Skip to main content

महिला बसमधील पुरुष कंडक्टर - अर्थात, जंबिया मधातला!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 31/10/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
. . मंदमंद पावडरी, लाडिकलाडिक लिपष्टिका छंदीफंदी अत्तरं, हलक्याहलक्या टवाळ्या तिन्ही ऋतू सातही वार, सगळ्या ड्युटया मारतो, एकपण खाडा करत नाही, महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही! नाजुकनाजुक पर्सा, मखमली पिशव्या झुळझुळीत साड्या, झिरझिरीत ओढण्या त्यांच्या रुमालातली नाजुक चिल्लर मी कधी मोजत नाही, महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही! गरोदर बाईला, ऐंशीच्या म्हातारीला शाळकरी पोरीला, कॉलेजच्या ताईला सगळ्यांना जागा मिळते, फुल्ल्ल असली बस तरी मी ष्टॉपला कट मारत नाही, महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही! सगळ्या मला दादा म्हणतात, मीही सगळ्यांना ताईच म्हणतो, पण पाचव्या शीटच्या, अबोलीच्या गजर्‍याला मी तिकीट कधी विचारीत नाही, महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही! .

वाचने 13765
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

In reply to by जव्हेरगंज

कसे का असेना.... आवडली तर! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

या कवितेवरुन आठवलं. फारा वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राची इच्छा, 'लेडीज टेलर' होण्याची होती. बिचारा, आता या जगांत नाही.

In reply to by तिमा

आम्च्या एका मिपाकर गुंठामंत्री (विथ कॉर्पिओ) मित्राचीसुध्धा अशीच इच्छा होती ;)

In reply to by टवाळ कार्टा

आमच्या एका मित्राची इच्छा शेणसार बोर्डाचा अध्यक्ष व्हावे अशी होती.

कविता छान आहे. पण कंडक्टरला 'जांबियाची' उपमा का द्यावीशी वाटली कळले नाही.