Skip to main content

भाऊबीज

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोहडोळ्यात डोकावणारे मला पाहवेनात ते चेहरे गळाभेट होता स्वतःची स्वतःशी किती व्हायचे कावरेबावरे तुझा श्वास होई कुणाची रुबाई उसासा गझल अन मिठी स्पंदने कुणी ओठ ओठांत घ्यावेत अलगद कुणी उतरवावीत आभूषणे खुला केशसंभार रजनी कुणाची कुणा चोरटा स्पर्श तो आवडो कुणी फक्त यावे, कुस्करून जावे कळ्या सापडो वा फुले सापडो तुझी देहवीणा अशी कर्मयोगी सुरांची तिच्या व्हायची साधना मला सारखे हेच वाटायचे की बघ्याचीच माझी असे भूमिका ठरवले जरासे तुझे व्हायचे मी पहाटे पहाटे तुला भेटतो तुला ठेवतो चांदणे शुभ्र माझे तुझे विश्व माझ्याकडे ठेवतो

वाचने 5014
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कुणी फक्त यावे, कुस्करून जावे कळ्या सापडो वा फुले सापडो देवा... जोरात कळ आली वाचून..

अरर, चटका बसतो हो असलं वाचताना. कसला तो भाऊ नुसता बघ्या. :(

In reply to by यशोधरा

बेला, अत्यंत हृदयस्पर्शी कविता. यशो सारखेच म्हणते. (अवांतर- लिहित जा रे.. गायबच झाला आहेस.) स्वाती

तुझ्या डोहडोळ्यात डोकावणारे मला पाहवेनात ते चेहरे गळाभेट होता स्वतःची स्वतःशी किती व्हायचे कावरेबावरे
ह्यासाठी टाळ्या!!