माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात.
मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत.