मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तांबट...

जयंत कुलकर्णी · · कलादालन
काल काही तांबटचे फोटो मिळाले. ह सहसा बाहेर येत नाही व ओरडतांना मानेची फार मस्त हालचाल करतो. तांबट टाके भांड्यावर टाके मारताना ज्या तालात आवाज येतो तसा काहिसा याचा आवाज आहे.... १ ४ चतूर.. आशा आहे हे तुम्हाला आवडतील. जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:

वाचने 10331 वाचनखूण प्रतिक्रिया 23

In reply to by पिंगू

जयंत कुलकर्णी Tue, 05/22/2012 - 19:25
खरे म्हटले तर गेले १०/१५ दिवस मी यांची हालचाल बघत होतो व त्यांच्या मागावर होतो. पण या फोटोच्यावेळी म्हणाल तर मी एक्म्दरीत ३ तास वाया ( ?) घालवले असतील :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

jaypal Tue, 05/22/2012 - 19:38
वाया ( ?) घालवले असे लिहु / म्हणु नका. फोटो असो किंवा हिमलय चढाई असो हौसेला मोल नसतं. ( पिक्सल काहीश्या फाटल्या सारख्या जाणवतात ते वगळता)फोटो क्र. ३ आवड्ला.

सुधीर Wed, 05/23/2012 - 23:25
आजकाल शहरात तर पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत (कावळे आणि कबुतरंच जास्त दिसतात. पोपट, दयाळ, साळुंखी आणि आता चिमण्यांची पण संख्या रोडावतेय). तुम्हाला हा तांबट कुठे दिसला?

In reply to by जयंत कुलकर्णी

सुधीर गुरुवार, 05/24/2012 - 11:07
झकास! मी पक्षी प्रेमी नाही, पण ४ वर्षापूर्वी मुंबईच्या उपनगरात रहायला गेल्यावर. पोपट, बुलबुल, दयाळ, साळुंखी आणि खारुताई यांची फार जवळून ओळख झाली. कारण हे सगळे पाहुणे आमच्या खिडकीतून दिसतात. मुंबईत ते दुर्मिळ! शिवाय बर्‍याच वेळा पहिलंय, कावळे अशा पक्षांना झाडावरून हुसकून लावताना. (चु.भु.द्या.घ्या.) कावळा आणि कबुतर मात्र माणसांना फारशी घाबरत नाहीत, कावळा थेट हातातून चपातीचा तुकडा पण घेऊन जातो. दुधाच्या साईसाठी तर कावळे फार झोंबाझोंबी करतात. खिडकीत ठेवलेले तांदुळ टिपताना, चिऊताई आपापसातच जास्त भांडतात असं वाटतं. (खिडकीत येणार्‍या-दिसणार्‍या पक्षांच्या निरिक्षणावरून केलेले अनुमान) तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात (अगदी टाटा बिर्ला पेक्षाही). तुमचा "मैत्र!" लेख आवडला! पुण्यात राहता का तुम्ही? कदाचित, म्हणून तुमचा परिसर पक्षीसमृद्ध असावा?

In reply to by जयंत कुलकर्णी

नरेंद्र गोळे Sun, 05/27/2012 - 10:23
स्वाक्षरी-अंकित चित्रे जशी वज्रचुडेमंडित सौभाग्यवतीची आठवण करून देतात, तशी ही अप्रक्रियित प्रकाशचित्रे रानात फिरणार्‍या निरागस अवखळ लंकेच्या पार्वतीची आठवण करून देतात. तरीही मुग्ध प्रफुल्लित अप्रक्रियित प्रकाशचित्रांवर मन का जडते ते समजत नाही ! सारीच प्रकाशचित्रे सुंदर असली. तरी ही अधिक भावली, हे सांगण्याकरताच हा प्रतिसाद देत आहे!

ऋषिकेश गुरुवार, 05/24/2012 - 11:08
तांबट वड, उंबर अश्या छोटी उग्र फळे असणार्‍या झाडांवर हमखास आढळतात. अगदी मुंबईतही! फोटो छान आला आहे

कान्होबा गुरुवार, 05/24/2012 - 13:26
आहाहा फटू छान आहेत. चतुर चा फोटो पाहुन लहानपणी च्या खेळाची आठ्वण झाली. हात मारुन गवतात फिरणारे चतुर आणी चतुर वर्गातिल सुई हा जीव पकडायचा आणी त्याच्या पायाला सुत बांधुन सोडुन द्यायचे.पण ते गवतात फिरत असताना त्यांच्या मागे मागे दबकत दबकत जाउन पकड्ण्यात वेगळीच मजा होती. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी