Skip to main content

फिरस्ती

केरळ भटकंती - मदत हवी आहे.

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 04/01/2017 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पुढील महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात केरळमध्ये भटकंती करण्यासाठी जात आहे. प्रवासाचे जाण्या-येण्याचे बूकिंग झाले आहे, त्याचबरोबर राहण्यासाठी मुन्नार येथील क्लब महिंद्राच्या हॉटेलचे बूकिंग झाले आहे. साधारण पाच ते सहा दिवसाच्या भटकंतीमध्ये मुन्नारमध्ये आणि जवळपास फिरण्यासाठी कोणती ठिकाणे आहेत? तिथल्या अंतर्गत प्रवासासाठी सलग पाच दिवस एखादी गाडी बूक करण्याची सुविधा तिथे उपलब्ध होईल काय? खरेदीसाठी मुन्नारमध्ये किंवा आसपासच्या भागात मार्केट्स आहेत का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाकाहार आणि मांसाहार या दोहोंसाठी उत्तम ठिकाणे तिथे मिळतील का?