मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिकेट क्रीडा ट-२० मर्यादित स्पर्धा

आय पी एल - दशकपूर्ती

किसन शिंदे ·
नमस्कार, सालाबादप्रमाणे यावर्षीही आमचे येथे श्री बीसीसीआय कृपेकरून दि. ५ एप्रिल ते २१ मे या काळात आयपीएल सारखी, क्रिकेट या खेळाचा सर्वांगीन विकास करणारी स्पर्धा भरवण्यात येत आहे, तरी प्रेक्षकांनी दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा ही नम्र विनंती !! =)) अनेक संकटांवर मात करत आणि लोकप्रियतेचे नवे कळस गाठत(हं, आता काही लोकं याला नाकं मुरडतीलही ;)) या स्पर्धेने म्हणता म्हणता दहा वर्ष पूर्ण केली. दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरांनाही आयपीएल दहा वर्षांचा पल्ला गाठेल असं वाटलं नव्हतं. त्याचं कारण बरीच रामायणं-महाभारतं या दहा वर्षांच्या काळात या स्पर्धेमुळे घडली असं म्हणता येईल.

६ वी क्रिकेट ट-२० विश्वचषक स्पर्धा - २०१६

श्रीगुरुजी ·
क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत. गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते) गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो. २००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला.