येत्या १५ वर्षात...
हा धागा आमच्या एका व्हॉटसअॅप समुहात झालेल्या चर्चेवर आधारीत आहे.
मी काही व्यवसायांची यादी आणि ते येत्या १५ वर्षात भारतात त्यांची मागणी का मंदावेल याची कारणंही देतो आहे. ती बरोबरंच आहेत असा अजिबात दावा नाहीये.किंबहूना ती बरोबर आहेत का हे तपासण्यासाठीच इथे देतोय.
तुम्हालाही अशी येत्या १५ वर्षात मागणी मंदावू शकणारी अजून काही क्षेत्रे आणि त्यामागची अंदाजे कारणं माहित असतील तर जरुर लिहा.
प्रतिसाद देण्यापूर्वी कृपया खालील गोष्टी ध्यानात घ्या.
१.आपण येत्या १५ वर्षातला अंदाज घेतोय.२०१८ पर्यंत जी क्षेत्रे चांगली फायद्यात होती त्यांचा आढावा किंवा इतिहास जाणून घेत नाही आहोत.
२. आपण स्वत: किंवा आपला जोडीदार,पाल्य खाली दिलेल्या क्षेत्रात असेल तर त्या क्षेत्राबद्दल सहानुभूती,आपुलकी वाटणं अगदी साहजिकच आहे त्यामुळे तटस्थपणे निरीक्षण आणि मतमांडणी असावी अशी अपेक्षा आहे. _/\_
३. दिलेल्या उपजीविका क्षेत्रांच्या केवळ मुंबई,पुणे,चेन्नई,दिल्ली,नागपूर अशा भल्या दांडग्या शहरांमधील येत्या १५ वर्षातील अवस्था विचारात घेतलेली नाही तर कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद,भुवनेश्वर, कन्याकुमारी,वाराणसी जालना,नाशिक,रत्नागिरी अशी तुलनेने लहान शहरेही विचारात घेतलेली आहेत हे लक्षात घ्यावे. _/\_
१. क्लासेस
यात प्रामुख्याने १ ली ते १२ पर्यंतच्या ट्यूशन्स/क्लासेसचा विचार केला आहे.शिक्षणावर होणारा खर्च,जाणारा वेळ आणि त्याचा अर्थप्राप्तीसाठी उपयोग याचा हिशोब लोक मांडू लागतील.एकूणच भारतीय शिक्षणव्यवस्था ही फारशी भरवशाची नसल्याने नावापुरती पदवी घेऊन 'एवढा पैसा क्लासेसवर अोतण्यापेक्षा या पैशात काही बिझनेस सुरु करु.त्यातल्या टक्क्याटोणप्यामुळे मिळणारं ज्ञान हे जास्त शिकवून जाईल.'असा विचार बळावणे.शिवाय हल्ली अॉनलाईन क्लासेस,युट्युब हे पर्याय तुलनेने स्वस्त आहेत.बायजुसारख्या शैक्षणिक सॉफ्टवेअरची जाहिरात शाहरुख खान सारखा सुपरस्टार करतो यावरुन यातली आर्थिक गुंतवणूक लक्षात यावी.होमस्कूलिंगही वाढू शकतं.
सोबतच UPSC,MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा खर्च आणि त्यात यशस्वी होणार्या उमेदवारांची संख्या पाहिली तर अजून थोडे वास्तव समोर येईल.लोक यापुढे या क्षेत्रात पुरेसा विचार उतरतील असे वाटते.
२. फास्ट फूड,जंक फूड निर्मिती
यांच्या सेवनामुळे येणारा लठ्ठपणा आणि इतर आजारांवर बर्यापैकी प्रबोधन होऊन लोक आरोग्यदायी आहाराकडे वळणे
३. कागदावरची,प्लॅस्टीक माध्यमांवरची छपाई
यात पुस्तके,रस्त्यावर लावले जाणारे फ्लेक्सबोर्ड यांचा खप रोडावेल;कारण पुस्तकंच काय पण काहीही वाचायला मुळातच लोकांकडे पुरेसा वेळ नाहीये.हा वेळ दिवसेंदिवस कमीच होत जाणारेय.शिवाय 'पुस्तकी ज्ञान नको प्रत्यक्षात काही काम केलं असेल तर ते सांगा' असा प्रचार वाढीस लागू शकतो.
प्लॅस्टीकबंदी कधीही कडक होऊन फ्लेक्सवर, अन्नपदार्थ पॅकबंद करायच्या पिशव्यांवर बंदी येऊ शकते. दुसरं स्वस्त,सर्व हवामानात टिकणारं,विघटनशील आणि ज्यावर चांगली छपाई होईल असं माध्यम अजूनतरी उपलब्ध नसणं ही कारणे असतील.
पण हा व्यवसाय अगदीच रसातळाला जाईल असंही नाही.अॉफिस,शाळा,कॉलेज यांना लागणारी पुस्तकं,वह्या,बिलबुकं यांना थोडीफार मागणी असेल.ती सुद्धा 'पेपरलेस' चा प्रचार फार झाला नाही तरच.
४. छोटे दुकानदारी व्यवसाय
अॅमेझॉन,स्नॅपडील,गुगल यांसारखे अॉनलाईन वस्तू विक्रेते प्रत्यक्ष मोठालं दुकान थाटून थेट विक्रीत उतरणे.महिन्याचा,वर्षाचा किराणा माल मॉलमधून एकदमच डिस्काऊंटवर खरेदी करणे.नुकताच संगमनेर मधील व्यापार्यांनी अॉनलाईन वस्तू विक्री कंपन्यामुळे व्यवसाय मंदावल्यामुळे आलेल्या वैफल्यातून केलेला प्रकार वाचनात आलाच असेल.
५. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती
भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फार बनतंच नसल्याने शिवाय त्या दुरुस्त करण्याइतपत सहज नसल्याने स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी बळावून अशा वस्तू दुरुस्त करण्यासाठी खुप कुशल अशा तंत्रज्ञांची गरजच न भासणे किंवा त्यांच्यासाठी पुरेसं कामच उपलब्ध न होणे.
६. जाहिरात कंपन्या
यात उत्पादनांसाठी टॅगलाईन सुचवणार्या कंपन्या,कलाकारांना घेऊन प्रत्यक्षात जाहिराती बनवणार्या कंपन्या विचारात घेतल्या आहेत.गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या 'डिजिटल मार्केंटींग'वाल्या कंपन्यांचं भांडवल मुळातंच कमी असतं त्यामुळे त्यांच्या संख्येवरुन जाहिरात क्षेत्र फायद्यात आहे आणि राहीलंच असा निष्कर्ष काढणं योग्य नाही.
उत्पादनाची/सेवेची जाहिरात आणि उत्पादनाची विक्री यांचे आंतरसंबंध तपासून देणार्या अत्याधुनिक यंत्रणा,प्रणाली यांचा वापर वाढणे जेणेकरुन जाहिरात कुठे करावी,कशी करावी याचे निर्णय उत्पादक कंपनी स्वत:च घेणे आणि ते बरोबर निघणे.पर्यायाने जाहिरात कंपनीला कंत्राट देणे कमी होणे.जाहिरातींवरचा खर्च कमी होणे.एखाद्या उत्पादनाची टॅगलाईन आवडली किंवा ती विविध माध्यमांतून वारंवार दिसते एवढे दोनंच निकष लावून आपण ते उत्पादन घेतो हा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल.बर्याच अॅपमधे जाहिरातींचा भडीमार असतो.ती जाहिरातीतली प्रत्येक वस्तू आपण लगेच विकत घेत नाही.
७.आर्किटेक्ट
बांधकाम करणारा इंजिनिअरच या बाबत पुरेसा सक्षम असणे;शिवाय इंटरनेटवर आयत्या तयार प्लॅन्सची संख्या भरपूर असणे,आर्कीटेक्ट नावापुरता,प्लॅन अप्रुव्ह करण्यापुरता कंस्ट्रक्शन कंपनीत असणे किंवा त्याला पुरेसं श्रेय मिळत नसल्याने पैसे चांगले मिळत असले तरी कामाचं समाधान न मिळणे; कारण आर्किटेक्ट हा जरा कमी कलाकारच असतो.कलाकार हे बर्यापैकी संवेदनशील असतातंच.
त्याशिवाय मुंबई,दिल्ली,पुण्यासारख्या भल्या मोठ्या शहरातल्या आर्किटेक्टकडून काम करुन घेण्याचा ट्रेंड वाढणे आणि त्यामुळे छोट्या शहरातल्या आर्किटेक्टना पुरेशी मागणी नसणे,आधीच्या आर्किटेक्टचे पैसे देणं बाकी असणे,राजकीय सेटींग नसणे ही सुद्धा कारणे असतीलच.
८. टेक्स्टाईल इंजिनिअरिंग
या शाखेत भरतीच कमी आहे.पदवीला अंदाजे 120 आणि पदविकेला 100 उत्तीर्ण होतात महाराष्ट्रातून. यावरून प्रमाण बघा.विशेषत: 2008 पासून प्रकर्षाने.आऊटसोर्सिंगही बरंच वाढलंय.१९९० नंतर पॉलिस्टरचं प्रमाण वाढल्याने कपड्यांचं आयुर्मानही वाढलंय.
९.स्टील फोटोग्राफी
फोटो स्टुडीओ बिजनेस तालुका आणि साधारण जिल्हापातळीवर ठप्प झालेला आहे.स्मार्टफोनमधेच २०-२२ मेगापिक्सेलचे कॅमेरे येताहेत.अर्थात हे स्टील फोटोग्राफीबद्दल.
मात्र व्हिडिओ शुटींग करणार्यांना थीम वेडींग,टिव्ही मालिका,सिनेमे,राजकीय सभा इथून मागणी राहीलंच.अर्थात दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या त्या म्हणजे अशा मालिका,सिनेमे,राजकीय सभा आयोजकांकडे 'जॅक लावता येणे आणि त्यांच्याकडून कामाचे पूर्ण पैसे मिळेपर्यंत तग धरणे हे जमलं तरंच!
१०. अॉटोमेशन
सध्या साखर तसेच इतर मोठ्या कारखान्यांमधे अॉटोमेशन वाढतं आहे.गव्हाणीपासुन ते बग्याज आऊटलेट फुल auto, प्रोडक्शन मधे जुस ते पार शुगर्स सायलो पर्यंत आणि को जेन boiler पासुन gas outlet सगळीकडे अॉटोमेशन येतं आहे.अर्थातंच छोटे कारखाने परवडेबल नसल्याने अॉटोमेशनकडे वळण्याची शक्यता कमी आहे;पण मोठ्या कंपन्यांत हे प्रमाण अजून वाढेल.
११ आय टी
या क्षेत्राबद्दल बर्यापैकी संदिग्धता आहे.काही जण म्हणत आहेत की आयटीला मरण नाही.वाईंडप करायलाच १० वर्षे जातील तर दुसरीकडे क्लाऊड कॉम्प्युटिंग, AI,अॉटोमेशन यांचही प्रमाण या क्षेत्रात वाढतंय त्यामुळे यात सध्या जितके लोक काम करतायत त्यात बर्यापैकी घट होईल.जोडीला या क्षेत्रातला मानसिक ताण आहेच.
मिपावर आयटीतले लोक बरेच आहेत त्यामुळे याबद्दल इथल्याच आयटी तज्ञांनी वास्तव सांगावं.
सर्वांचे आधीच आभार मानतो! _/\_
याद्या
14389
प्रतिक्रिया
35
वर्गीकरण
मिसळपाव
उत्तम विषयावर चा धागा.
धन्यवाद!
In reply to उत्तम विषयावर चा धागा. by दुर्गविहारी
आयटीबद्दल सहमत....चीनी लोक
@ टवाळ कार्टा
In reply to आयटीबद्दल सहमत....चीनी लोक by टवाळ कार्टा
ते होण्याच्या आत भारतिय आयटी
In reply to @ टवाळ कार्टा by नावातकायआहे
चीनि जरी इंग्लिश बोलायला लागले तरी....
In reply to आयटीबद्दल सहमत....चीनी लोक by टवाळ कार्टा
टवाळ भाऊ
In reply to आयटीबद्दल सहमत....चीनी लोक by टवाळ कार्टा
छोट्या रिटेल व्यापाऱ्यांना जास्त धोका नाही
Pvdpune
In reply to छोट्या रिटेल व्यापाऱ्यांना जास्त धोका नाही by Pvdpune
वेगवेगळ्या समाजघटकांना
जास्त चिंता न करावी
In reply to वेगवेगळ्या समाजघटकांना by तेजस आठवले
तेव्हा मानवी जनसंख्या कमी
In reply to जास्त चिंता न करावी by Rajesh188
मनोगत ..
सध्या बांधकाम क्षेत्रात
अशी आणि इतरही अनेक तंत्रे
In reply to सध्या बांधकाम क्षेत्रात by मार्मिक गोडसे
म्हात्रे सर!
In reply to अशी आणि इतरही अनेक तंत्रे by डॉ सुहास म्हात्रे
बारा बलुतेदारांचे किंवा
In reply to म्हात्रे सर! by उपयोजक
नागपूर
In reply to अशी आणि इतरही अनेक तंत्रे by डॉ सुहास म्हात्रे
पाच वर्षांपूर्वी फक्त बडे
डिजिटल कन्टेन्ट
मी नक्की रिटायर होईन येत्या
छान
क्लासचा धंदा बंद होणार नाही....
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Blackcat
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
देऊळ टाका मस्त ...
+ १
In reply to देऊळ टाका मस्त ... by चौकटराजा
आता त्या चिनी आक्रमणाने
उपयोजक
अशी घटना गेल्या दोन वर्षीपुर्वी पाकिस्तानात होऊन ५० - ६० लोक मृत
In reply to उपयोजक by डँबिस००७
सुरूर (सातारा )
In reply to अशी घटना गेल्या दोन वर्षीपुर्वी पाकिस्तानात होऊन ५० - ६० लोक मृत by बबन ताम्बे
करेक्ट. सातारा जवळील गाव, नाव आठवत नव्हते मला
In reply to सुरूर (सातारा ) by अमित मुंबईचा
सागर माला ह्या प्रकल्पात
फायदे तोटे दोन्ही बाजुला
बहुसंख्य जनताच जर बेकार झाली
बहुसंख्य जनताच जर बेकार झाली