मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

साहित्य संपादक · · मिपा कलादालन
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर

वाचने 102816 वाचनखूण प्रतिक्रिया 288

In reply to by सुक्या

राघव गुरुवार, 07/08/2021 - 17:53
सगळेच फोटो उत्तम. पहिला जास्त भावला, कदाचित अशा ठिकाणी जायची माझी ईच्छा असल्यामुळे असेल! शेवटचा फोटो बघून काजवा महोत्सवातील काजव्यांनी डवरलेल्या झाडाच्या वर्णनाची आठवण झाली! :-)

टर्मीनेटर Sat, 07/03/2021 - 15:34
सर्वच मिपाकरांचे फोटो भारी आहेत...👍 हा धागा म्हणजे खरंच उत्तमोत्तम फोटोज पाहण्याची पर्वणी आहे. मी सुद्धा आज पासून भरपूर फोटोज टाकणार आहे... 😀

टर्मीनेटर Sat, 07/03/2021 - 18:14
तवसाळ ते जयगड फेरी बोट. चंद्रोदय. वरच्या फोटोत एकाच वेळी जेट्टीच्या डाव्या बाजूला दिसणारा चंद्रोदयाचा तर खालच्या फोटोत जेट्टीच्या उजव्या बाजूला दिसणारा सूर्यास्ताचा देखावा. सूर्यास्त. - - : - - : - - खाडी. फेरी बोटीतून दिसणारी खाडी आणि परिसर.

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर Sat, 07/03/2021 - 19:25
त्या दिवशी चंद्राचे तेजच काही विलक्षण होते.. खालचा जयगडला उतरल्यावरचा फोटो. चंद्र

कॉमी Sat, 07/03/2021 - 18:59
तापोळा-





शिवराज धाबा कराड इथली सुंदर प्रतिमा- शिवराय बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य

In reply to by गुल्लू दादा

प्रचेतस Sun, 07/04/2021 - 20:57
दोनेक वर्षांपूर्वीच मेळघाटात गेलो असल्याने सातपुड्याचं सौंदर्य जवळून माहीत आहे. काय सुरेख आणि अनाघ्रात जंगल आहे राव. सिपना, गडगा नद्या पण अविस्मरणीय. शहानूर ते धारणी प्रवास हा तर जंगलाच्या मध्यभागातून होतो, जबरी.

कंजूस Sun, 07/04/2021 - 21:37
श्रीशैलंम अभयारण्यसुद्धा मेळघाटासारखंच आहे (मेळघाटाचे फोटो पाहिले, श्रीशैलंमला गेलोय.). तिथेही अस्वलं आहेत. पाऊस फार कमी. पानगळीचे वृक्ष.

चांदणे संदीप Mon, 07/05/2021 - 15:13
माझे अलीकडेच मोबल्यातून काढलेले काही बरे फोटो १) कुंडीतली मेथी 1 २)अनामिकेची कळी 2 ३) रानफुलं 3 ४) भूछत्री 4 ५) रूईचं झाड 5 ६) इस्टर आयलँडवरच्या शिल्पांसारखा उभा असलेला एक दगड 6 नव्या मोबल्यामध्ये बरा कॅमेरा असल्याने नुसता क्लिकक्लिकाट सुरू आहे. सं - दी - प

हॅरी पॉटर Mon, 07/05/2021 - 23:43
मंडळी मला फोटो काढायची हौस आहे पण फुलाची जास्त नावं माहित नाहीत. काही चुकले तर सांगा. कामिनी नाकतोडा कमळ मशरूम शेताजवळील नजारा कमळ पैसा लाजाळूची फुले गुलाबाचे फुले

कंजूस Tue, 07/06/2021 - 05:19
पांढऱ्या फुलांचा फोटो बऱ्याचदा चांगला येत नाही कारण प्रकाश परावर्तित होतो. कमळं आवडली. टबात लावली आहेत!

कंजूस Tue, 07/06/2021 - 05:26
बदामी गुहा पाहायला आलेली शाळेची मुलेमुली. बदामिची शाळेची सहल.
७
( जोड्यांची रांग करून तिथून नेतात आणि शिक्षक पुढे चला पुढे चला करत असतात. बसमध्ये परत चढताना मुले मोजणे. शाळेच्या वहीत शैक्षणिक सहल नेऊन आणल्याची नोंद. हीच पद्धत सर्व ठिकाणी वापरली जाते.)