दिवाळी अंक २०२१ : नान खटाई (without oven)
खुसखुशीत नानखटाई / नानकटाई ( without oven)
आज हमारे पास चकली है, शेव है, चिवड़ा है, करंजी है..
तुम्हारे पास क्या है हयाई?
हमारे पास नान खटाई है भाऊ!
लै ड्रामा झाला ना, आता डायरेक्ट रेसिपी बघू :)
मी इथे प्रमाण measuring cupनुसार देतेय. पण जर तुमच्याकडे नसतील तरी फिकर नॉट! घरची कुठलीही एक वाटी किंवा बाउल सेट करा आणि त्यानुसार प्रमाण घ्या.
एक मोठी परात घ्या. त्यात अर्धा कप तूप घाला. मी साजूक वापरलं आहे. तुम्ही डालडासुद्धा वापरू शकता, फक्त ते वितळलेलं नको.
आता हे तूप हातानेच छान फेटून घ्यायचं आहे. अगदी हलकं आणि मलाईसारखं व्हायला हवं. याला किमान ७-८ मिनिटं लागतील.
फेटून झाल्यावर ते असं दिसेल -
रंग आणि texture असं झालं की बास्स...
मग त्यात घालायची पाव कप पिठीसाखर. परत एकदा 'चक्की पिसिंग पिसिंग'च्या तालावर फेटून घ्यायचं.
आता यामध्ये add कारायचा एक कप मैदा, २ टेबल स्पून बेसन, एक टेबल स्पून रवा आणि अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर!
आता हे सर्व साहित्य मळून घ्यायचं. नान खटाईचं पीठ तयार आहे.
आता एका जाड बुडाच्या कढईत एक स्टँड ठेवायचा.
कढ़ई झाकण ठेवून १० मिनिटांसाठी medium फ्लेमवर प्रीहीट (pre-heat) करून घ्यायची.
आता बेकिंगसाठी एका सपाट ताटाला /परातीला aluminium फॉइल पेपर लावून घेतलाय, बटर पेपर असल्यास तो लावा.
दोन्ही नसल्यास तुपाचा हात लावून घ्या परातीला. आता त्या परातीत नान खटाई ठेवून घ्यायच्या.
मळलेल्या पिठाचा साधारण मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन तो हातावर गोल करून मग त्याला थोडा चपटा आकार द्यायचा.
अशा थोड्या अंतरावर ठेवा खूप चिकटून ठेवू नका, कारण त्यांचा आकार बेकिंगच्या वेळी फुलतो.
यावर तुम्हाला आवडतील ते ड्राय फ्रूट्स लावा.
आता ही परात कढईमध्ये बेक होण्यासाठी ठेवा.
झाली का नान खटाई? झाली का नान खटाई ? म्हणून सारखं सारखं झाकण उघडून पाहू नका. डायरेक्ट १५ मिनिटांनी एकदा चेक करा एक मंद सुगंध यायला लागतो आणि कडा थोड्या गडद दिसायला लागतात.
slow फ्लेमवर २०ते २५ मिनिटं बेक होऊ द्या.
२०ते २५ मिनिटांनी गॅस बंद करा.
आणि परात बाहेर काढून घ्या. लगेच नान खटाई उचलायला जाऊ नका (हावरट कुठले असा आवाज येतो म्हणे ताटातून.) गरम गरम नान खटाई नाजूक आणि मऊ असते, ती पूर्ण गार होऊ द्यायची. मगच खायची आणि उरली तर एअर टाइट डब्यात / कंटेनरमध्ये भरून ठेवायची.
सोप्पी आहे की नाही? फ़ोटो बघून दिल गार्डन गार्डन झाला की नै?

वाचने
8954
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
शप्पथ!
मस्त
तोंपासू
कहर आहे
थोडेसे 1/2 थेंब (vanila
तसेच रोझ इसेन्स, गुलाब
खूप दिवसात खाल्लीच नाही.
रेसिपी आणि फोटो आवडले ...
आहाहा... :)
मदनबाण.....
@ मदनबान , कुठल्याही गोष्टीचा
यम्मी :)
झक्कास पाकृ!
In reply to झक्कास पाकृ! by जुइ
एकदा करून बघते.
हा पदार्थ
खुपच छान दिसते .मी नक्की करून
नान कटाई हल्ली ........
मस्त