नमस्कार!
आकाशकंदिल बनवणे हा एक अवघड प्रकार असतो असं नेहमीच वाटत असल्यामुळे मी आकाशकंदिल बनवण्याच्या भानगडीत कधीच पडलो नाही. पण काही दिवसांपुर्वीच मिपावर प्रिया-ताईंचा "पारंपारीक आकाशकंदिल" हा धागा वाचला (https://www.misalpav.com/node/19394) आणि वाटलं "अरे! हे तर भारीच सोप्प प्रकरण आहे :) त्यात मनासारखं साहित्यंहि मिळालं मग अजुनच हुरुप आला अणि बनवला आकाशकंदिल :)


धन्यवाद प्रियाताई :)
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!! :)
(मराठी टंकलेखनात काहि चुका झाल्या असल्यास (चुकिचा काना, मात्रा, वेलांटी इ.) माफ करावे. मोकळेपणाने निदर्शनास अणाव्यात, त्याची मनापासुन दखल घेतली जाईल व चुका सुधारल्या जातील :) )
वाचने
4312
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
सुरेखच बनवला आहे आकाशकंदिल
त्या खालच्या झिरमुळ्या थोड्या लांब हव्या होत्या अजून.
धन्यवाद वल्ली अहो, त्या
In reply to मस्त by प्रचेतस
धन्यवाद वल्ली :)
अहो, त्या झिरमळ्याचा पेपर ऐनवेळेस कमी पडला (माझ्या अगाऊपणा मुळे) म्हणुन आहे त्यात भागवावं लागलं :(
:)
मस्त जमलाय.. आवडला. मी पण
मस्त जमलाय.. आवडला.
मी पण मागील धाग्यावरुन कालच एक आकाश कंदिल बनवला...
बेस्ट
बेस्ट :)
आकाशकंदील छानच
आकाशकंदील छानच झालाय.
नक्षिदार कागद भारी मिळालाय.
आम्हाला ग्रेट कागद नाही मिळाले.
घरी होते त्यात असाच बनवलाय.
प्रिया ब तैंनी यावर्षी अनेक मिपाकरांना कंदील करायला भाग पाडल्याबद्दल धन्यवाद!
(No subject)
In reply to आकाशकंदील छानच by रेवती
:)
छान झालाय
छान झालाय कंदिल....
धन्यवाद!!!
वल्ली, गणेशा, पियुशा, रेवती आणि प्रिया तुम्हा सर्वांना मनापसुन धन्यवाद :)