Skip to main content

राजसा

लेखक पुर्णिमा देसाई यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

राजसा

किती उमलू मी किती बहरू मी नजाकतीने वार्‍यासंगे गुलाबी थंडीत अशा चमचमत्या तार्‍यासंगे चांदण्यांच्या सावलीतही मनमौजेने नाचून राहे धुंद होऊनी फेर धरुनी रात रमलांची वाट पाहे जोर जसा हा वार्‍याचा मज घेऊन जाई अपुल्या संगे घेऊनी मिठीत अलगद अपुल्या प्रहराच्या स्वप्नात डुंबे अभयाचा हा उल्हास बेरका लाडाने मज फसवू पाहे मीही ठरवुनी खेळ खेळते डाव प्रेमाचे त्याच्यासहे भोळी अल्लड होते मीही जादूत पापण्यांच्या फसाया रूप मोहिनीतुनीही त्याच्या चपळतेने सोडवुनी घ्यावया मोहरूनी अशी प्रेमात धुंद उधळतेही पुष्प सुगंध सजवुनी सेज चांदण्यांची राजसा गुंतते हृदय तुडवुनी बंध
पूर्णिमा देसाई


वाचने 6287
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया


@पुर्णिमा देसाई

'राजसा'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर