Skip to main content

मी न मोजलेले आनंदी क्षण

"मी न मोजलेले आनंदी क्षण"

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 21/05/2016 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी न मोजलेले कितीतरी आनंदी क्षण कितीतरी आले. साले मोजायचेच कशाला? ते त्यावेळी तर उपभोगायचे असतात. रामदासांच्या आणि सर्वसाक्षांच्या बरोबर, पारशी बेकरीत खाल्लेल्या गार्लिक ब्रेडची चव विसरीनही कदाचित, पण.... त्यांच्या बरोबरची मैफिल विसरणे कसे शक्य आहे? त्याच्याच जराशा अलिकडे-पलिकडे, राणीच्या बागेतले ते नुलकरांच्या बरोबर वृक्षांची ओळख विसरीनही कदाचित, पण.... त्या कट्ट्याच्या निमित्ताने झालेली विमेंची ओळख आणि विमें बरोबर झालेली सात जन्माची दोस्ती कशी विसरेन.