भामरागड
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकाभामरागड

भामरागड...! गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम समजल्या जाणार्या या भागाबद्दल इतकी भीती आहे की कुणीही नवीन व्यक्ती तिथे जायला आधीच घाबरते. मी मे २०१७मध्ये भामरागड येथील लोक बिरादरी संस्थेत कामावर रुजू झालो आणि हळूहळू या जागेच्या प्रेमातच पडलो. मग काय तर...!! ही जागा आहेच मुळी तशी.
इथलं निसर्गसौंदर्य, हिरवंगार जंगल, सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर आणि स्वच्छ नदीकिनारा, नदीकाठची गुळगुळीत रेती, भिन्न-भिन्न जातींचे पक्षी आणि त्यांचे सुमधुर आवाज, पौर्णिमेचा चंद्र आणि अमावस्येच्या रात्री दिसणाऱ्या अगणित चांदण्या, नयनरम्य सूर्योदय आणि सूर्यास्त, लाकडी डोंग्याची सैर, विहंगम त्रिवेणी संगम, प्रेमळ आणि आपलंसं करून घेणारे माडिया-गोंड आदिवासी, आल्हाददायक पावसाळा आणि तुडुंब भरून वाहणार्या नद्या, पहाटेची थंडी या सगळ्याच गोष्टी मनाला भुरळ पाडणार्या आहेत. दोन वर्षांत भामरागडमध्ये खूप फिरलो. बर्याच जंगलवाटांची सायकलवरून भ्रमंती केली. माझी सावलीही ऋतूनुसार साथ सोडायची, पण माझ्या कॅमेऱ्याने मात्र कधीच दगा दिला नाही. तो सदैव सोबतच असायचा. मग काय...? बरेच फोटो, व्हिडिओ कॅमेर्यात कैद केले. डेव्हलपमेंटच्या नावाखाली पुढे कधीतरी हा भाग 'सो कॉल्ड स्मार्ट' होईल आणि इथल्या निसर्गसौंदर्याचा नाश होईल या भीतीने मी काही आठवणी डिजिटली जपून ठेवल्या. एक आठवण म्हणून काही निवडक क्लिप्स आणि फोटोज एकत्र करून हा व्हिडिओ बनवला आहे. खरं पाहता काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये भामरागडचं आख्खं सौंदर्य सामावणं अशक्यच आहे. मी काही प्रोफेशनल फोटोग्राफर नाही, त्यामुळे सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टीने व्हिडिओ त्या स्तराचा निश्चितच नाही. पण व्हिडिओ आपणा सर्वांना नक्कीच आवडेल आणि भामरागडची ओढ निर्माण करेल अशी आशा आहे.
.png)
वाचन
16124
प्रतिक्रिया
0