फ्रीलान्सिंग आणि भारतातील कर
या धाग्यावरून स्फूर्ती घेऊन माझा पण एक प्रश्न डकवत आहे
मी सध्या काही काळ भारतातून भारतबाहेरील कंपन्यांसाठी फ्रीलान्स डेव्हलपर म्हणून काम करतो.. कामाचा मोबदला अर्थात डॉलरमध्ये मिळतो, पण कोणतीही चांगली सोय नसल्यामुळे सध्या पायोनीअर या सर्व्हिसच्या माध्यमातून पैसे घेतो. आता प्रश्न असा आहे की या उत्पन्नाला कोणते कोणते कर लागू होतील?
याबद्दल जालावर पाहिले असता वेगवेगळी मते दिसतात. काही जण म्हणतात की ही एक्स्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, काही म्हणतात ही नाही म्हणून. त्यामुळे संभ्रमित झालो आहे.
मिसळपाव