नमस्कार मित्रांनो
आपल्या अवतीभोवती दररोज असंख्य घटना घडत असतात. विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती, पर्यावरण, क्रीडा, तंत्रज्ञान, सामाजिक जीवन आणि मानवी कर्तृत्व अशा विविध क्षेत्रांतील काही घटना आपल्याला आनंद देतात, काही अस्वस्थ करतात, तर काही विचार करायला लावतात.
प्रत्येक महत्त्वाची गोष्ट राजकारणाशी संबंधित असेलच असे नाही. राजकारणापलीकडेही एक विशाल, वैविध्यपूर्ण जग आहे. त्यातील वेचक बातम्या, अनोख्या घटना आणि विचारप्रवृत्त करणारे विषय एकमेकांसमोर आणावेत, या हेतूने हा धागा सुरू केलेला आहे. आणि अजुन एक आवर्जुन खुलासा करतो की राजकारण हे काहीतरी वाईट्ट आहे महत्वाचं नाही अस काहीही यातुन सुचित करायचं नाहीये. पण त्यासाठी मिसळपाववर ऑलरेडी इतर धागे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामानाने अ-राजकीय (सुरुवातीला अराजकीय लिहिले होते नंतर चुक लक्षात आली आणि पुढचे अराजक टळले ते एक असो )मुद्दे बातम्या हे काहीसे वंचित दुर्लक्षित असे आहेत.
तर मुद्दा असा की कधी एखादी बातमी आपल्या मनात तरंग निर्माण करते. कधी आपण भारावून जातो, कधी एखादी विसंगती खटकते, तर कधी एखादा प्रश्न पडतो. मनात उमटलेले विचार, भावना किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी हे एक मोकळे व्यासपीठ बनावे अशी अपेक्षा आहे.
एखाद्या बातमीवर सभासदांनी मते मांडली, विचारांची देवाणघेवाण झाली आणि चर्चा रंगली, तर त्याचे नक्कीच स्वागत आहे. वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेणे, हे चर्चेचे सौंदर्य आहे.
मात्र चर्चा झालीच पाहिजे किंवा प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया आल्याच पाहिजेत, असा आग्रह नाही.
कधी एखादी बातमी वाचून केवळ आपली व्यक्तिगत प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटेल. एखाद्या घटनेने मनाला स्पर्श केला असेल किंवा एखादा विचार व्यक्त करावासा वाटेल. अशा वेळी आपले दोन शब्द लिहिणेही पुरेसे आहे. एखादी रंजक घटना, अनोखा शोध, प्रेरणादायी कहाणी किंवा साधेसे निरीक्षणही येथे मांडता येईल. प्रत्येक वेळी सखोल विश्लेषणाची अपेक्षा नाही
कधी संवाद, तर कधी केवळ स्वगत — दोन्हींचेही येथे मनःपूर्वक स्वागत आहे.
तर चला मित्रहो,
राजकारणाच्या गदारोळापलीकडच्या जगात डोकावू या!
बातम्या मांडू या, प्रतिक्रिया नोंदवू या, विचारांची देवाणघेवाण करू या किंवा केवळ मनात उमटलेले स्वगत शब्दांत व्यक्त करू या.
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1 अनुमोदन
अनुमोदन.
मिपाच्या संपादक मंडळास विनंती आहे की इथे येणारे राजकीय प्रतिसाद त्यांनी काढून टाकावेत. नाहीतर इथेही मिपाचे दोन्ही बाजूचे मल्ल राजकीय आखाडा सुरू करतील.
+१
In reply to +1 अनुमोदन by गिरा
>>>>मिपाच्या संपादक मंडळास विनंती आहे की इथे येणारे राजकीय प्रतिसाद त्यांनी काढून टाकावेत.
सहमत. च्यायला वात आणलाय राजकीय घडामोडींनी. अ-राजकीय घडामोडींवर लक्ष आहेच.
-दिलीप बिरुटे
( अराजकीय )
एक बातमी
मागच्या आठवड्यात एक बातमी आली आणि गेली. कदाचित फार कमी लोकांना ती समजली असेल (मराठी पेपरात आली होती)
ई मुद्रा कंपनीने आपला एस एस एल/टी एल एस सर्टिफिकेट विकण्याचा धंदा तडकाफडकी बंद केला. आपल्याला त्याचे महत्त्व कदाचित माहीत नसेल पण ही सर्टिफिकेट आपण रोज वापरतो . कोणत्याही आर्थिक गोष्टी जसे की ऑनलाईन बॅंक व्यवहार करताना ती वेबसाईट एचटीटीपीएस:// अशी दिसते तेच हे सर्टिफिकेट . ते विकणाऱ्या कंपन्यांना एक्सटर्नल सर्टिफिकेट ऑथोरिटी(सी ए) म्हणतात. ही सर्टिफिकेट सध्या कमीतकमी २५६ बिट असतात. पण ई मुद्रा ने विकलेली काही सर्टिफिकेट सिंगल किवा डबल डिजिट निघालि आणि उघडकीला आली. आता हे कसे झाले (लोकप्रिय कारण म्हणजे ईंटर्न्स मिस्टेक / नवशिक्याची चूक) तो भाग वेगळा. पण विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह लागल्याने तो व्यवसाय बंद करावा लागला. कंपनीची (आणि पर्यायाने भारतीय सी ए कंपन्यांची) बदनामी झाले ती झालीच.
You are welcome ची जागा No problem , No worries घेत आहे.
दिव्य मराठीच्या टाइम च्या हवाल्याने दिलेल्या बातमीत असे म्हटलेले आहे. की आता कोणी Thank you म्हटल्यास उत्तरादाखल जे सौजन्याने You are welcome म्हणण्याची जी पद्धत किंवा शिष्टाचार होता त्याची जागा नविन पिढीने रुजवलेल्या No problem , No worries ने घेतलेली आहे. आणि कदाचित लवकरच जुनं You are welcome कालौघात कदाचित नष्ट होइल. शिवाय जुन्या पिढीला हे फारसे आवडत नाही असे आढळलेले आहे. त्यांना कुणाला मदत केली तर तो problem आहे किंवा त्याच्याशी जोडावा हा दृष्टीकोण च थोडा अडचणीचा वाटतो वगैरे. आणि म्हणे मुळ इंग्रजीत सुद्धा हा शीष्टाचार नव्हता हे सौजन्य नॉर्मन फ्रेंच च्या ११ व्या शतकातील आगमना नंतर इंग्रजी भाषेत आले.
ही बातमी वाचल्यावर अनेक विचार तरंग मनात उमटले
एकतर आपल्या मराठीत किंवा भारतात आपण इन जनरल एकमेकाला धन्यवाद तर म्हणतो पण ( ते पण प्रमाण तसे कमीच म्हणावे तुलनेने ) त्यानंतर उत्तरादाखल चला मराठीत आपण काय म्हणतो ?
ठिक आहे ठिक आहे
बर बर असु दे
हे थोडं its all right ची आवृत्ती वाटते. पण मुळात आपल्याकडे धन्यवाद च कमी त्यावर हे जे काय उत्तर आहे ते ही कमी.
असे का असावे ?
आपला समाज बहुधा मुलत: व्यक्तीवादी नाहीये फारसा. म्हणजे औपचारीकता पण नाहीच . थोडा अघळपघळ आहे. रेल्वेत बस मध्ये जर तुम्ही पेपर वाचताय तर तुम्हाला न विचारता तुमच्या पेपर च पान घेणार वाचणार म्हणजे बिनधास्त मामला है. त्यात काय विचारायचं ?
एकमेकांत मिसळलेला अनौपचारीक समाज आहे बहुधा अर्थात हे प्रमाण ग्रामीण कडुन शहरी कडे सरकतांना घटत जाते शिवाय जुन्या कडुन नव्या पिढीकडे सुद्धा घटत जाते.
आणि ते You are welcome पेक्षा मला No problem आवडला. म्हणजे पहील्यात कसय की ये बाबा तु पुन्हा ताप द्यायला तु साला ऑलवेज वेलकम दुसर कस की ठिक हे बाबा दिया तुझे फेवर पण No problem ( पण यातही जबाब देनेवाला कौन हे त्याचा रोल मैटर करतोच की जसा दुकानदार आहे तर ठिक आहे वेलकम किंवा पुस्तक वह्या खाली पाडलेली मुलगी असेल तर वेलकमच वेलकम पण समजा दुसरी सिच्युएशन आहे तर वेलकम चा बैल मारुन घ्यायला कोणाला आवडत असेल ?
शिवाय अजुन एक आपले लोक एकुणच खडुस की तर आपलं बर आहे
ठिक आहे
असु दे
Thank you म्हटल्यानंतर…
In reply to You are welcome ची जागा No problem , No worries घेत आहे. by मारवा
Thank you म्हटल्यानंतर Anytime किंवा You bet असेही अमेरिकेत म्हटले जात होते.
आपण भारतीय औपचारिकतेच्या…
In reply to You are welcome ची जागा No problem , No worries घेत आहे. by मारवा
आपण भारतीय औपचारिकतेच्या बाबतीत मागे आहोत हे खरेच. मला स्वत:ला बोलताना कोणी थॅंक्यु म्हणाले तर काही विशेष वाटत नाही, तेच कोणी धन्यवाद म्हणाले तर असे वाटते आपण एवढे उपकार केले की काय यांच्यावर.
खरे तर It's my pleasure असे म्हणणे जास्त सुसंस्कृतपणाचे वाटते.
In reply to You are welcome ची जागा No problem , No worries घेत आहे. by मारवा
Thank you, Thanks यावर खरे तर It's my pleasure असे म्हणणे जास्त सुसंस्कृतपणाचे आहे.
पाहावे ते नवलचं 😅
नुकताच सोशल मीडियावर "मिशा असलेले नवजात बाळ" दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका अगदी लहान बाळाच्या ओठांवर प्रौढ व्यक्तीसारखी दाट आणि गडद काळी मिशी दिसत असल्याचा दावा केला गेला आहे. मात्र, तथ्य आणि मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडिओ खरोखरचा नसून डिजिटल तंत्रज्ञान किंवा एआय फिल्टर वापरून एडिट केलेला असण्याची दाट शक्यता आहे. वैद्यकीय विज्ञानानुसार, काही मुले शरीरावर मऊ आणि बारीक केसांसह जन्माला येतात, ज्याला 'लॅनुगो' म्हटले जाते, पण हे केस अतिशय फिकट असतात आणि जन्मानंतर काही दिवसांत गळून पडतात. त्यामुळे प्रौढांसारखी परफेक्ट आणि जाड मिशी घेऊन बाळ जन्माला येणे वैद्यकीयदृष्ट्या अशक्य आहे. इंटरनेटवर या व्हिडिओवर अनेक मजेशीर मीम्स बनवले जात असले, तरी सोशल मीडियावरील अंधश्रद्धा किंवा अफवांवर विश्वास न ठेवता हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाचा आणि डिजिटल एडिटिंगचा एक भाग आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
UAE चे राष्ट्रपती शेख…
UAE चे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी अबू धाबीतील समारंभात कॅप्टन स्मित मच्छर आणि flydubai च्या क्रूला 'फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद II' हा UAE चा सर्वोच्च नागरी सन्मान दिला, आणि त्यांना मिठी मारून गौरवले. हा सन्मान ३० सप्टेंबरच्या FZ1073 घटनेत त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी आहे.
रणबीर कपुर साई पल्लवी च्या रामायण चा आज अमेरीकेत प्रिमीयर झाला.
रणबीर कपुर , यश , साई पल्लवी आदी कलाकार असलेला आणि नितेश तिवारी ने दिग्दर्शीत केलेल्या रामायण या भव्य पटाचा प्रीमियर आज अमेरीकेत लॉस एन्जल्स येथे झाला. त्यावर ताज्या धारेच्या पहील्या प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झालेली आहे. या सर्व प्रतिक्रीया सकारात्मक आणि भारावुन गेलेल्या दिसतायत. बातमीची लिंक येथे.
https://ndtv.in/bollywood/ramayana-review-in-hindi-first-reactions-to-ranbir-yash-sai-pallavi-ramayana-out-here-what-people-are-saying-about-4000-crore-epic-12246447
एकुण या चित्रपटाचा युट्युब वर ट्रेलर बघितला तो तरी मला फार आवडला. अत्यंत भव्य दिव्य असा जबरदस्त विज्युअल एक्सपेरीयन्स मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल अशी आशा वाटते. शिवाय ए आर रेहमान चे म्युझिक म्हणजे डोळ्या बरोबर कानाला सुद्धा मेजवानीच.
आतापर्यत वैशिष्ट्ये या चित्रपटाची वाचली ती अशी की VFX , AI आदी तंत्रज्ञानाचा वापर सम्यकतेने ( बहुधा आधिचा रामायण पुन्हा पुन्हा बघुन चुका सुधारुन समजुन घेऊन केलेला आहे ) केलेला आहे असे म्हणतात. मानवीयता म्हणजे कार्टून किंवा कृत्रीम न वाटु देण्याची काळजी घेतलेली आहे. बाहुबली सारखा तंत्रमानवीसमन्व्यय साधलेला आहे.
बजेट जे ४००० करोड आहे ते जरी बॉलिवुडच्य आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक असले तरी ते दोन भाग अधिक मार्केटींग वगैरे मिळुन आहे तर ते थोडे तारतम्याने घ्यावे असे ही कुठे तरी बातमी वाचलेली. आता मला एक प्रश्न पडतो भारतीय एकुण १० च सिनेमे १००० प्लस करोड व्यवसाय केलेले आहेत त्यातही हिन्दी ५ तेलगु ४ कन्नड १ आणी त्यातील सर्वाधिक वाला पण २००० करोड क्रॉस करु शकला जो की दंगल तो ही लाइफटाइम कलेक्षन. म्हणजे १००० करोड क्रॉस यात तो आहेच. मग प्रश्न असा पडतो हा निर्माता जर पहीला भाग २००० करोड बजेट जरी धरला तर नफ्यात येण्यासाठी किमान २००० क्रॉस मारावा लागेल एकूण भले अवघड शिवधनुष्य रामापेक्षाही निर्मात्यांनी उचलण्याचा प्रयत्न केलाय.
टीकात्मक भागात आतापर्यंत दोन च आक्षेप वाचले एक साई पल्लवी सुंदर नाही सीता वाटत नाही वगैरे त्यापेक्षा रकुल प्रीत शुर्पणखा सीता घ्यायला हवी होती. पण मी जो ट्रेलर बघितला त्यात मला तरी साई पल्लवी अस्सल भारतीय सौंदर्य असलेली वाटली भासली. आता हे खुपच सब्जेक्टीव्ह असतं नेहमी. जुनी टीव्हीतली सीता ज्यांनी बघितली त्यांना ती प्रतिमा डोक्यात असते किंवा तुम्ही बघितलेल्या पारंपारीक बालपणापासुन मंदिरातील फोटोतील चेहरे जे तुमच्या अंतर्मनात रुतुन बसुन एक अनेकानेक एकमेकात मिसळुन एकसंघ प्रतिमा अपेक्षीत प्रतिमा त्याने सतत समोरील ताज्या चेहऱ्या बरोबर तुलना होत असते. यात कधी क्लीक होते कधी नाही.
मी पुस्तकां बाबतीत नेहमी अनुभवतो १०० इयर्स ऑफ सॉलिट्युड ही मार्क्वेझ ची अत्यंत आवडती कादंबरी मी वाचतांना वेगळीच व्हिज्युलाइज केलेली ( पण इथे माझी पाटी किंवा कॉनव्हास कोरा होता म्हणजे संदर्भासाठी प्रतिमा नव्हती) तर मी माझ्या कल्पनेने वेगळेच चित्र रंगवित होतो. मग नेटफ्क्लिक्स वर या कादंबरीवरील सीरीज आली तर कोण उत्सुकतेने मी बघितली तर एकदम विरुद्ध अनुभव म्हणजे मनचित्राशी बिलकुलच जुळली नाही. तर असे होत असावे
बघुया हा चित्रपट मोठ्या चित्रपट गृहात जाऊन मोठ्या पडद्यावर बघण्याची मजा घ्यायला मी उत्सुक आहे. ५ नोव्हेंबर ला भारतात येतोय.
आज टीव्हीवर एक बातमी ऐकली …
आज टीव्हीवर एक बातमी ऐकली
नॉईडा पंजाब नॅशनल बॅंकेत ग्रेतर नॉइडा शाखेत बऱ्याच खातेदारांच्या खात्यातील रक्कम / एफ डी वरील रक्कम गायब झालेली आढळली.
एका खातेदाराचा चेक बाउन्स झाल्याने त्याने चौकशी केल्यावर ही गोष्ट त्याच्या निदर्शनास आली.
‘Nothing left’: Rs 35 crore missing from accounts of PNB customers
असे साधारण ३५ ग्राहक आहेत.
PNB Greater Noida case: Rs…
In reply to आज टीव्हीवर एक बातमी ऐकली … by विजुभाऊ
PNB Greater Noida case: Rs 35 crore missing, 25 customers complain | Delhi News - The Indian Express
आमने सामने’ नाटकाच्या टीमचा…
आमने सामने’ नाटकाच्या टीमचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. केतकी पालव आणि रोहन गुजर यांनी व्हिडीओ शेअर करत निर्मात्यांनी या नाटकातून अचानक रिप्लेस केल्याचं सांगितलं. यानंतर लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी नाण्याची दुसरी मांडली. पण, शेवटी रोहन-केतकीने मानधनाचा आकडा सांगत पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणात आपली शेवटची बाजू प्रेक्षकांना सांगितली.
पण या भांडणात ते व्हिडिओ इन्स्टा व फेसबुकवर टाकत आहेत. ज्यात त्यांना भरपूर view मिळत आहेत. त्यामुळे ते याचं ठिकाणी लाखो कमवतील 😅
मला मंगेश कदम व लीना…
In reply to आमने सामने’ नाटकाच्या टीमचा… by Bhakti
मला मंगेश कदम व लीना भागवतांचे काम आवडत नाही. त्यामुळे त्यांची नाटके मी पाहत नाही.
मला रोहन केतकी चा व्हिडिओ आवडला.
In reply to आमने सामने’ नाटकाच्या टीमचा… by Bhakti
ते त्या व्हिडिओ मध्ये पण छान " नाटकं" करत आहेत असे वाटले.
परवा कुशल चा एक विडिओ होता मला पोहे खायला बोलावले आणि दिले नाही अपमान केला. तो मला पाहिल्यादा. खरा वाटला
केतकी आणि रोहन फारच मागे…
In reply to आमने सामने’ नाटकाच्या टीमचा… by Bhakti
केतकी आणि रोहन फारच मागे लागले आहेत. मला वाटतं परदेश दौरे करायला मिळतात म्हणून नाटकाला चिकटून राहिले. आणि आठ वर्षे फारच झाली. लीना भागवत स्वतः कलाकार म्हणूनच मंचावर राहिल्या आहेत. कितीतरी कामं बदललून टिकल्या. सध्या भाडिपाच्या कांदेपोहेमध्येही आहेत. प्रत्येक कलाकाराचा प्रतिस्पर्धी असतोच. वीस ते तीस वयानंतर नवीन कलाकार घेतले जाणारच. संगीत नाटकांत मात्र गाता येणे या बळावर जरा अधिक वयाच्या कलाकारांना प्रेक्षक चालवून घेतात. त्यांच्या बेढब दिसण्याकडे दुर्लक्ष करतात.
संगीत नाटकं आहेत आजच्या घडीला?
In reply to केतकी आणि रोहन फारच मागे… by कंजूस
संगीत नाटकं आहेत आजच्या घडीला?
म्हणजे प्रयोग वगैरे होतात का नियमित?
कदम, भागवत अनप्रोफेशनल वागले
In reply to केतकी आणि रोहन फारच मागे… by कंजूस
मानधन वाढवून द्यायचं नव्हतं हे ठीकच आहे; पण काहीही पूर्वकल्पना, नोटीस न देता असं अचानकच प्रयोग झाल्यानंतर, आधीही नाही, हा तुमचा शेवटचा प्रयोग होता असं सांगून काढून टाकणं हे खूप अनप्रोफेशनल आहे. मग तीन वेळा मधन वाढवून मागितलेलं असूदे नाहीतर दहा वेळा, त्याने काही असं रडेपणा करून तडकाफडकी काढून टाकणं justify होत नाही.
कदम, भागवत अनप्रोफेशनल वागले. योग्य प्रकारे नोटीस देऊन त्यांना निरोप देण्याइतपत व्यावसायिकपणा असू नये हे काही बरं नव्हे.
डाबर कंपनीने लेस्बीयन करवाचौथ ची जाहीरात विरोधानंतर मागे घेतली
डाबर या विख्यात कंपनीने आपल्या Fem Crème Bleach या प्रसिद्ध उत्पादनात एका लेस्बीयन जोडप्याला चित्रीत केले. या जाहीरातीचे व्हिडीयो कंपनीने अनेक सोशल मिडीया माध्यमातुन २३ ऑक्टोबर पासुन प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. या जाहीरातीला तीव्र विरोध करण्यात आला व हा आमच्या परंपरेचा अपमान आहे असे म्हटले गेले व एका नेत्याने कायदेशीर कारवाईची धमकी सुद्धा दिली. शेवटी कंपनीने माफीनामा जाहीर करत सदरची लेस्बीयन करवाचौथ दाखवलेली जाहीरात मागे घेतली.
बातमी ची लिंक
https://www.hindustantimes.com/india-news/dabur-pulls-out-ad-with-lesbian-couple-after-mp-minister-s-warning-101635188829270.html
जाहीरातीची लिंक
https://www.youtube.com/watch?v=W8RvKGXVLXg
माझ्यामते यात ग्लो वुइथ प्राइड हा शब्दप्रयोग फार कुशलतेने वापरला आहे. सहसा गे कम्युनिटी चे जे मार्च असतात त्याला प्राइड मार्च असे म्हटलेले असते. त्याचा संदर्भ इथे चपखल बसतो.
बाकी जाहीरात सुंदर बनवलेली होती राहु दिली असती.
डाबर ने रमजान / रमादान ह्या…
In reply to डाबर कंपनीने लेस्बीयन करवाचौथ ची जाहीरात विरोधानंतर मागे घेतली by मारवा
डाबर ने रमजान / रमादान ह्या काळातही अशीच जाहीरात काढावी. माझा पुर्ण पाठिंबा आहे.
गेला बाजार बैसाखी / कीरीस्ताव लोकांच्या नाताळातही अशी जाहीरात करायला हरकत नसावी.
ईसरो चे अभिनंदन. GSLV-F18…
ईसरो चे अभिनंदन.
GSLV-F18 या यानाने नाविक साठी दुसऱ्या आवर्तनाचा तिसरा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला.
या नवीन उपग्रहात भारताने बनवलेले ॲटोमीक घड्याळ आहे व ह्या उपग्रहाची भारताच्या सिमेपासुन १५०० किलोमीटर पुढे पाहण्याची व सेवा देण्याची क्षमता आहे.
FSSAI ने HIGH FAT, HIGH SUGAR, HIGH SALT या वॉर्नींग्ज
FSSAI ने HIGH FAT, HIGH SUGAR, HIGH SALT तसेच Highly Sweetened Beverage हे फुड पॉकेट्स वर छापण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. या प्रस्तावाचे Hindustan Unilever Limited ने नुकतेच स्वागत केलेले आहे. नविन प्रस्तावानुसार ज्या खाद्यपदार्थाच्या पॉकेट मध्ये साखर चरबी किंवा मिठा चे प्रमाण ICMR-National Institute of Nutrition च्या निर्देशांनुसार प्रमाणापेक्षा जास्त असेल तर अशा सर्व उत्पादनांवर वरील ४ प्रकारच्या वॉर्नींग्ज ( पुर्वी किमान २ घटक असले तर छापणे असे ठरले होते आता एकही आयटम क्रॉस झाला तर छापावे लागेल असा प्रस्ताव आहे )
ठळक लाल रंगात
न्युट्रीशन च्या नेहमीच्या लेबल पेक्षा मोठ्या फॉन्ट साइज मध्ये
Front-of-pack labelling (FOPL) सहज दिसेल असे समोर ( लपवा छपवी बुडावर झाकणावर इत्यादी नाही शोधा पाहु नही चलेगा )
देणे बंधनकारक राहील.
या प्रस्तावाचे वरील प्रसिद्ध कंपनीने सहर्ष स्वागत केलेले आहे.
जंक फुड खाणारा आता सिगरेट पिणारा जसा सुसाइड वुइथ फुल होशो हवास करतो तसे करेल
मी कुठलाही नशा पाणी न करता स्वेच्छेने सदरील जंक फुड सेवन करत आहे
बरे होइल फार फार चांगला प्रस्ताव आहे लवकरात लवकर अंमलात येवो ही सदीच्च्छा !
https://www.youtube.com/watch?v=9YA6WTvoP-g
तुम्हाला https://www.youtube.com/@Trustified-Certification हा चॉनेल माहीती आहे का ?
हा बऱ्याच प्रसिद्ध ब्रॉन्ड चे उत्पादनाचे प्रयोगशाळेत परीक्षण करुन घेतो आणि उत्पादकांनी केलेले दावे कितपत सत्य आहेत ते दाखवतो.
त्यांची परीक्षा घेउन पास फेल पण करतो माझा आवडता चैनल आहे
https://www.trustified.in/passandfail
Hindustan Unilever बातमी ची लिंक
In reply to FSSAI ने HIGH FAT, HIGH SUGAR, HIGH SALT या वॉर्नींग्ज by मारवा
https://www.magzter.com/stories/newspaper/The-Pioneer-Bhubaneswar/HUL-BACKS-FSSAI-LABELLING-NORMS-FOR-FOOD
इतर कोणत्याही कंपनी ने अजून तरी याचे स्वागत केलेले दिसले नाही.
अभिमानाची गोष्ट 👍
'द वर्ल्ड्स १०० बेस्ट म्युझियम्स २०२६' या जागतिक यादीत पटना येथील बिहार संग्रहालयाने जगभरात ९ वे स्थान आणि आशिया खंडात १ ले स्थान मिळवले आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये 'वर्थ अ जर्नी' ट्रॅव्हल गाइडने जाहीर केलेल्या या मानांकन यादीत स्थान मिळवणारे हे एकमेव भारतीय संग्रहालय आहे. या ऐतिहासिक कामगिरीत बिहार संग्रहालयाने न्यू यॉर्कचे 'मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट' (१० वा क्रमांक) आणि पॅरिसचे जगप्रसिद्ध 'लूव्र म्युझियम' (३१ वा क्रमांक) यांनाही मागे टाकले आहे. प्रख्यात जपानी वास्तुकलाकार फुमिहिको माकी यांनी डिझाइन केलेले हे संग्रहालय त्याच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्राचीन मौर्यकालीन शिल्पे (जसे की दीदारगंजची यक्षिणी) आणि बौद्ध-जैन इतिहासाशी संबंधित मौल्यवान वारशासाठी ओळखले जाते.
मी खूपदा ती दिदारगंज यक्षिनी/सुंदर ऑनलाईन पाहते. प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आता अजून वाढली आहे 😊
काल एक व्हिडीओ पहाण्यात आला…
काल एक व्हिडीओ पहाण्यात आला. चंदीगडमधल्या एका शाळेतल्या तिसरीतल्या मुलाने (वय 8) kg मधल्या (वय 4-5) मुलीला अत्यन्त अमानुषपणे मारहाण लाथाबुक्क्यानी केली. तो तेवढ्यावरच थांबला नाही तिचे डोकं अनेकदा बाकावर आपटलं. वर्गाबाहेर जाऊन एक वीट / कुंडी आणली आणि ती त्या मुलीचा डोक्यात मारली, पुन्हा पुन्हा.
मुलगी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडून राहिली. तरी हा मारतच होता.
शिक्षिका म्हणे करावाचौथसाठी मेहेंदी काढण्यात व्यग्र होत्या.
शिपायानेही वर्ग खोल्या न तपासताच त्या कुलूप लावून बंद केल्या आणि घरी निघून गेला.
संध्याकाळी जेव्हा लेक घरी आली नाही तेव्हा बाप लेकीला शोधत शाळेत आला. खिडकीतून आतलं चित्र पाहून तोच बेशुद्ध झाला.
मुलीला तातडीने प्रायव्हेट हॉस्पिटलला नेलं पण त्यांनी सरकारी दवाखान्यात न्यायला सांगितलं.
आज त्या मुलीचा शुद्धीवर आलेला व्हिडीयो पाहिला आणि जीवात जीव आला.
हे एवढ क्रौर्य त्या मुलात कुठून आलं असेल? व्हिडियो गेम्स? Tv सिनेमे?
त्या मुलासोबतच शाळेचे व्यवस्थापन आणि शिक्षकांवरही निष्काळजीपणासाठी खटला भरलाय
अत्यंत अस्वस्थ करणारी घटना.
In reply to काल एक व्हिडीओ पहाण्यात आला… by गणपा
अत्यंत अस्वस्थ करणारी घटना.