विविध बोर्ड - SSC स्टेट बोर्ड / ICSE / CBSE
१) मी २००८ - २००९ ला मुलीसाठी नवी मुंबईत शाळा शोधत होतो
एक ठरले होते कि मराठी माध्यमात घालायचे नाही - त्याचे प्रॉब्लेम मी आणि बायकोने पूर्ण अनुभवले होते आणि त्यामुळे हे तर नक्की होते .
आता इंग्लिश माध्यम हे बाकी ठिकाणी नवीन असले तरी मी मुंबईत ते पण पश्चिम उपनगरात राहिलो होतो आणि त्यामुळे आसपासचे सर्व इंग्लिश माध्यमात होते त्यामुळे त्याचा फायदा पाहिला होता
आता बोर्ड चा प्रश्न तर ११ वि १२ वित काही ICSE वाले आणि २ CBSE वाले ओळखीचे होते आणि लक्षात आले ह्या मुंलाना अभ्यास सोपा जातोय . तसे पण नॅशनल टॅलेन्ट search परीक्षा दिली होती आणि त्यासाठी सातवीपासून ट्रेनिंग घेतले होते त्यासाठी CBSE ची पुस्तके वापरली होती आणि लक्षात आले कि ह्यांची काठिण्य पातळी अधिक आहे , पुस्तके फार चांगली आहेत . नंतर आयआयटी द्यायचा प्रयत्न केला आणि तेंव्हा लक्षात आले कि CBSE ची पुस्तके ( म्हणजेच NCERT ) ची हि या परीक्षेला बेस म्हणून वापरली जातात.
नंतर हि ICSE / CBSE वाल्यांचाच संबंध इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आला - ३० -३२ वर्षांपूर्वी हि नॉव्हेल्टी होती पण पश्चिम / मध्य / दक्षिण मुंबईत कोणी ना कोणी होते . अनेक जण ICSE वाले होते आणि मुले अभ्यासात चांगली होती आणि त्यापलीकडे हि मुले suave / sophisticated / polished होती . याचा फायदा त्यांना नक्की मिळाला.
बी स्कुल मध्ये ICSE / CBSE वाल्यांचे प्रमाण जास्त होते - शाळा कमी असून . आणि आठवते तिकडे त्यावेळी हि १९९१ ला CBSE ची मुले तुलनेने IIT मध्ये अधिक जातात हे ऐकले होते
नंतर मुंबईत तरी ICSE / CBSE शाळा झपाट्याने वाढू लागल्या खास करून ICSE . आणि त्यात जायला दूर जावे लागते ते हि नाही . मला बाळ तुलनेने उशिरा झाले आणि अनेक मित्र मैत्रीणीची मुले आता डिग्री पूर्व केली आहेत किंवा उच्चं शिक्षण घेत आहेत - एक दोन मैत्रिणी असल्या शाळेत शिकवत हि आहेत त्यामुळे काही गोष्टी कळल्या .
तरी मला ICSE / CBSE मध्ये CBSE अधिक चांगले वाटते कारण माझ्या माहितीत अनेक स्पर्धा परीक्षा चा बेस हा असतो
केंद्र सरकार या अभ्यासक्रमाचे नियमन करते
हा थोडा कठीण आहे ( काहींच्या मते ICSE थोडा अधिक कठीण ऐकले आहे - पण यात परत भिन्न मते आहेत )
ICSE / CBSE मध्ये मला तरी CBSE च फी तुलनेने कमी वाटली आहे . ICSE ची संलग्नता सहज मिळत असल्याने शाळा काहीही करीत असायला - यात वेगळा अनुभव हि असू शकतो
माझी मुलगी अभ्यासू नाही आणि तिला डिजिटल आर्ट करायचे असे म्हणते - मला तरी वाटते कि चांगल्या मुलांच्या मध्ये असल्याने असल्या वेगळ्या वाटेवर हि फायदा व्हावा .
मुलीची शाळा निवडताना अंतर हा निकष होता . नवी मुंबईत शाळांचे भरपूर पर्याय आहेत आणि ऍडमिशन ची तितकी मारामारी नाही
सुदैवाने घराजवळ ५ मिनिटे चालत वर रायन ची CBSE होती - रायन सानपाडा - फी प्रचंड नव्हती आणि बालवाडी मध्ये सहज ऍडमिशन मिळाली - इकडे बालवाडी ३ वर्षांची आहे , मुलीला प्ले स्कुल मध्ये टाकले नाही .
२) शाळेची फी किती आहे ते जरूर पहा आणि आपल्या आर्थिक स्थिती च्या प्रमाणात किती खर्च आहे ते पण पहा . तसेच खरे तर मला तर पहिली ते चौथी पर्यंत ची फी हि पाचवीत कमी झाल्याचे दिसले आहे पण इतर शाळांचे तसेच असेल असे नाही
एक म्हणजे शाळेचा बोर्ड वर बहुतेक पहिली ते दहावी ची फी लावलेली असते त्या वरून अंदाज येतो
तरी हि साधारण जी सरासरी फी आहे त्याच्या अडीच / तीन पट फी परवडते का ते पहा - त्या वरून अंदाज घ्या ( आपले उत्पन्न आणि महागाई पण वाढणार आहे हे पण लक्षात घ्या)
३) शाळेची साईट बघा , फेसबुक पेज असेल तर बघा , गुगल वर रिव्ह्यू बघा . अर्थात २/४ वाईट रिव्ह्यू असू शकतात . तसेच काही दहावीची बॅच पूर्ण झालेल्या शाळा नोटीस बोर्ड वर आपल्या मुलांची / माजी विद्यार्थ्याची कामगिरी लावतात - त्यामुळे शाळा किती बरी / वाईट आहे ते कळते . तसेच अभ्यासात नाही तर काही शाळा क्रीडा / कला / काही इतर ऍक्टिव्हिटी यात हि चांगल्या असतात
४) आसपास शाळेची चौकशी करा - काही वेळा लोकांकडून काही माहिती मिळते . शाळा कोणता संस्थेची आहे , कोण चालक आहेत ते हि पहा , त्यांची नावे गुगल करा .
५) जर मुलाला ICSE / CBSE बोर्ड मध्ये प्रॉब्लेम येत असेल , जमत नसेल तर कोर्स करेक्शन म्हणून SSC ला टाकायला बिचकू नका. तुलनेने सोपे असल्याने / परवडत नाही म्हणून / बदली झाली तर असे करणारे लोक आहेत . आणि हो शाळेत अभ्यासात पुढे म्हणजे पुढे नक्की काय होईल हे सांगता येत नाही . दहावी ला दोन तीन वर्ष अडकले पुढे योग्य ते कोर्स घेऊन शिकलेले आणि व्यवस्थित परफॉर्म करणारे अनेक लोक माहीत आहेत
६) शाळे संबंधी आणि बोर्डा संबंधी अजून एक निरीक्षण आहे - एखाद वेळी ते जुन्या भागात / मुंबईला लागू असेल
अनेक चांगल्या स्टेट बोर्ड इंग्लिश शाळा - त्यात काही कॉन्व्हेंट होत्या या अनुदानित आहेत आणि त्यामुळे फी अतिशय कमी आहे
पूर्वी त्यात प्रवेशासाठी फाईट असायची आता सर्वच जण ICSE / CBSE च्या मागे आहेत त्यामुळे यात प्रवेश मिळतो .
या शाळांनी हि ICSE / CBSE सुरु केले तरी स्टेट बोर्ड अनुदानित असल्याने ती शाळा चालू ठेवली आहे
तर अशी शाळा जवळ असेल तर चौकशी करून पहा -
तसेच हल्ली शाळा निकाल , अजून काही चांगले असेल ते बोर्ड वर लावतात - त्यामुळे शाळा किती चांगली वाईट हे कळायला मदत होईल
नेट वर हि शाळा कळली तर तिचे review वाचू शकता .
७) अजून २/३ इंटरनॅशनल बोर्ड पण आहेत - IGCSE / IB ते मला फार महाग वाटले आणि त्याचे भारतात शिकताना काय फायदे आहेत ते कळले नाही . किती समजले यापेक्षा हि प्रवेश परीक्षा देता येणे हे आपल्याकडे अधिक महतवाचे आहे असे माल तरी वाटते . फी पाहून या बोर्ड चा विचार केला नाही
हेमंत वाघे.
HuntMyJob.in ( Coming Soon )
वर्गीकरण
माहिती बद्दल धन्यवाद...
In reply to माहिती बद्दल धन्यवाद... by मुक्त विहारि
जर्मनी मध्ये???
In reply to जर्मनी मध्ये??? by हेमंत सुरेश वाघे
माझी मुले सध्या तरी परदेशी नाहीत ...
In reply to माझी मुले सध्या तरी परदेशी नाहीत ... by मुक्त विहारि
आपणच सांगितले होते ना ?
In reply to आपणच सांगितले होते ना ? by हेमंत सुरेश वाघे
हो...
In reply to हो... by मुक्त विहारि
९९ % सहमत
In reply to ९९ % सहमत by स्वतन्त्र
स्पर्धा परीक्षांच्या वेळेस SSC वाल्यांना थोडे.....
In reply to हो... by मुक्त विहारि
पण अधिक मुले एक बोर्डाची असणार तर त्यात काहीतरी वेगळे असेलच ना
फुरसुंगीत राहून बेल्जियम चा इतिहास!
एस एस सी \ सि बी एस सी आणि मी
तुलना कशी केली जाते
In reply to तुलना कशी केली जाते by चौकस२१२
पूर्वी असे काहीतरी होते
In reply to पूर्वी असे काहीतरी होते by हेमंत सुरेश वाघे
अवांतर होईल पण लिहिण्याचा मोह
In reply to अवांतर होईल पण लिहिण्याचा मोह by कानडाऊ योगेशु
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to अवांतर होईल पण लिहिण्याचा मोह by कानडाऊ योगेशु
अगदी खरं!
अमेरीकेत प्रत्येक स्कुल डीस्ट्रीक्टचा अभ्यासक्रम वेगळा असतो.
In reply to अमेरीकेत प्रत्येक स्कुल डीस्ट्रीक्टचा अभ्यासक्रम वेगळा असतो. by नेत्रेश
भारतीय समाजाची मानसिकता.....
In reply to भारतीय समाजाची मानसिकता..... by मुक्त विहारि
पण ............
In reply to पण ............ by हेमंत सुरेश वाघे
मुळ मुद्दा हा आहे की .....
सर्वांनाच पटेल असे नाही तरीही नोंद नक्की घ्यावी
In reply to सर्वांनाच पटेल असे नाही तरीही नोंद नक्की घ्यावी by उपयोजक
सहमत आहे .....
बघा या काय म्हणतात
नोबेल विजेत्यांची यादी....
राज्य बोर्डच्या नाडी लागू नका
In reply to राज्य बोर्डच्या नाडी लागू नका by साहना
दोन गोष्टी जाणवत आहेत ....
In reply to दोन गोष्टी जाणवत आहेत .... by मुक्त विहारि
पांघरून पाहून पाय पसरावेत अशी
In reply to पांघरून पाहून पाय पसरावेत अशी by साहना
खेडे गावांत शिक्षणाची बोंबाबोंब आहे ....
In reply to खेडे गावांत शिक्षणाची बोंबाबोंब आहे .... by मुक्त विहारि
> भारत एकाच वेळी, बैलगाडीतून,
In reply to > भारत एकाच वेळी, बैलगाडीतून, by साहना
@साहना
In reply to @साहना by उपयोजक
कमनशिबी आणि गरीब माणसांचा कुणीही वाली नाही
In reply to @साहना by उपयोजक
इतर सर्व लोक करतात तेच,
In reply to > भारत एकाच वेळी, बैलगाडीतून, by साहना
बैलगाडीला वेगाने जाता येत नाही......
In reply to बैलगाडीला वेगाने जाता येत नाही...... by मुक्त विहारि
खेडेगावांत सोयी नाहीत म्हणून
In reply to खेडेगावांत सोयी नाहीत म्हणून by साहना
मी थांबतो
In reply to बैलगाडीला वेगाने जाता येत नाही...... by मुक्त विहारि
गरीब लोकांना संधी मिळत नाही हा विषय बाजूला ठेवू
In reply to गरीब लोकांना संधी मिळत नाही हा विषय बाजूला ठेवू by Rajesh188
फक्त गरिबी मुळे अतिशय बुद्धिमान
मुळात शिक्षणाचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा काही संबंध नाही
काही महत्वाची उदाहरणे
माझ्या मते, शिक्षण म्हणजे काय
In reply to माझ्या मते, शिक्षण म्हणजे काय by पिनाक
जर तुम्हाला कला, साहित्य,
In reply to जर तुम्हाला कला, साहित्य, by मराठी_माणूस
मास्टर डिग्री असलेल्या मुलांना
In reply to माझ्या मते, शिक्षण म्हणजे काय by पिनाक
पैसे हेच सर्वस्व असणारेच असा विचार करू शकतात.
त्या साठी अती उच्च डिग्री नाही