बर्याचदा आपण पाहतो की एखादा माणूस खुप हुशार असतो,एखादा अगदीच ढ असतो.
हुशार,दुर्मिळ प्रतिभा असणार्या माणसाला प्रगतीची दारं लगेच खुली होतात.त्यांची कुशाग्र बुध्दी हीच त्यांच्याकडची सर्वात मोठी जमेची बाजू असते.या बौध्दिक हुशारीवर बर्याचशा क्षेत्रांत हे लोक सहज यशस्वी होतात.शारिरीक कष्टापेक्षा बौध्दिक कष्टावर यांचा भर असतो.
दुसरा गट हा तथाकथित अभ्यासात बर्यापैकी मागे असणार्या ढ लोकांचा.जिथे अभ्यासातली हुशारी लागते त्या क्षेत्रांशी यांचं वाकडं असतं.मग पोट भरण्यासाठी हे लोक पडेल काम करतात.चहाची टपरी चालवणे,हॉटेलात फडका मारणे,कारखान्यात हेल्पर म्हणून काम करणे,हमाल,अॉफिसबॉय ते रस्त्यावरच