श्री मोदक दादा व मार्गी साहेब व अन्य मिपाकर सायकल प्रभृतींना वंदन करून "सायकल कशी निवडावी?" हा विषय हाती घेत आहे. चू.भू.दे.घे.
सायकल नियमितपणे चालवून बरेच दिवस झाले होते. ज्यू. कॉलेज संपल्यावर माझी सायकल कनिष्ठ बंधूंच्या हाती सोपवून रेल्वे/बस ने प्रवास सुरु झाला. नंतर मोटर सायकल आली. सायकल ने 'गरज' म्हणून प्रवास थांबलाच. विकांताला मनोरंजन / भटकंती म्हणून ट्रेकिंग सुरु होतेच. अशात ओळखीतल्या २-३ लोकांनी भारीतल्या सायकली घेऊन भटकंती सुरु केली. आणि सायकल बद्दल परत आकर्षण निर्माण झाले.
मोदक दादांशी ट्रेकिंग च्या माध्यमातून ओळख होतीच. एक दिवशी त्यांचा मेसेज आला - "अरे, सायकल वरून कोकण दौरा करूया का?"
मी म्हणले - "बाबो! कोकण! नाही जमणार बाबा. एकतर सायकल नाही, सराव नाही. त्यात कोकण म्हणजे मोठाले घाट आणि खराब रस्ते!"
पण मनाशी ठरवले - सराव करून सायकलिंग सुरु करायचे.
लहानपणापासून साधी सायकल चालवायचा सराव होता, पण सायकल चे गिअर कशाशी खातात हे पण माहित नाही. म्हणून ठरवले गिअर च्या महागड्या सायकल घेण्यापेक्षा सायकल भाड्याने घेऊन सराव करावा. गिअर कसे वापरावे ते शिकावं. मग मागील गेल्या वर्षभरात पिरंगुट, लवासा, हिंजेवाडी, ई. नजीकच्या ठिकाणी सायकल चालवून आणली. सुदैवाने कंपनीचे सायकलिंग क्लब असल्याने त्यांच्याबरोबर काही ठिकाणे फिरून झाली. पण नियमित सायकलिंग अजूनही नव्हते. ५०-६० कि.मी. नंतर हवा खतम होत होती.
अखेर (बजेट तयार झाल्यावर) ठरवले कि, हे असे जमणार नाही. स्वतःची सायकल हवी. मग ओळखीच्या सायकल प्रेमींकडून माहिती घेऊन होमवर्क सुरु केले. माझ्यासारख्याच अन्य इच्छुकांना मदत व्हावी म्हणून त्याचाच सारांश खाली मांडत आहे.
१. साईझ
सायकल ची (म्हणजेच फ्रेमची) साईझ हा कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सायकल ची साईझ व आकार समजा तुमच्या शरीराला पूरक नसेल तर भयंकर त्रास होतो. पहिल्याच वेळी सायकल चालवली तेव्हा हे चांगलंच लक्षात आलं. मी घेतलेली सायकल फारच लहान होती. दुकानदार म्हणाला - काही प्रोब्लेम नाही, सीट वरती करून देतो कि झालं. सुरुवातीला काही त्रास झाला नाही पण २०-३० कि मी नंतर गुढघे, हात आणि पाठ हळू हळू दुखायला लागले. सीट वर केली असली तरी हॅंडल ची उंची, सीट आणि हॅंडल मधील अंतर हे शरीराशी अनुकूल नसल्याने सायकल वर बसण्याची आदर्श स्थिती बनत नाही आणि त्रास होतो.
गुगल महाराजांच्या कृपेने या बाबत भरपूर माहिती मिळाली ("cycle frame size" म्हणून सर्च करा). विविध संस्थळावरून हि माहिती मिळते. त्यात अर्थात थोडाफार फरक असतो, पण साधारणपणे काय साईझ साठी चौकशी करावी हे लक्षात येतं. याही पुढे, जर सायकल ची कंपनी व प्रकार (३) नक्की असेल तर त्या कंपनीच्या साईट वर असणाऱ्या मदत पानावरून साईझ नक्की करावी.
उदा. मेरीडा चा फ्रेम साईझ कॅलक्युलेटर
माझी उंची जास्त असल्याने मला किमान २२इंच / ५५ सेमी साईझ ची सायकल लागणार होती. आणि आपल्याकडे साधारणतः २१ इंचाहून अधिक साईझ च्या सायकल मिळत नाहीत. फायरफाॅक्स, माँट्रा ई. देशी सायकल कंपन्या तर १९.५ हून मोठ्या फ्रेम मध्ये सायकल शक्यतो काढत नाहीत. अशा प्रकारे देशी-विदेशी सायकल मध्ये मला अगदी निवडक पर्यायच राहिले.
सायकल साईझ निवडण्याचा देशी उपाय (मोजमापाच्या भानगडीत पडायला नको) - सायकलवर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे उभे राहा
आणि सायकलची वरची दांडी आणि तुमचे सेंटर यामध्ये १ ते २ इंच इतकेच अंतर आहे हे तपासून पहा.
२. बजेट
हा अर्थात दुसरा महत्त्वाचा मुद्दा :) बजेट नक्की करताना सायकलिंगची (अपेक्षित) नियमितता, पायांना कष्ट देण्याची सवय देखील लक्षात घ्यावी. एकदा बजेट नक्की केले कि त्या बजेट च्या साधारण +-१०% किमतीच्या सायकल शोधायला सुरुवात करावी.
३. प्रकार
सर्वसाधारणपणे सायकल चे ४ प्रकार येतात -
रोड (रेस साठी, वापर फक्त चागल्या रस्त्यांवर),
MTB (कुठेही न्या, अगदी पायवाटातूनही पण मजबुतीसाठी अधिक जड, टायर जाड असल्याने कष्ट अधिक),
हायब्रीड (रोड आणि MTB चा संकरीत प्रकार, नेहमीच्या वापरासाठी) आणि
BMX (कसरती करण्यासाठी).
सायकल च्या अपेक्षित वापरानुसार यातील प्रकार निवडावा
४. हब
सायकलच्या चाकाच्या रिम आणि एक्सल मध्ये वंगण आणि बॉल बेअरिंग असते. हा चाकाच्या मध्यभागी जो दंडगोल असतो त्याला हब म्हणतात. याची क़्वालिटी जितकी अधिक तितकी सायकल ची एफिशन्सी जास्त (एक पेडल मारल्यावर अधिक वेळ चाक फिरत राहते). हि क्वालिटी ओळखण्याचा एकमेव उपाय म्हणजे सायकल चालवून बघणे.
५. गिअर
हा आपला आकर्षणाचा मुद्दा. आपल्या इथे मिळणाऱ्या बहुतकरून सगळ्या सायकलींमध्ये शिमनो या कंपनीचे गिअर सेट येतात. सेट म्हणण्याचे कारण कि हा मागील गिअर, पुढील गिअर, त्यांचे डीरेलर्स (निवडलेल्या गिअर वर चेन नेण्याचे काम करतात) आणि शिफ्टर्स (हातात असलेले गिअर बदलण्याचे उपकरण) यांचा संच असतो.
डीरेलर्स मध्ये शक्यतो टर्नी(स्वस्त) -> अल्तस -> अॅसेरा -> अॅलीवियो -> ड्योरे (महाग) हे प्रकार येतात. अर्थात किमती बरोबर त्याची गुणवत्ता सुधारत जाते.
लक्षात ठेवा कि सायकल मध्ये २ डीरेलर्स असतात - पुढचा आणि मागचा.
शिफ्टर्स हे रोटेटिंग टाइप चे शक्यतो घेऊ नयेत (कष्ट अधिक).
६. स्प्रिंग / सस्पेन्शन
सस्पेन्शन हे अर्थात सायकलस्वाराला तसेच फ्रेम आणि रिमना रस्त्यातील खड्ड्यांमुळे कमीत कमी धक्के बसावेत यासाठी असते. सस्पेन्शन मुळे सायकलिंग ची एफिशन्सी कमी होते. यामुळेच रेसिंग ला वापरल्या जाणाऱ्या रोड सायकल मध्ये कोणतेही सस्पेन्शन नसते.
सायकल मध्ये २ ठिकाणी सस्पेन्शन असू शकतात - एक म्हणजे फ्रेम खाली स्प्रिंग आणि दुसरा म्हणजे पुढील चाकाच्या बेचाक्याला सस्पेन्शन.
यातील फ्रेम मधील सस्पेन्शन टाळावे, कारण याच्यामुळे सायकलचे वजन वाढते आणि बहुतकरून २-३ वर्षात खराब होते.
काही सायकल मध्ये पुढील चाकाचे सस्पेन्शन हे सुरु-बंद करण्यासाठी कळ असते. हि असल्यास उत्तम - कारण रस्ता माहित असेल तर सस्पेन्शन बंद करून एफिशन्सी वाढवता येते.
७. ब्रेक
V ब्रेक अथवा डिस्क ब्रेक असे दोन पर्याय असतात. पाणी / चिखल यामुळे V ब्रेक चे घर्षण कमी होते, अशा वेळी डिस्क ब्रेक असतील तर नक्कीच फायदा होऊ शकतो. पावसा-चिखलात सायकलिंग करायचे असेल तर डिस्क ब्रेक असलेली सायकल निवडावी.
८. उपकरणे
मुख्य सायकल सोडून पूरक उपकरणे उदा. हेल्मेट, दिवे, हवेचा पंप, मडगार्ड, सायकलिंग चा ड्रेस, कुलूप ई. याचे एकूण बजेट ३००० पर्यंत जातेच. खिशाला झेपेल त्याप्रमाणे हि उपकरणे नंतरही घेता येऊ शकतात.
हे मुद्दे लक्षात घेऊन, ८-१० दुकाने फिरून अखेर गेल्या महिन्यात आमची नवी सायकल आली - ऑथर क्लासिक
खडकवासला
हायब्रीड सायकल, २२ इंच फ्रेम, २४ गिअर्स (शिमानो अॅसेरा), लॉकेबल फ्रंट सस्पेन्शन.
सायकल आल्यावर सुरुवातीला आठवड्यातून १-२ दिवस आणि आता आठवड्यातून ४ दिवस ऑफिस चा प्रवास सायकल ने चालू आहे. शिवाय विकांताला "कोकणच्या" लक्ष्यासाठी सराव म्हणून भटकंती आहेच.
थेऊर भटकंती ला गेलेलो मी, केदार आणि किरण

वाचने
36484
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
सायकल निवडताना सायकलचं वजन हा
अर्थात. कितीही झालं तरी
In reply to सायकल निवडताना सायकलचं वजन हा by आदूबाळ
मोदक दादा??
ट्रीप ठरवा, भेटतो :P
In reply to मोदक दादा?? by मोदक
सांगतो.
In reply to ट्रीप ठरवा, भेटतो :P by sagarpdy
उत्तम माहिती!
असा एखादा लेख मराठीत असण्याची
१/८/१६ आणि २४ वा गिअर वापरून?
२१/२४/२७ गिअर हि फक्त
In reply to १/८/१६ आणि २४ वा गिअर वापरून? by कंजूस
प्रत्यक्षात यातील प्रत्येक
In reply to २१/२४/२७ गिअर हि फक्त by sagarpdy
प्रत्यक्षात यातील प्रत्येक कॉम्बिनेशन वापरता येत नाही (वापरू नये)चूक. प्रत्येक कॉम्बीनेशन वापरता येते आणि जरूर वापरावे. चढ, उतार आणि सपाट रस्त्याला पूरक असेल तो गिअर वापरावा. गिअरबद्दल एक लेख लिहायचा विचार आहे. सवड झाली की नक्की लिहितो.:) उत्सुक!!
In reply to प्रत्यक्षात यातील प्रत्येक by मोदक
वापरू नये उदा. समोरील सर्वात
In reply to प्रत्यक्षात यातील प्रत्येक by मोदक
समोरील सर्वात मोठा आणि मागील
In reply to वापरू नये उदा. समोरील सर्वात by sagarpdy
ओके. या पद्धतीने बरोबर आहे.
In reply to समोरील सर्वात मोठा आणि मागील by sagarpdy
Correct,
In reply to समोरील सर्वात मोठा आणि मागील by sagarpdy
उत्तम माहिती.
In reply to Correct, by शैलेन्द्र
Sorry for typing in english
In reply to उत्तम माहिती. by एस
एकदम सही. आं जा वर हीच माहिती
In reply to Sorry for typing in english by शैलेन्द्र
छान माहिती.
In reply to Sorry for typing in english by शैलेन्द्र
+११११ धन्यवाद.
In reply to छान माहिती. by एस
भारी!
In reply to Sorry for typing in english by शैलेन्द्र
अजून एक महत्वाची गोष्ट, जिचा
In reply to Sorry for typing in english by शैलेन्द्र
२१/२४/२७ गिअर हि फक्त
In reply to २१/२४/२७ गिअर हि फक्त by sagarpdy
भारी. क्लबात स्वागत..
सागर, सही. धन्यवाद.
छान! उत्तम माहिती!
अभिनंदन
भेष्ट
फ्रेम ची साईझ सायकल च्या
In reply to भेष्ट by बाबा योगिराज
माहिती बद्दल धन्यवाद.
In reply to फ्रेम ची साईझ सायकल च्या by sagarpdy
एक्क नंबर
मन्द्या भौ ला अनुमोदन.
In reply to एक्क नंबर by लॉरी टांगटूंगकर
सायकलींग हा मोदक (दादा ?) चा
धन्स!
In reply to सायकलींग हा मोदक (दादा ?) चा by अप्पा जोगळेकर
सध्यातरी सायकल चालवणे आणि
In reply to सायकलींग हा मोदक (दादा ?) चा by अप्पा जोगळेकर
सध्यातरी सायकल चालवणे आणि मेंटेननस शिकणे यातच वेळ जातो आहे.झक्कास. हात काळे करायला काहीही कमीपणा वाटून घेवू नका. मी सायकल राईडला गेल्यावर, एखादा हौशी सायकलवाला रस्त्याकडेला थांबून सायकल सोबत काही खुडबूड करताना दिसला तरी बिन्धास्त "मदत हवी आहे का..?" असे विचारतो. शिकत रहा..!!मी "मोदक दादा"लाच हसत बसलेय..
ओ काकू... आता काय बाजार उठवता
In reply to मी "मोदक दादा"लाच हसत बसलेय.. by पिलीयन रायडर
तरी ऐतिहासिक "मादक" च्या
In reply to मी "मोदक दादा"लाच हसत बसलेय.. by पिलीयन रायडर
सायकल न चालवणारा परंतू गणित (
एक मदत
नक्की सांगता येणार नाही.
In reply to एक मदत by राजेंद्र मेहेंदळे
नक्की काय त्रास जाणवतोय
In reply to एक मदत by राजेंद्र मेहेंदळे
त्रास
In reply to नक्की काय त्रास जाणवतोय by शैलेन्द्र
"V ब्रेक अथवा डिस्क ब्रेक असे
वजन
कार्बन ऐवजी
In reply to वजन by कपिलमुनी
।माझ्याकडे या सेगमेंटमधल्या 3
In reply to कार्बन ऐवजी by कपिलमुनी
_/\_
In reply to ।माझ्याकडे या सेगमेंटमधल्या 3 by शैलेन्द्र
सायकलच्या वजनावर आधारित एक
In reply to ।माझ्याकडे या सेगमेंटमधल्या 3 by शैलेन्द्र
छान लेख
येस्स, नक्कीच !
In reply to छान लेख by किरण कुमार
मस्तच
५० किमि पेक्षा जास्त सायकल
In reply to मस्तच by प्रशांत
एकाच दिशेत खूप अंतर जाऊन परत येण्याचा कॉन्फिड्न्स
In reply to ५० किमि पेक्षा जास्त सायकल by sagarpdy
अरे वा!
उपयुक्त माहिती
अभिनंदन आणि प्रबोधनासाठी लोल.
In reply to उपयुक्त माहिती by ससन्दीप
सायकल चालवून आणि फिट राहून
In reply to उपयुक्त माहिती by ससन्दीप
+११११
In reply to सायकल चालवून आणि फिट राहून by शैलेन्द्र
अभिनंदन!
In reply to उपयुक्त माहिती by ससन्दीप
६ फुट उंच आणि बर्याचं वजनदार
घोडा
In reply to ६ फुट उंच आणि बर्याचं वजनदार by कॅप्टन जॅक स्पॅरो
Calling मापं, त्यांच्या
In reply to ६ फुट उंच आणि बर्याचं वजनदार by कॅप्टन जॅक स्पॅरो
where to buy author cycle in hyderabad and price ?
मित्रहो यांना कदाचित माहित
In reply to where to buy author cycle in hyderabad and price ? by kulpras
हैद्राबाद सायकल
In reply to where to buy author cycle in hyderabad and price ? by kulpras
I will visit Peddles point Kondapur.
In reply to हैद्राबाद सायकल by मित्रहो
सायकलप्रेमींसाठी छान लेख
सायकल आणि व्यायाम