Skip to main content

देवक

तुमच्या घरच्या देवघरातील मुर्ती, टाक, देवक, तांदळा इत्यादींची माहिती हवी

Published on मंगळवार, 09/02/2016
आत्ता दुसर्‍या एका मिपा धाग्यावर प्रतिमा पुजना वरुन विषय निघाला म्हणुन हा धागा काढण्याची आठवण झाली. या धाग्याचा उद्देश प्रतिमा(मुर्ती) पुजन करावे अथवा नाही असा नाही, केवळ परंपरांची नोंद/ धांडोळा घेणे एवढाच मर्यादीत उद्देश असल्यामुळे तुमचा व्यक्तिगत विश्वास असला-नसला तरीही तुमच्या घरच्या परंपरागत घरगुती देवघरांची माहिती या धाग्यात हवी आहे. या धाग्याच्या निमीत्ताने भारतातील/अथवा महाराष्ट्रातील जुन्यात जुने घरगुती देवघर आणि/अथवा मुर्ति कुठे असतील ? १) तुमच्या घरच्या देवघराचे स्वरुप कसे आहे ? म्हणजे स्वतंत्र खोली आहे. लाकडी, दगडी अथवा संगमरवरी देवघर आहे ?