स्वतंत्र विभागः दि अन्नु मलिक
अ) हिंदी : चित्रपट -औजार , गाणे - दिल ले ले लेना
आधारितः (भौतेक स्पॅनिश) माकारेना
आ) हिंदी: चित्रपट - ढाल, गाणे = दिल माका दिना (अरे देवा, मेरे को परत उठाले रे!!!!)
आधारितः (भौतेक स्पॅनिश) माकारेना
इ) हिंदी : चित्रपट- बाजी (आशुतोष गोवारीकरचा), गाणे - डोले डोले दिल डोले (आमिर मुलगी म्हणून पण क्यूट दिसला होता!!)
आधारित : Come September
अवांतर : या गाण्याची परत कॉपी नदीम श्रवण ने माधुरीच्या राजा पिच्चरमध्ये केली; नजरे मिली दिल धडका
ई) हिंदी : चित्रपट-अकेले हम अकेले तुम, गाणे= ऐसा जख्म दिया है (यातला मधला स्लो पार्ट)
आधारित : स्वीट चाईल्ड इन टाईम
ए) हिंदी : चित्रपट-अकेले हम अकेले तुम, गाणे= बट यू लव मी डॅडी
आधारित : बट यू लव मी डॅडी
ऐ ) हिंदी : चित्रपट- सर , गाणे - सुन सुन सुन बरसात की धून (शब्दशः शब्दांसहित उचलेलंय!)
आधारित : Listen To The Sound Of The Rain (Jose Feliciano)
ओ ) हिंदी : चित्रपट - मर्डर (मल्लिका यारों!!) गाणे = कहो ना कहो
आधारित : अम्र दियाब चं तमल्लि मआक
(ही बहुतेक अधिकृत कॉपी असावी)
अन्नू मलिक प्रेरित संगितकारांचा बेताज बादशाह आहे, त्याची निम्मी गाणी तरी प्रेरित असतील.
४) क्रिमिनल : तुम मिले (हे गाणं अफाट रोमँटिक आहे, लै फेवरीट!!) याचा सुरुवातीचा भाग एनिग्मा - एज ऑफ लोनलीनेस
५) मेजरसाब या दरिद्री पिच्चरमधलं हे गाणं = हिंमत कभी ना तोडेंगे
ओरिजिनल : अमेरिकन (! ) सैन्याचं मार्चिंग साँग
६) चित्रपट : मैने प्यार किया, गाणे : मेरे रंग में रंगने वाली (गाणं अफाट सुंदर अन् रोमॅण्टिक आहे, पण म्युजिकचा पार्ट उचललाय)
द फायनल काउंटडाऊन
७) चित्रपट : मैने प्यार किया, गाणे= आते जाते (टायटल साँग - हम आपके है कौन च्या टायटल साँग सारखंच अतिशय आवडतं)
आधारित : I Just Called To Say I Love You (Stevie Wonder)
८) चित्रपटः आरपार , गाणे = बाबूजी धीरे चलना... (संगीतकार - ओ पी नय्यर)
आधारित : Perhaps Perhaps Perhaps
९) प्रितम (आदरणीय अन्नू मलिकजींचे शिष्य) : गँगस्टर , गाणे = तु ही मेरी शब है
आधारित : ऑलिवर शांती -निर्वाणा
१०) परत!!! प्रितम (आदरणीय अन्नू मलिकजींचे शिष्य) : गँगस्टर , गाणे = या अली
आधारित : या घाली (गिटारा)
इतरः
ब्लफमास्टर (अभिषेकचा) - बोरो बोरो (नेमका या पिच्चरच्या रिलीजच्या आधी कॉलेजच्या एक मित्राने 'भोसले शिंदे आर्केड' मधून एक सोनी पी९०० घेतलेला. त्यात आधीपासून बोरो बोरोचं ओरिजिनल होतं- अशरचं). (हे पण अधिकृत असावं, कारण ब्लफमास्टरच्या गाण्यात अरशसुद्धा आहे.
आधारितः अरश - बोरो बोरो
अवांतर : अरशचं अनीला मिर्जा बरोबर एक गाणं आहे, चोरी चोरी
हे नव्वदीतल्या एका कॅनेडियन गाण्याचं रुपांतर आहे. स्नो - इन्फॉर्मर
.
.
..
.
.
.
.
असो....
अजून चिक्कार आहेत. मला लै कट्टाळा आलाय.... आता तुमच्या कडनं येउंद्या. अन् मराठीत पण काय असंल तर ते पन टाका.
एखाद्या गाण्याला रागाचा संदर्भ असंल तर ते पन टाका.
याद्या
8384
प्रतिक्रिया
31
वर्गीकरण
मिसळपाव
भारीच!
अरे यार!
अरेरे अनेक आवडती गाणी आहेत या
मस्तच.
कम सप्टेंबर- कॉपीमास्टरांची आवडती ट्यून
रॉबिनहूड अंडरवेअर बनियनची जाहिरातसुद्धा
In reply to कम सप्टेंबर- कॉपीमास्टरांची आवडती ट्यून by नितिन थत्ते
अवधूत गुप्तेचा दळभद्री अल्बम
हल्ली हल्लीतले एक अत्यंत आवडते
In reply to अवधूत गुप्तेचा दळभद्री अल्बम by फेदरवेट साहेब
तुम्ही फार मेहनत घेतलीत!http:
प्रेरीतढापलेल्या गाण्यांना समर्पित आहे. तिथल्या माहितीच्या आधारे करण थापरने अन्नु मलिक आणि प्रितमच्या घेतलेल्या मुलाखतीही आहेत. भाग १ इथे आहे. अजून २ भागही आहेत त्याचे.+११११
In reply to तुम्ही फार मेहनत घेतलीत!http: by रुपी
+२२२२
In reply to +११११ by संदीप डांगे
ढापलेले म्हणजे काय?
वाचतेय पैलवानभाऊ.
@पैलवान भाऊ
तेमुहैपनाको
खरंच की :)
मूळ गाणं समरगीत नाही
In reply to खरंच की :) by पद्मावति
अकेले है तो क्या गम है (कसकट)
अन्नू मलिकने तर हिंदी
प्रीतम
प्रीतमचे नाव नसल्याअबद्दल टीव्र णिषेद
In reply to प्रीतम by कपिलमुनी
चोरी.... प्रेरणा वगैरे....
काही निवडक
प्रितमला सगळे चोरटा म्हणतात,
जब वी मेटमधली यच्चयावत गाणी
In reply to प्रितमला सगळे चोरटा म्हणतात, by पुंबा
तू ला दे हरी चुडिया - आज का
हे?
In reply to तू ला दे हरी चुडिया - आज का by वाल्मिकी
नाही चाल वेगळी आहे
In reply to हे? by तुषार काळभोर
गमभन प्रॉब्लेम
In reply to हे? by तुषार काळभोर
Okk
In reply to गमभन प्रॉब्लेम by पैसा
अरे बापरे!
In reply to Okk by तुषार काळभोर