खूण आरती रानडे · Fri, 10/25/2019 - 06:00 · दिवाळी अंक मिपा दिवाळी अंक २०१९ अनुक्रमणिका खूण खूण ओळखीची, दावू कुणा कळेना माझ्याशिवाय कोणी, माझ्याकडे बघेना हातातुनी निखळला, आरसा मनीचा तुकड्यात चेहर्याचे प्रतिबिंब सापडेना घालून भूल गेला, नाद बासरीचा चकव्यात देह फिरतो, वाट आठवेना ओठात ओठ रुतता, चढली अशी खुमारी रात्री किती रमविल्या, शेजेसही स्मरेना घेऊन प्राण गेला, नाव गाव सुटले हृदयात साजणाच्या, जागा तरि मिळेना शेवटास उरली, राख आठवांची शिणली कुडी जिवाची, जळता परि जळेना अनुक्रमणिका वाचने 3544 वाचनखूण प्रतिक्रिया 4 वा, सगळ्या द्विपदी सुरेख यशोधरा Sat, 10/26/2019 - 13:56 वा, सगळ्या द्विपदी सुरेख जमल्या आहेत! Log in or register to post comments कविता आवडली!! अथांग आकाश Sun, 10/27/2019 - 00:57 कविता आवडली!! Log in or register to post comments कविता आवडली श्वेता२४ Fri, 11/08/2019 - 17:43 . Log in or register to post comments वा! वा! अलकनंदा Tue, 11/19/2019 - 13:51 वा! वा! Log in or register to post comments
वा, सगळ्या द्विपदी सुरेख यशोधरा Sat, 10/26/2019 - 13:56 वा, सगळ्या द्विपदी सुरेख जमल्या आहेत! Log in or register to post comments
वा, सगळ्या द्विपदी सुरेख
कविता आवडली!!
कविता आवडली
वा! वा!