Skip to main content

ऑफीस ट्रीप - मदत हवी आहे

ऑफीस ट्रीप - मदत हवी आहे

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 08/05/2023 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सुजाण मिपाकरहो! ___/\___ तर शीर्षकातल्या उल्लेखाच्या अनुषंगाने थोडक्यात सांगायचे झाल्यास, आमच्या ऑफीसमधील सर्वच स्टाफसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून एक उन्हाळी सहल करावी असे संचालक मंडळाने ठरवले. त्यानुसार ऑफीसात जवळपास आठेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ठिकाण ठरवणे हा मुख्य विषय असतो. बरीच डोकी खल करत असल्यामुळे की काय ठिकाण काय ते ठरेना. बजेट जाहीर झालेले नसले तरी ठिकाण ठरल्यानंतर ते अ‍ॅप्रूव्ह होईल असा एक संचालक मंडळाचा सूर आहे. तरीपण अंदाजे १.५ ते २ लाख इतके बजेट असण्याची शक्यता आहे.