आरोग्य सल्ला
घोरण्या वर काही उपाय सुचवा
मला झोपताना खूप शांतता लागते. कधी कधी गाड्यांचे आवाज वगैरे चालून जातात पण काही कारणाने शेजारची व्यक्ती घोरायला लागली की माझी झोप उडाली च. (मानसिक आजार असेल)
प्रश्न असे आहे की
१. घोरण्याची सवय कशी कमी करता येईल. कमीत कमी हळू तरी कसे घोरता येईल. काही नाकाला लाऊन झोपायची उत्पादने आहेत त्याचा फायदा होतो का?
२. जरी शेजारच्या व्यक्ती ला बदलू शकत नसेल तर अश्या माणसा शेजारी सुखाने कसे झोपायचे (माणूस आणि जागा दोन्ही बदलू शकत नाही). हेडफोन लाऊन झोपण्याचा प्रयत्न केला पण फसला. कापसाच्या बोळ्याने पण काही फरक पडेल असे वाटत नाही.
३.
चालते व्हा
चालते व्हा...
शीर्षक वाचून कोण कुणाला चालते व्हा म्हणतोय असे वाटेल.
चलते रहो, चाला,चालत रहा,नसाल तर चालणे सुरु करा या अर्थाने ते आहे.
आजकाल कॅच लाईन लागते म्हणणे खपवायला .काय करणार.
चालण्याचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत.
मग नवीन काय.
नवीन , ह्या कारणाचा शोध कि का चालत नाही व चालणं सुरु करण्यासाठी काही उपाय असू शकेल का.
आपण का चालत नाही?
सुरक्षीत मार्ग नाहित.
ह्याला काहीच करू शकत नाही.
दुसरे काय?
मोटीवेशन /प्रेरणा नाही ?
मला वाटत हे खरं कारण नाही
चालण्याचं मोजमाप नाही हे खरं कारण असावं.
एका कंपनीने (इच्छूक) कर्मचा-यांना ला पेडोमिटर दिले आणि walk in to health campaign सुरू केला.
मीठाचा वापर
रॉक सॉल्ट अर्थात शेंदेलोण आणि टेबल सॉल्ट अर्थात नेहमीचे आयोडीनयुक्त मीठ यापैकी स्वयंपाकात कोणते मीठ वापरावे..शेंदेलोण मीठावर कोणतीही प्रक्रीया न झाल्याने त्यातील पोटॅशिअम्,मॅग्नेशिअम हे घटक शाबूत राहतात, त्यामुळे ब्लड्प्रेशर काबुत ठेवायला मदत होते पण टेबल सॉल्ट मधे आयोडीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे आयोडीनच्या अभावामुळे होणारे रोग टाळता येतात अशी माहीती नेटवर वाचली पण नेमक कोणत मीठ खाव हे कळत नाहीये..गरोदर पणात तसेच ईतर वेळी कोणत्या मीठाचा वापर योग्य राहील? आहारतज्ञांनी/ जाणकारांनी प्लीज प्रकाश टाका..
मिसळपाव