Skip to main content

तुलाच आज पाहतो

लेखक मी-दिपाली यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

तुलाच आज पाहतो

वृत्त : कलिंदनंदिनी लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा (मात्रा :२४)


फुलांत श्वास गुंफता लयीत साज पाहतो कवेत घेत कल्पनी तुलाच आज पाहतो अधीर वारियास मी कसेतरी दटावतो चुकार त्या बटांमध्ये खुशाल माज पाहतो हसून बोलसी जशी नभात वीज तोलसी अनाहतात नाद तो जपून गाज पाहतो अबोध पापणी तुझी कुठूनही खुणावते मिटून लोचनांस घे, खळीत लाज पाहतो असे कसे गं चांदणे, चुरा करून सांडले लवून वेच साजणी, दुरून बाज पाहतो कधी फुलेल अंगणी वसंत मी विचारतो तुझाच छंद बावळा, दुजे न काज पाहतो
दिपाली


वाचने 9467
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वाह ! आवडली रचना. ''हसून बोलसी जशी नभात वीज तोलसी अनाहतात नाद तो जपून गाज पाहतो'' ख़ासच. -दिलीप बिरुटे

असे कसे गं चांदणे, चुरा करून सांडले लवून वेच साजणी, दुरून बाज पाहतो
सुं-द-र

👍

हसून बोलसी जशी नभात वीज तोलसी अनाहतात नाद तो जपून गाज पाहतो अबोध पापणी तुझी कुठूनही खुणावते मिटून लोचनांस घे, खळीत लाज पाहतो असे कसे गं चांदणे, चुरा करून सांडले लवून वेच साजणी, दुरून बाज पाहतो निव्वळ अप्रतिम.. पुन्हा पुन्हा वाचावी अशी... आत्ताच तीनदा वाचली कविता..


@मी-दिपाली

'तुलाच आज पाहतो'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


सुरेख, गणेशा म्हणाला तशी, पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते, पैजारबुवा,

असे कसे गं चांदणे, चुरा करून सांडले लवून वेच साजणी, दुरून बाज पाहतो.... क्या बात