तुमच्या घरच्या देवघरातील मुर्ती, टाक, देवक, तांदळा इत्यादींची माहिती हवी
आत्ता दुसर्या एका मिपा धाग्यावर प्रतिमा पुजना वरुन विषय निघाला म्हणुन हा धागा काढण्याची आठवण झाली. या धाग्याचा उद्देश प्रतिमा(मुर्ती) पुजन करावे अथवा नाही असा नाही, केवळ परंपरांची नोंद/ धांडोळा घेणे एवढाच मर्यादीत उद्देश असल्यामुळे तुमचा व्यक्तिगत विश्वास असला-नसला तरीही तुमच्या घरच्या परंपरागत घरगुती देवघरांची माहिती या धाग्यात हवी आहे. या धाग्याच्या निमीत्ताने भारतातील/अथवा महाराष्ट्रातील जुन्यात जुने घरगुती देवघर आणि/अथवा मुर्ति कुठे असतील ?
१) तुमच्या घरच्या देवघराचे स्वरुप कसे आहे ? म्हणजे स्वतंत्र खोली आहे. लाकडी, दगडी अथवा संगमरवरी देवघर आहे ?
मिसळपाव