Skip to main content

क्रोशे - कॉलर

क्रोशे - कॉलर

Published on गुरुवार, 16/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
ही सोलोमन्स नॉट किंवा रुद्र गाठ ने तयार केलेली कॉलर आणि त्यावर गुलाबाचं फुल Crochet Collar" width="480" height="360" alt="" />
लेखनविषय:

याद्या 12226
प्रतिक्रिया 52

तुमच्या कलेला शब्द अपुरे पडतील! Smiley

In reply to by टुकुल

ह्याचा खूप ठिकाणी वापर करता येतो. ड्रेसची कॉलर,ड्रेसला बॉर्डर. माझ्या आईने तर माझ्यासाठी अख्खी ओढणी विणली होती. काय मिरवले होते मी ......... :) गुलाबाचं फुल लहान मुलांच्या फ्रॉकवर, बिब्सवर, हेअर बँडवर......!! तुमच्या कल्पकतेप्रमाणे अजूनही वापरता येईल.

In reply to by जयवी

छान.. बायकोला तुमचे धागे दाखवले, तिला पण आवडले, पण तो गाठीचा व्हिडियो आणी जवळचा कुणी मार्गदर्शक नसल्यामुळे फक्त पाहुन कौतुक करण्यापुरती आवड उरली.. --टुकुल

ही सोलोमन्स नॉट किंवा रुद्र गाठ ने तयार केलेली कॉलर आणि त्यावर गुलाबाचं फुल
अधोरेखित बोल्ड शब्दावरून या कलाकृतीचं स्थान आणि उपयोग समजत नैये का तुम्हाला? :-o जयश्रीतै, तुमच्यातल्या पेशन्सला आणि कलेला सलाम! सलाम!! सलाम!!!

कौशी,पिंगू, इन्दुसुता, प्रास, मदनबाण........ तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं :) पिंगू....... तुझ्या प्रश्नाचं उत्तर टुकुल ला लिहिलेल्या प्रतिसादातच दिलंय. प्रास....... :) ह्याला लव्हर्स नॉट पण म्हणतात ;)

फारच सुंदर. एवढीच एक हौस राहिली. फ्रॉकला क्रोशेची कॉलर. तसा फ्रॉक शिवू म्हणेपर्यंत मी उंच झाले. आता माझ्या नातीला असा फ्रॉक शिवून नि कॉलर लावून हौस पूर्ण करीन.;) तुझ्या क्रोशेकामात किती सफाई आहे.

In reply to by ५० फक्त

हॅ हॅ हॅ बघा बुवा, बालविवाहास अजून मान्यता नाहिये.;) आत्ता कुठं भुईतनं वर येतय आमचं अपत्य. मी भविष्यातलं स्वप्न रंगवलं एवढच.;)

In reply to by रेवती

छे छे, मी बालविवाहाबद्दल बोलत नाही हो, मी तर तुमच्या मंडळात नाव नोंदवलेल्या मिपाविरांबद्दल बोलतोय.. उदा........., जाउदे किती नावं लिहिणार, आणि पुन्हा आमचं नाव नाही म्हणुन शिव्या खाणार.

नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं बनवलंत ते सांगितलं तर उपयोगी पडेल. नुसतंच कौतुक हवं असेल तर फेस्बुकावर फोटो टाकत चला.

In reply to by शिल्पा ब

शिल्पा, कौतुक सगळ्यांनाच आवडतं. त्यासाठीच हे कलादालन आहे. कसं केलंय हे कुणी विचारलं तर मी लगेच व्हिडियो टाकला आहे. जरा....... बोलायची पद्धत सुधारावीस असं सुचवावंसं वाटतं.

In reply to by जयवी

जरा....... बोलायची पद्धत सुधारावीस असं सुचवावंसं वाटतं. असेच म्हणतो

In reply to by जयवी

मग पाककृतीदालनात सुद्धा काय केलं याचे फोटोच टाकावेत असं सुचवते... राहीली बोलण्याची पद्धत ...तर ती जित्याची खोड आहे..नुसतंच गुळुमुळु बोलायची सवय नाही आम्हाला... हेच बाकीच्या खालच्या +१ -१ वाल्यांना सुद्धा..

In reply to by जयवी

हे बघा , त्या पण अनिवासी अन तुम्ही पण अनिवासी. तुम्हीच आपापसात भांडु लागल्या तर कसे होणार? --(अनिवासी युनियनचा स्व्यंघोषित खजिनदार) कुंदन

In reply to by शिल्पा ब

नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं बनवलंत ते सांगितलं तर उपयोगी पडेल. नुसतंच कौतुक हवं असेल तर फेस्बुकावर फोटो टाकत चला प्रचंड असहमत अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार मला नाही , मात्र एक निरीक्षण नोंदवले

In reply to by स्पा

काही जणांना उगाच खुसपटं काढण्याची सवयच असते स्पाभौ. छिद्रान्वेषी म्हणा हवं तर. :)

In reply to by सूड

साठा असु द्यावा म्हणुन ठेवतेय..पण गरज नै.. अन आम्हीसुद्धा कौतुकानेच म्हणतोय की जे काय केलंय ते छान आहे अन आम्हीसुद्धा करुन पाहु...व्हीडीओ टाका म्हणुन. लोकांना चांगल्यातसुद्धा खुसपटंच बघायची सवय असते त्याला आमचा प्रचंड नाईलाज आहे.

In reply to by शिल्पा ब

>>लोकांना चांगल्यातसुद्धा खुसपटंच बघायची सवय असते बरं झालं तुम्हीच बोललात. मी तेच म्हणणार होतो, मनातलं बोललात बघा.

In reply to by सूड

लोकं मनातलं बोलत नाहीत आम्ही बोलतो हाच काय तो फरक. यावेळेस आपली मते जुळली हे वाचुन आनंद जाहला.

In reply to by शिल्पा ब

रा ई ट बोल्लात ताई तुमी, तसंबी नुसत्याच प्रतिसादाला आगापिछा कशाला हवा ? हे आपलं ठाम म्हणनं आहे.

In reply to by शिल्पा ब

बिग बझारवाले हॉकिन्सचा कुकर विक्रीला ठेवतात म्हणून हॉकिन्सच्या मालकाने इतर दुकानदारांना आपापल्या दुकानात विक्रीला ठेवू देऊ नये असे तर नाही ना? जोवर दुकानदारांना तो कुकर विक्रीला ठेवायला वावगं वाटत नाही, तोवर हॉकिन्स कंपनीने तो विक्रीला कुठे ठेवू देऊ नये, ह्याचा विचार ग्राहकांनी/आम आदमीने शिजवत बसण्याची गरज नाही. आणि राहिला प्रश्न ग्राहकाचा, तर बिग बझारमध्येही एरंडेल मिळते आणि कोपर्‍यावरील वाण्याच्या दुकानातही मिळते. पोट साफ होत असेल तर कुठून विकत घेतलंय, कोणी विकलंय, कोणाला कुठे काय विकायचा हक्क आहे, हे प्रश्न पडत नाहीत. आपला, (मिपाकर) प्रशांत

In reply to by प्रशांत उदय मनोहर

अरे वा!! आपले अनुभव इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही कुठलं एरंडेल घेतलं शेवटी? नै म्हणजे तोच प्रॉब्लेम अजुनही जाणवतोय म्हणुन ते ठीकाण यादीतुन काढुन टाकेन म्हणते.