राम माधव हे रा.स्व. संघाचे प्रचारक आणि भा.ज.पा.चे राष्ट्रीय सरचिटणीस (बरोबर ना ?) का कायसे आहेत. टिव्ही बातम्याण्च्या च्यनलांवरून सिताराम येचुरींची बाइट्स जशी मुद्देसूद असतात तसेच राम माधवांची बाइट्स सहसा चपखल असतात. मोदी सरकार स्थापनोत्तर आणि भा.ज.पा.चे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर पडद्या मागच्या काही राजकीय स्ट्रॅटेजी आणि डिप्लोमॅटीक यश राम माधवांचे असल्याची वृत्तपत्रीय वंदता असावी. मोदी सरकारच्या स्थापनेनंतर भा.ज.पा.च्या राष्ट्रीय कार्यकारणीवर राम माधवांना जागा देण्यात संघ-भाजपाची काय राजकीय खेळी असावी याची भाजपाच्या अधिकृत वक्तव्ये आणि आणि भाजपेतर कयासांमध्ये फरक असू शक्तो. असो, अगदी अलिकडील अलजझीरास वर प्रसारीत मुलाखती पर्यंत तरी राम माधवांची भूमिका अजून काही काळतरी पडद्या मागील राजकारणाचीच राहील असा माझा व्यक्तीगत कयास होता तो अंशतःतरी चुकला. राम माधव चांगले वक्ते आणि राजकीय मुत्सद्देगिरी जमण्याची शक्यता गृहीतजरी धरली तरीही आंध्र-तेलंगाण या स्वभाषेच्या राजकीय आखाड्यात त्यांचा एकुण राजकीय प्रभावास अद्यापतरी मर्यादा असाव्यात.
राम माधवांची अलजझिरा मुलाखत मी पाहिली नाही आणि टेक्स्ट स्वरुपात उपलब्ध झाल्याशिवाय चर्चा-खल करण्यास मर्यादा येतात म्हणून मी ते ऑनलाइन शोधण्या पहाण्याच्या भानगडीत पडत नाही.) माध्यमांमध्ये ज्या काही बातम्या दिसताहेत त्यावरून पडद्या बाहेर येण्यासाठी सरळ आंतरराष्ट्रीय च्यानलची निवड करणे कितपत सयुक्तीक अथवा घाईचे होते, त्यासाठी त्यांनी पुरेशी पुर्वतयारी केली असेल का असे प्रश्न मनात येऊन गेले.
पाकीस्तान आणि बांग्लादेशसहीत अखंड भारताचा मुद्दा मुलाखत घेणारे ते नंतरचे राजकीय विश्लेषक केवळ संघ-भाजपाचा मुद्दा असल्याप्रमाणे भासवत होते त्याच इंप्रेशन खाली संघ-भाजपाची मंडळी असावीत हि आश्चर्याची गोष्ट नसावी पण राम माधवांनी अभ्यास वाढवून उत्तर दिले असते तर १९४७ च्या आधी काँग्रेसने टू नेशन थेअरी स्विकारलेली नव्हती, नॉर्थवेस्ट फ्रंटीयरच्या खान अब्दुल गफारखानांनी स्विकारली नव्हती, एवढेच नव्हे टू नेशन थेअरीचा हवाला देऊन जे मुस्लीम भारतातून पाकीस्तानात गेले त्या मुहाजीरांच्या स्वातंत्र्योत्तर पिढीचे प्रतिनिधीत्व करणार्या एम.क्यु.एम.चे नेते टू नेशन थेअरी फेल्युअर असल्याचे उघडपणे म्हणत असतात. अखंड भारताच्या विचाराचं कॅनडाच्या एका माजी मंत्र्याने गांधीवादी दृष्टीकोणातून समर्थन केले आहे.
माझ्या व्यक्तीगत मतानुसार बेसीकली एखाद्या देशाच्या निर्मितीचा धर्म हा घटक असू शकतो हा राजकीय तत्वज्ञानाच्या (पॉलीटीकल सायन्सच्या) शिक्षणातून विचार युरोपीय खासकरुन इंग्रजी शिक्षणातून गेली काही शतके बिंबवला गेला तोच मुळात ढिसाळ आणि फसव्या तार्कीक उणीवा असलेल्या गृहीतकांवर आधारीत आहे. समजा एखाद्या भौगोलीक देशातल्या अर्ध्या लोकांनी दर पन्नासवर्षांनी धर्म बदलले (मग इंग्लंडचही उदाहरण घ्यायला हरकत नाही) तर दर पन्नासवर्षांनी त्या भौगोलीक देशांतर्गत राजकिय सिमा बदलत ठेवायच्या का ? मोठ्या लोकसंख्येचे धर्म विषयक तत्वज्ञान बदलण्यासाठी पन्नासवर्षे हा फार थोडा काळ आहे पण हजार वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्याच्या धर्म विषयक कल्पनात बरेच परिवर्तन घडत असावे कितीही बाता मारल्या तरीही हजार वर्षाच्या कालावधीत जनसमुहांच्या विश्वासात खुपकाही फरक पडू शकतात. एकाच भौगोलीक प्रदेशातील काल वेगवेगळे विचार बाळगणार्यांचे विचार एकसारखेही होऊ शकतात. काल एकमेकांशी यादवी करणारी मंडळी पुन्हा एकत्रही येऊ शकतात.
अखंड भारताच्या संकल्पने बाबत राम माधव बोलले -कदाचित वेळ आणि च्यानल चुकला असेल- पण त्यात फारसे काही गैर वाटले नाही, समजा काही बोलून गेला आहात तर त्याला त्यांनी नंतरही भाजपाचा नाही पण माझा व्यक्तीगत विचार आहे म्हणून डिफेंड करावयास हवे होते पण त्यांनी प्रेशरखाली येऊन आपली भूमिका बदलली असे वाटले. कदाचित राजकारणात तसे करावे लागत असावे पण समहाऊ तसे करणे मला फारसे पटले नाही.
बाकी राम माधवांबद्दल केवळ एवढ्या मुलाखती पुरते नाही तर नंतरही वेळोवेळी चर्चा करता यावी असे धागालेखाचे शीर्षक ठेवले आहे.
वर्गीकरण
वाचन संख्या
5693
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही त्यांची मुलाखत.
राम माधव त्यांच्या
In reply to ही त्यांची मुलाखत. by मोदक
भौगोलीक देशातल्या अर्ध्या
हजार वर्षाच्या कालावधीत
सलग १००० वर्षे साम्राज्याच्या
In reply to हजार वर्षाच्या कालावधीत by उगा काहितरीच
राम माधव ह्यांची मुलाखत आधीच
परदेशस्थांना हि मुलाखत कशी दिसू शकली असेल
In reply to राम माधव ह्यांची मुलाखत आधीच by निनाद मुक्काम …
अलजझीराच्या मुलाखतकारांनी
In reply to राम माधव ह्यांची मुलाखत आधीच by निनाद मुक्काम …
अखंड भारत वगैरे व्यवहारिक
?
In reply to अखंड भारत वगैरे व्यवहारिक by कैलासवासी सोन्याबापु
मी "अशक्य" असे म्हणले नाहिये
In reply to ? by मूकवाचक
खरे आहे
In reply to मी "अशक्य" असे म्हणले नाहिये by कैलासवासी सोन्याबापु
आताच्या पाकिस्तानची मदार
In reply to मी "अशक्य" असे म्हणले नाहिये by कैलासवासी सोन्याबापु
संदर्भ समजत नाहिये माहितगार
In reply to आताच्या पाकिस्तानची मदार by माहितगार
एका जर-तरचा विचार करुन पहा
In reply to संदर्भ समजत नाहिये माहितगार by कैलासवासी सोन्याबापु
माफ़ करा "जर तर" इज नॉट माय
In reply to एका जर-तरचा विचार करुन पहा by माहितगार
सध्यस्थितीतील अखंड भारत
प्रॅक्टिकली,
बापू.. वेगळा धागा काढता का?
In reply to प्रॅक्टिकली, by कैलासवासी सोन्याबापु
मोदक भाऊ,
In reply to बापू.. वेगळा धागा काढता का? by मोदक
मी वरती तेच लिहिले आहे
In reply to प्रॅक्टिकली, by कैलासवासी सोन्याबापु
राम माधव आणि अखंड भारत
दुसर्या महायुध्दानंतर
फाळणी १९४७
इंग्रजांनी भारताची फाळणी
In reply to फाळणी १९४७ by नितीनचंद्र
>>राम माधव हे रा.स्व. संघाचे
एक तुलना
अंखण्ड भारत, एक शंका
ते आत्ताच आपली न्यायव्यवस्था फाट्यावर मारतात.
In reply to अंखण्ड भारत, एक शंका by भंकस बाबा
@अर्धवटराव
In reply to ते आत्ताच आपली न्यायव्यवस्था फाट्यावर मारतात. by अर्धवटराव
सांगा की ज़रा आकड़े! म्हणजे
In reply to @अर्धवटराव by भंकस बाबा
असं आहे होय
In reply to @अर्धवटराव by भंकस बाबा
कसल लॉजिक पाहिजे तुम्हाला?
In reply to असं आहे होय by अर्धवटराव
कोणीतरी नाही साहेब मीच मागतोय
In reply to कसल लॉजिक पाहिजे तुम्हाला? by भंकस बाबा
अहो साहेब...
In reply to कसल लॉजिक पाहिजे तुम्हाला? by भंकस बाबा
एक उदाहरण
रोचक धागा....
टिव्हीवर बर्याचदा चपखल
In reply to रोचक धागा.... by मुक्त विहारि