Skip to main content

चर्चा काथ्याकूट

धाग्याला access denied

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 28/08/2023 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज प्रयतन करीत होतो कि दाभोळ्कर धागा उघडण्याचा पण मला access denied येते हे सगळ्यांनाच येत कि केवळ मला हे तपासून पाहायचे होते मला जर बंदी घालण्यात आली असेल तर का? संपादक मंडळ मी असे काय लिहिले आहे कि तुम्ही अशी पावले उचलावीत?

एक घर बनाउन्गा ??

लेखक शेर भाई यांनी शनिवार, 16/10/2021 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला फुकट वस्तूंचे आकर्षण का असते?? हा प्रश्न आजकाल सारखा माझ्या समोर टपकायला लागला आहे. त्याला कारण आहे आमच्या इमारतीचा पुर्नविकास. आधी अस्मादिक स्वयंविकास या शब्दाने खूप भारलेले होते. पण नंतर अभिहस्तांतरण प्रक्रिया हा एक खूप चिवट प्राणी आडवा आला. त्यात आमच्या इमारतीची हस्तांतरण प्रक्रिया करणे आमच्या पूर्वज कार्यकारिणीने जाणीवपूर्वक टाळले होते. कारण कोणी म्हणे म्हाडा नामक बागुल बुवा आहे आणि तो नुसता खातो. त्यामुळेच का होईना, कार्यारिणीतील इतर सगळ्यांच्या मते आम्ही बिल्डर नामक जमातीला सामोरे जायचे ठरवले. आणि तसेही बिल्डर नामक जमात म्हाडा नामक बागुल बुवाची मालक असते म्हणे.

हिंदुत्व निळकंठी तत्त्वज्ञान

लेखक श्रीनिवास टिळक यांनी बुधवार, 25/08/2021 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
"हिंदुत्व निळकंठी तत्त्वज्ञान" या छोट्या पुस्तकात नवाकाळचे माजी संपादक श्री. नीलकंठ खाडिलकर यांचे हिंदुत्वावर ३३ मुद्द्यात विवेचन आहे. या प्रत्येक मुद्द्याचा एक ओळीत सारांश येथे कोणी करून दिल्यास माझे आभार मिळतील. माझ्याकडे हे पुस्तक होते पण कोणीतरी वाचायला नेले ते परत आले नाही. चौकशी करता पुस्तकाची नवीन प्रत सध्या उपलब्ध नाही. वास्तव्य परदेशात असल्यामुळे कोणाकडून आणायची शक्यता पण नाही म्हणून हि विनंती. धन्यवाद.