मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

shawshanky ·
आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत. शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत.

प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना

सायकलस्वार ·
प्रेरणा प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना विसरतो मी तुझ्या पाठीवरच्या वळकट्या पुष्ट तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या सासूलाही छळू शकतेस तिथे सवतीची काय बिशाद तरीही तुझ्या नि तिच्या सह-वासाची वेडी आशा केलीच होती मी आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु तरीही जा तुला माफ केले कारण शेवटी गिळायला घरीच यायचे आहे..

बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते

बहुगुणी ·
बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते मिपावरील ऑनलाईन बुद्धीबळाचा खेळ पाहण्यासाठी: "ऑनलाईन बुद्धीबळ" या धाग्यात प्रवेश करा. तिथे प्रेक्षकांनी खालीलप्रमाणे log in करायचं आहे: Name: (MiPa3); Password: (Watch) 'Go' वर क्लिक करा. त्यानंतर खालील खिडकी उघडेल, त्यात दर्शविल्याप्रमाणे कृती करा: -- बुद्धीबळाच्या खेळातील खेळींच्या चर्चेचा आणि विश्लेषणाचा आनंद तुम्ही या धाग्यात घेऊ शकाल.