सॅनिटरी नॅपकिन चॅलेंज
दहा पंधरा वर्षा अगोदरच्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती आठवतायेत का? काचेच्या बरणीतल्या निळ्या शाईत खडू बुडवताना दाखवायचे. . केवळ सुचकतेने मांडणी करुन निम्या लोकसंख्येच्या अपरिहार्य बाबी बद्दल अजुनही म्हणावं त्या खुलेपणानं बोलणं,वागणं होत नाही.
आपल्याकडे तर मासिक पाळी सारख्या किरकोळ शारिरीक घटनेला धार्मिक कोंदण जोडलय. इतरांचं तर दूर राहील, आम्हा डॉक्टरांमध्ये देखिल असलेला हा बडगा पदोपदी जाणवलाय! व्यक्तिगत बाब म्हणुन दुर्लक्षित केलं तरी जेव्हा आपणचं अजुनही मासिक पाळी दरम्यानच्या शिवाशिवीबद्दल ठाम भुमिका घेणार नसू तर समोर येणार्या रुग्णास काय समुपदेशन करु शकणार आहोत?
मिसळपाव