अगदी, अगदी.
रामेश्वरम मला आवडलेल्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
लेख खरोखरच पर्यटकास मार्गदर्शक आहे.
मदुराई, रामेश्वरम,कन्याकुमारी,त्रिवेंद्रम अतिशय निसर्ग संपन्न पर्यटन आहे.
उत्तम, माहितीपूर्ण लेख आवडला. आर्थिक, शारीरिकदृष्ट्या झेपते आहे, तोवर भरपूर फिरून घ्यावे.
मला अजून खूप काही फिरायचे, बघायचे आहे (उदा. रशियातील संग्रहालये) पण सध्यातरी जास्त चालणे शक्य होत नसल्याने यापुढे कितपत जमेल याची शंकाच आहे.
नक्कीच करून पाहा. रेल्वे प्रवासाचे फायदे बरेच आहेत.
आठशे किमी किंवा अधिक प्रवासाला कार उपयोगाची नाही.
तुमच्या अहिल्या नगरला जवळचे मेन लाईन स्टेशन मनमाड आहे आणि तिकडून खूप गाड्या आहेत. भोपाळ, किंवा कोटा येथे जाऊन पुढचा आणखी प्रवास करून म.प्रदेशातील ठिकाणे किंवा राजस्थानातील ठिकाणे करून परत मनमाडला येणे शक्य आहे.
खूप छान रीतीने सर्व माहिती सांगितलीत कंजूस सर.
मला तुमचं या गोष्टीचं फार कौतुक वाटते की तुम्ही त्या त्या भागातील लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करता.
आम्ही एकतर हॉटेल्स स्वतः बुक करून स्वतःची गाडी घेऊन फिरतो किंवा पूर्णपणे प्रवास कंपन्यांवर अवलंबून राहतो.
असं तिकडे जाऊन तिकडचं तिकडे प्रवासाचं बघू अशी हिम्मत अजून कधी केली नाहीये.
हो. गेलो.
आता जो धनुष्कोडीचा रस्ता आहे त्याच्याच डावीकडे पाचशे मिटर्सवर जुना मार्ग आहे( होता) . गाव, बाजार, रस्ता आणि रेल्वेही होती. श्रीलंकेशी( सिलोनशी )व्यापारही चालायचा. गावांत वस्तीही होती. रेल्वे स्टेशन, पाण्याची टाकी ( वाफेच्या एंजिनास पाणी देता यावे यासाठी) होती त्यांचे खांब उरले आहेत. देवळे आणि चर्चाही होते. मला लहानपणीची एका मावशीचे चारधाम यात्रेचे बोल आठवतात. ती साठ साली यात्रा करून आलेली. - "धनुष्कोडीला रामेश्वरहून जाण्यासाठी आगगाडीत बसलो. रेल्वेचे लोक आले आणि सांगितले की वाटेत वारा फार जोरात आहे तरीही खिडक्या अजिबात बंद करायच्या नाहीत. गाडी ढकलली जाईल." - तर यानंतर १९६४ मध्ये मोठी सुनामी आली आणि ती गाडी प्रवाशांसह समुद्रात वाहून गेली. तो सर्व पट्टाच गाव वस्तीसह बुडाला. त्यांचे एक टक्का अवशेष राहिलेत.
जाताना एक पाटी लागते " no drone zone area." इथून ड्रोन उडवले तरी ते काय भारताची सागरी हद्द ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीपर्यंत जाणार आहेत का असा विचार आला. ( धनुष्कोडी ते तलैमानार अंतर २४ किमिटर आहे. इथून श्रीलंका दिसते असं खोटंच सांगतात) तरीही काही यूट्यूबर उद्योग करतात आणि पोलिस ते जप्त करतात आणि नंतर तंबी देऊन सोडतात. असा एक विडिओ पाहिला आहे.
तसे रामेश्वरम् हे पौराणिक , ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थान आहे. कन्याकुमारीपेक्षा इथे जरा जास्तीच आपलेपणा वाटतो.
चर्च, रेल्वेस्थानक, रेल्वे रूळ,गावातल्या वसाहती सर्व खुणा बघितल्या. काही फोटो आहेत कायप्पावर शेर करतो.
आतामात्र भरपूर बदलले आहे असे कळते.
कन्याकुमारी व रामेश्वरम अतिशय शांत पर्यटनस्थळे होती आता भरपूर गर्दी असावी.
काही बदल नाही.
कारण १९६४ च्या सुनामीनंतर सरकारने निर्णय घेऊन टाकला " नो डेव्हलपमेंट झोन" . त्यामुळे इथे काहीही बांधकाम होत नाही. आपल्या वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने गेल्यासच त्या तीन चार जागांवर थांबून पाहता येतात. पण बसने गेल्यास थेट शेवटच्या अरैच्चल मुन्नाईलाच सोडतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहिल्याने कल्पना आलीच होती आणि वेळ घालवला नाही. तसेही इकडे ऊन फारच जाणवते वारा असला तरी. तिकडे समुद्रकाठाशी थोडी वाळू असलेल्या ठिकाणी काही लोक आंघोळी करत होते आणि पाणी फारच स्वच्छ होते. अग्नितीर्थावर स्नान करण्यापेक्षा खूपच चांगले. तुमचे फोटो पाहिले आणि अजूनही तसेच ओसाड आहे. फक्त एक बदल झाला तो म्हणजे एक वॉच टॉवर उभारला आहे. दीपगृह नाही.
कन्याकुमारीला २०१०, २०१२ ला गेलो होतो.
तिकडे मात्र गर्दी शंभरपट वाढली आहे. मागच्या डिसेंबरला विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लुवर स्मारक या दोन खडकांदरम्यान काचेचा पूल उभारला आहे त्यामुळे गर्दी वाढली. बरेचसे पर्यटक केरळ सहलीतून तिरुवनंतपुरमहून कन्याकुमारीला येतात. तिकडे पद्मनाभस्वामी मंदिरातला खजिना हे एक २०११ पासूनच गर्दी खेचण्याचं कारण आहे. केरळ पर्यटक यादीत किती वरती आहे ते समजू शकते.
छान लेख..
नुकतेच कंपनीच्या कामासाठी चेन्नई ला जाणे झाले..
तेंव्हा महाबलिपुरम साठी ऑफिस वाल्यान्च्या नकळत टाइम काढला..
खुप्पच सुंदर वाटले तेथील शिल्प मंदिर पाहून..
रामेश्वरम पण नक्कीच जाईल
कोणत्या वेळात , काय पाहावे इ. माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितली आहे . या भागातील सहल आखतांना निश्चितच उपयोगी ठरेल .
कन्याकुमारी वगळता तामिळनाडूत भटकंती झालेली नाही . पुढची पिढी घर, व्यवसाय सांभाळण्यात सक्षम झाल्याने आमच्या भटकंती ग्रुपकडे बऱ्यापैकी वेळ असतो आणि त्यामुळेच रेल्वे प्रवास वेळखाऊ असला तरी पहिली पसंती रेल्वेलाच .
तमिळनाडू तसे मोठे राज्य आहे आणि काही वारसा स्थळे, काही पर्वतीय स्थाने, काही समुद्र किनारे आणि अनेक पौराणिक तसेच ऐतिहासिक देवळे त्यात आहेत. त्यामुळे आम्ही हे तीन भागांत ( तीन वेगळ्या सहलींत) पाहिले. साधारण पाच सहा दिवसांची एक सहल.
राज्याचा नकाशा , ठिकाणे आणि तिकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे पाहून सहली आखल्या. एका ठिकाणी रेल्वेने पोहोचायचं आणि मग पुढील पाच सहा ठिकाणं बसने जाऊन /राहून पाहात शेवटच्या ठिकाणाहून रेल्वेने परत असे. घाई होत नाही.
उटी कुन्नूर हे म्हैसूर बेंगळूरू सहलीत होते. तर कन्याकुमारी केरळ सहलीत करणे सोपे जाते.
१.कल्याण ते कांचिपूरम रेल्वेने...मामलापूरम...वेल्लोर पाहून येणे..तिरुपती.. तिथून रेल्वेने परत.
२. कल्याण ते चिदंबरम रेल्वेने....कुंभकोणम..तंजावूर...तिरुचिरापल्ली तिथून परत.
३. कल्याण ते चेन्नई रेल्वेने...रामेश्वरम....मदूरै तिथून परत रेल्वेने.
[लेख लिहिले आहेत पण ते सध्या दिसत नाहीत.]
ही ठिकाणं एकमेकांशी बसने चांगली जोडलेली आहेत. उगाचच रामेश्वरम ते कन्याकुमारी जाऊ नये. अर्थात आमचे आम्हीच असल्याने कुणाचा प्लानबद्दल आग्रह नसतो. पण ग्रूपने आणि तीन चार कुटुंबे ( लहान,तरूण,थोर एकत्र) असली की प्लान चटपटीत ठेवता येत नाही.
[ चेन्नई, त्रिची आणि मदुरै तीन ठिकाणी विमानसेवा आहेच.]
तमिळ आणि फ्रेंचचा थोडा अधिक अभ्यास झाल्यावर पुढे कधीतरी जाईन म्हणतो. तिथला समुद्रकिनारा बरा नाही आणि शाकाहारीच असल्याने फारसा उत्साह नाही. बघू नंतर कधी.
प्रतिक्रिया
एकदा तरी रामेश्वर पाहण्याची इच्छा होतेच.
उत्तम, माहितीपूर्ण लेख.
भारीच,मी तुमच्याकडून एकदातरी
नक्कीच करून पाहा. रेल्वे
In reply to भारीच,मी तुमच्याकडून एकदातरी by Bhakti
खूप छान रीतीने सर्व माहिती
कसे जावे, कुठे राहावे, काय
हो. गेलो.
In reply to कसे जावे, कुठे राहावे, काय by प्रचेतस
२००७ मधे गेलो होतो.
In reply to हो. गेलो. by कंजूस
काही बदल नाही.
In reply to २००७ मधे गेलो होतो. by कर्नलतपस्वी
कन्याकुमारीला २०१०, २०१२ ला
In reply to २००७ मधे गेलो होतो. by कर्नलतपस्वी
उत्तम, माहितीपूर्ण लेख आवडला.
छान लेख..
लेख आवडला
लेख दिसत नाही
हा लेख का दिसत नाही?
लेख "कलादालन" या विभागात लिहिला होता.
In reply to लेख दिसत नाही by रीडर
तो विभाग मिपा जडणघडण drupal 11 update मध्ये बंद झाला त्यामुळे लेख दिसत नाही. मालकांना विनंती केली आहे.
माहितीबद्दल धन्यवाद
In reply to लेख "कलादालन" या विभागात लिहिला होता. by कंजूस
माहितीबद्दल धन्यवाद
प्रतिसाद
प्रतिसादही दिसत नव्हते. नवीन प्रतिसाद दिल्यानंतर आधीचे दिसत आहेत. पण लेख नाहीच दिसतए
8 रात्री 9 दिवस प्लॅन
आमचा प्लॅन असा होता
दिवस 1
मुंबई - चेन्नई विमान
चेन्नई दर्शन (फयान वादळ आल्यामुळे हॉटेल मध्येच मुक्काम )
दिवस 2
चेन्नई - तिरुचिरापल्ली तेजस एक्सप्रेस
तिरुचिरापल्ली इथे स्टेशन वर 1 तास काढून मैलाडूतुराई जनशताब्दी णने तंजावर
दिवस 3 & 4
तंजावर
बृहदिश्वेर मंदिर, ऐरावतेश्वर, तांजवर महाल आणि लायब्ररी
दिवस 5
तंजावर हुन टॅक्सी ने तिरुचिरापल्ली
त्रिची हुन परत तेजस एक्सप्रेस ने मदूराई
मदुराई station हुन मुथुवानी बस stand आणि मग TSRTC च्या एसी बस (2.10Pm) ने रामेश्वर
Day-06
रामेश्वर आणि धनुश्यकोडी
Day-07
रामेश्वर -मदुराई मीनाक्षी मंदिर - मदुराई मुक्काम
Day-08 मदुराई - मुंबई विमान
प्लान चांगला आहे आणि बरीच मुख्य ठिकाणं तुम्ही पाहिली आहेत.
In reply to 8 रात्री 9 दिवस प्लॅन by साहित्ययात्री
तमिळनाडू तसे मोठे राज्य आहे आणि काही वारसा स्थळे, काही पर्वतीय स्थाने, काही समुद्र किनारे आणि अनेक पौराणिक तसेच ऐतिहासिक देवळे त्यात आहेत. त्यामुळे आम्ही हे तीन भागांत ( तीन वेगळ्या सहलींत) पाहिले. साधारण पाच सहा दिवसांची एक सहल.
राज्याचा नकाशा , ठिकाणे आणि तिकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे पाहून सहली आखल्या. एका ठिकाणी रेल्वेने पोहोचायचं आणि मग पुढील पाच सहा ठिकाणं बसने जाऊन /राहून पाहात शेवटच्या ठिकाणाहून रेल्वेने परत असे. घाई होत नाही.
उटी कुन्नूर हे म्हैसूर बेंगळूरू सहलीत होते. तर कन्याकुमारी केरळ सहलीत करणे सोपे जाते.
१.कल्याण ते कांचिपूरम रेल्वेने...मामलापूरम...वेल्लोर पाहून येणे..तिरुपती.. तिथून रेल्वेने परत.
२. कल्याण ते चिदंबरम रेल्वेने....कुंभकोणम..तंजावूर...तिरुचिरापल्ली तिथून परत.
३. कल्याण ते चेन्नई रेल्वेने...रामेश्वरम....मदूरै तिथून परत रेल्वेने.
[लेख लिहिले आहेत पण ते सध्या दिसत नाहीत.]
ही ठिकाणं एकमेकांशी बसने चांगली जोडलेली आहेत. उगाचच रामेश्वरम ते कन्याकुमारी जाऊ नये. अर्थात आमचे आम्हीच असल्याने कुणाचा प्लानबद्दल आग्रह नसतो. पण ग्रूपने आणि तीन चार कुटुंबे ( लहान,तरूण,थोर एकत्र) असली की प्लान चटपटीत ठेवता येत नाही.
[ चेन्नई, त्रिची आणि मदुरै तीन ठिकाणी विमानसेवा आहेच.]
पुदुचेरी पॉंडिचेरी यातून गाळलं आहे.