टोल सेवा वापरली नसतानाही फास्टॅग भुर्दंड
काल (७ जानेवारी २०२५) रात्री ११ वाजता माझ्या एचडीएफसी फास्टॅग खात्यातून ₹७२/- टोल शुल्क वजा झाल्याचा एसएमएस् आला. मात्र, त्यावेळी माझी कार घरी उभी होती आणि ती वापरात नव्हती.
मी आज सकाळी तो एसएमएस् पाहिला आणि लगेच फास्टॅग खात्यावर तक्रार नोंदवली.
मला माझी वजा झालेली शुल्क रक्कम परत हवी आहे. कदाचित नोंदविलेल्या तक्रारीवर कारवाई झाल्यावर ती रक्कम परत मिळेल.
तथापि, याची पुरेश्या गांभीर्याने चौकशी होईल याची मला खात्री करून घ्यायची आहे. शक्य झाल्यास मला टोल गेट मधून गेलेल्या वाहनाचा फोटो किंवा पुरावा हवा आहे.
- Read more about टोल सेवा वापरली नसतानाही फास्टॅग भुर्दंड
- 46 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments