Skip to main content

सायकल

पुणे सायकलिंग 'ग्रँड टूर' म्हणजे नक्की काय? सायकलिंगची 'वारी' ते जागतिक दर्जाचा थरार!

लेखक Avinash Anushe यांनी शनिवार, 24/01/2026 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे सायकलिंग ‘ग्रँड टूर’ : सायकलिंगची वारी की जागतिक दर्जाचा थरार? पुणे आणि सायकल यांचं नातं म्हणजे अगदी मिसळ आणि पाव — एकमेकांशिवाय अपूर्ण! एकेकाळी “सायकलचे शहर” म्हणून ओळखलं जाणारं पुणे आज पुन्हा एकदा त्या ओळखीला नवं, भव्य आणि जागतिक रूप देत आहे. सध्या शहरात एका शब्दाची जोरदार चर्चा आहे — ‘ग्रँड टूर’ (Grand Tour). अनेकांच्या मनात प्रश्न येतोच, “आपण लहानपणापासून सायकल चालवतोय, मग यात एवढं ‘ग्रँड’ काय?” “ही नुसती नवी फॅशन आहे का?” उत्तर आहे — नाही! ही फक्त रविवारी सकाळी दोन पेडल मारण्याची गोष्ट नाही.

एनडुरोचा थरार - भाग १

लेखक केडी यांनी मंगळवार, 10/01/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वर्षी, ११/१२ फेब्रुवारी, २०१७ ला होणाऱ्या NEF एनडुरोचे हे पंधरावे वर्ष! त्या निमित्ताने, अमित आणि माझे अनुभव ह्या लेखमालेतून एकत्रितपणे लिहायचा केलेला हा आमचा एक प्रयत्न. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "केड्या, मी आता इथून हलणार नाहीये, काहीही झालं तरी" असं म्हणत अमित ने तिथेच बसकण मारली.

क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

लेखक shawshanky यांनी शुक्रवार, 05/08/2016 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत. शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत.

रात्रीस खेळ चाले - १४ मे १६ Night BRM

लेखक sagarpdy यांनी शनिवार, 21/05/2016 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर मध्ये नवीन सायकल घेतली, ती थोडी घाबरतच. एवढी महाग वस्तू घेणार, ती आपण नियमितपणे वापरू कि नाही याची फार शंका होती. डोळ्यासमोर कित्येक मित्र-नातेवाईकांची घरी पडून असलेली सायकल होती. पण कायप्पा वरील मिपाकर सायकल ग्रुप, तसेच ऑफिस च्या सायकलिंग ग्रुप मधून वेगवेगळ्या अनुभवी आणि हौशी सायकलबाज (हो, 'बाज' - एकदा चटक लागली कि सुटणं कठीण) मंडळींशी ओळख झाली.