Skip to main content

राजकारण नोकरशाही

तुकाराम मुंढे अविश्वास प्रस्ताव आणि अभद्र युती

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 25/10/2016 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज राज्यात पुन्हा एकदा एका कार्यक्षम अधिकाऱ्याला हटवण्यासाठी अभद्र युती तयार झाली आहे. एखादा अधिकारी अकार्यक्षम आहे तर त्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास समजू शकतो. पण मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी जेव्हा नवीमुंबईत प्रस्थापितांच्या धोतरालाच हात घालून त्यांच्या पायाखालची वाळू सरकवतो, तेव्हा त्यांना हटवणे हे साऱ्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य होवून बसते हि या देशाची शोकांतिका आहे. 'तुकाराम मुंढे' हे पहिलंच उदाहरण नाही ज्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. या आधी अकोल्यात 'एकनाथ डवले', पिंपरीत अत्यंत कल्पक असे 'श्रीकर परदेशी' यांना सुद्धा राजकारण्यांनी विरोध केला होता.