Skip to main content

वाङ्मयशेती

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 16/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 

लोकशाहीचा अभंग

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.

लोकशाहीचा अभंग

आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
काव्यरस