Skip to main content

चेन्नई - रामेश्वरम् - मदुरै २०२५

लेखक कंजूस यांनी बुधवार, 17/09/2025 17:50 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2477
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

In reply to by रीडर

तो विभाग मिपा जडणघडण drupal 11 update मध्ये बंद झाला त्यामुळे लेख दिसत नाही. मालकांना विनंती केली आहे.


प्रतिसादही दिसत नव्हते. नवीन प्रतिसाद दिल्यानंतर आधीचे दिसत आहेत. पण लेख नाहीच दिसतए


आमचा प्लॅन असा होता 

 

दिवस 1 

मुंबई - चेन्नई विमान 

चेन्नई दर्शन (फयान वादळ आल्यामुळे हॉटेल मध्येच मुक्काम ) 

 

दिवस 2 

चेन्नई - तिरुचिरापल्ली तेजस एक्सप्रेस 

तिरुचिरापल्ली इथे स्टेशन वर 1 तास काढून मैलाडूतुराई जनशताब्दी णने तंजावर 

 

दिवस 3 & 4 

तंजावर 

बृहदिश्वेर मंदिर, ऐरावतेश्वर, तांजवर महाल आणि लायब्ररी 

 

दिवस 5 

तंजावर हुन टॅक्सी ने तिरुचिरापल्ली 

त्रिची हुन परत तेजस एक्सप्रेस ने मदूराई

मदुराई station हुन मुथुवानी बस stand आणि मग TSRTC च्या एसी बस (2.10Pm) ने रामेश्वर 

 

Day-06 

रामेश्वर आणि धनुश्यकोडी 

 

Day-07 

रामेश्वर -मदुराई मीनाक्षी मंदिर - मदुराई मुक्काम 

 

Day-08 मदुराई - मुंबई विमान 

 


In reply to by साहित्ययात्री

तमिळनाडू तसे मोठे राज्य आहे आणि काही वारसा स्थळे, काही पर्वतीय स्थाने, काही समुद्र किनारे आणि अनेक पौराणिक तसेच ऐतिहासिक देवळे त्यात आहेत. त्यामुळे आम्ही हे तीन भागांत ( तीन वेगळ्या सहलींत) पाहिले. साधारण पाच सहा दिवसांची एक सहल.

राज्याचा नकाशा , ठिकाणे आणि तिकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे पाहून सहली आखल्या. एका ठिकाणी रेल्वेने पोहोचायचं आणि मग पुढील पाच सहा ठिकाणं   बसने जाऊन /राहून पाहात शेवटच्या ठिकाणाहून रेल्वेने परत असे. घाई होत नाही. 

उटी कुन्नूर हे म्हैसूर बेंगळूरू सहलीत होते. तर कन्याकुमारी केरळ सहलीत करणे सोपे जाते.

१.कल्याण ते कांचिपूरम रेल्वेने...मामलापूरम...वेल्लोर पाहून येणे..तिरुपती.. तिथून रेल्वेने परत.

२. कल्याण ते चिदंबरम रेल्वेने....कुंभकोणम..तंजावूर...तिरुचिरापल्ली तिथून परत.

३. कल्याण ते चेन्नई रेल्वेने...रामेश्वरम....मदूरै तिथून परत रेल्वेने.

[लेख लिहिले आहेत पण ते सध्या दिसत नाहीत.]

ही ठिकाणं एकमेकांशी बसने चांगली जोडलेली आहेत. उगाचच रामेश्वरम ते कन्याकुमारी जाऊ नये. अर्थात आमचे आम्हीच असल्याने कुणाचा प्लानबद्दल आग्रह नसतो. पण ग्रूपने आणि तीन चार कुटुंबे ( लहान,तरूण,थोर एकत्र) असली की प्लान चटपटीत ठेवता येत नाही. 

[ चेन्नई, त्रिची आणि मदुरै तीन ठिकाणी विमानसेवा आहेच.]

 

 


In reply to by साहित्ययात्री

तमिळ आणि फ्रेंचचा थोडा अधिक अभ्यास झाल्यावर पुढे कधीतरी जाईन म्हणतो. तिथला समुद्रकिनारा बरा नाही आणि शाकाहारीच असल्याने फारसा उत्साह नाही. बघू नंतर कधी.