Skip to main content

कृषी

कृषी धोरण आणि अर्थशास्त्र

लेखक साहना यांनी मंगळवार, 22/09/2020 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
भारत सरकार शेवटी APMC कायद्याची हडळ बाटलींत बंद करत आहे अशी बातमी वाचली आणि मनाला आनंद झाला. अजून तरी मी मूळ कायदा सुधार वाचला नाही तरी ज्या पद्धतीने दलाल मंडळी आपली छाती बडवत आहेत त्या प्रमाणे तरी हा बदल चांगलाच असेल असे वाटते. APMC कायदा शेतकऱ्यांचा गळा घोटणारा कायदा बनेल हे समजण्यासाठी ECON १०१ ज्ञान पुरेसे आहे. तुमचा धंदा कुठलाही असो, स्वखुशीने येणाऱ्या गिऱ्हाईकाला सर्व्हिस देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला असले तरच धंदा नफ्यांत चालू शकतो.