भाग ६ - १ जाने १८१८ ची कोरेगाव लढाई - मराठ्यांच्या लढायांचा इतिहास
कै. शि. म. परांजपेंच्या लेखणीतून हे वर्णन पान २४५ वर आले आहे...
भाग ६
(चंद्रराव पदावर) येसाजी मोरे जावळीचा संस्थानिक होता.
शान आणि वैभवाचे प्रतीक, वेळोवेळी बोजड सामान घेऊन जाणार्या हत्तींनी पावसाळ्याचा मौसम, नदीच्या पाण्यात डुंबायचा मस्तीचा शौख़ पुरा करून घेत होते. हत्तिणींशी संग करायला हत्ती चेकाळत होते. त्यांना लांब ठेवायला माहूतांची तारांबळ होत होती. उंटांचे तांडे, गाई - बैल पावसाळ्यात आडोशाने रवंथ करत संथ होते.