Skip to main content

आपण सारे...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 28/08/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
हा चर्चाविषय गेल्या आठवड्यात आलेल्या न्यूजवीक मधील एका लेखा संदर्भात आहे. लेखाचे शिर्षक होते: "We are all Hindus now". लेखिकेचे नाव आहे, "Lisa Miller". सर्वप्रथम ह्या लेखाचा दुवा आणि संक्षिप्त-स्वैर भाषांतर देण्याचे कारण हे "कसे आम्ही ग्रेट आहोत!" असे म्हणायचे नाही, याची खात्री असावी.
अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र आहे. २००८ च्या एका सर्वेक्षणाप्रमाणे ७८% जनता आजही स्वतःला ख्रिश्चन समजते (जरी ते आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक आकड्यापेंक्षा प्रमाण कमीच आहे)....मात्र तसेच नजीकच्या काळात घेतलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे, आपण ख्रिस्तीधर्मापेक्षा जास्त हिंदू मनाने विचार करू लागलो आहोत - देवाबद्दल, स्वतःबद्दल, एकमेकांबद्दल, आणि अनंताबद्दल. ऋग्वेदात म्हणले आहे, "सत्य जरी एकच असले तरी साधूसंत ते विविध प्रकारे सांगतात." हिंदू समजतात की देवाकडे जायचे अनेक रस्ते असू शकतात. येशू हा एक, महंमद हा दुसरा, (निव्वळ) योगसाधना हा तिसरा. सर्व समान आहेत आणि कुठलाच एक दुसर्‍यापेक्षा अधिक चांगला नाही. धार्मिक ख्रिस्ती व्यक्तीस असे कधीच शिकवले गेलेले नसते..." २००८ सालच्या प्यू सेंटरच्या सर्वेक्षणाप्रमाणे, ६५% जनता समजते की ईश्वराकडे जाण्याचे भिन्न मार्ग असू शकतात. चर्चच्या (चाकोरी) बाहेर अंतिम सत्य शोधणार्‍यांचे प्रमाण देखील वाढत आहे. २००९ च्या न्यूजवीकच्या सर्वेक्षणाप्रमाणे, २००५ मधे जे २४ % प्रमाण होते ते वाढून ३०%जनता स्वतःला धार्मिक म्हणण्यापेक्षा अध्यात्मिक समजू लागली आहे. प्रा. स्टिव्हन प्रोथेरो, बॉस्टन युनिव्हर्सिटी, यांच्या मते सहज विविध गोष्टी उपलब्ध असलेल्या प्रकारात हिंदू धर्म मोडतो. परीणामी ते भावते. "हे कर्मठपणा बद्दल नाही पण काय चालू शकतेया बद्दल आहे. चर्च मधे जाण्याचा फायदा असेल तर तो घ्या. योगशिक्षणाचा असेल तर ते घ्या, दोन्ही चालले तर काय उत्तमच!" अंत्यसंस्कारासंदर्भात पण दफनविधी सोडून एक त्रितियांश ख्रिश्चन हे आता दहनविधिकडे वळू लागले आहेत. हार्वर्ड विद्यापिठाच्या प्राध्यापिका डायना एक म्हणाल्या, "(धार्मिकतेपेक्षा) आध्यात्मिक (तत्वज्ञान) विचारांनी अनेकदा पुस्तकीपद्धतीने धार्मिक समजुतीं डोक्यात ठेवून वागणे कमी होते. तेंव्हा आता आपण सारे "ओम" म्हणूया." (मूळ इंग्रजी लेखाचा दुवा)
सुरवातीस म्हणल्याप्रमाणे चर्चेचा उद्देश हा "गर्वसे कहो.." म्हणूया असा नाही मात्र "ओम म्हणूया" असे म्हणायला काय हरकत आहे असे वाटते. आज हिंदू धर्म म्हणला की हिंदूनाच फक्त त्यातील कर्मकांडे आणि अंधश्रद्धा दिसणार, जातीयता आहे म्हणणार, देव-देवता दिसणार... फिलॉसॉफी बोलायला लागले तर यातले कुठले कधी झाले, कुठे झाले, मग गीता खरेच कृष्णाने सांगितली का वगैरे विचारत चर्चा करणार?... ह्यातील कुठलीच गोष्ट गैर आहे असे मला म्हणायचे नाही. पण जे चांगले आहे ते तसे आहे म्हणून आत्मसात करण्यात काय गैर आहे? जशी "मी हिंदू आहे" हे गर्वाने म्हणायची गरज नाही, तसेच त्यात काय केवळ लाजेने मान खाली घालायला लावण्यासारख्याच गोष्टी आहेत का? आज ह्या लेखिकेस तसेच त्यात उल्लेखलेल्या प्राध्यापकांना स्वत:ला हिंदू म्हणताना लाजही वाटत नाही, पॉलीटीकली इनकरेक्टही वाटत नाही आणि कुठल्याच देवाचा, कर्मकांडाचा उल्लेख अथवा व्यवहारात न आणता देखील हा हिंदू धर्मच वाटतो. आपण मग का कमी पडतो? का उद्या एखाद्या अमेरिकन अथवा युरोपिअन माणसाने सांगितले की मग सगळी लाज गळून पडणार?

वाचने 20147
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by निमीत्त मात्र

आणि मग मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू लोकांचे काय? तेही (कालौघात) हिंदू धर्मात समाविष्ट झालेले आहेत का? (जाड ठसा मी केला आहे) छ्या... मी कुठं तरी 'हिंदू धर्म' असं म्हटलं आहे का? यशोधरा यांनी मांडलेल्या मुद्यांचा* विचार करता, हिंदू ही संज्ञा जिओ-पॉलिटिकल आयडेंटिटी या अंगाने जाते असे माझे म्हणणे आहे. मी तिथं कुठंही धर्म हा विषय आणलेलाच नाही. धर्म ही जातकुळी हिंदू या शब्दाला जोडली नाहीत तर त्यात मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू वगैरेही समाविष्ट होतील, पण कालौघात. अर्थात, इथे कालौघात हा शब्द फसवा आहे. कारण काळाच्या ओघात हिंदू हा शब्दच मुळी वैदिक धर्मासाठी अप्रोप्रिएट झालेला दिसतोय. बाकी चर्चा चालू द्या. *यासाठीचा संदर्भ त्यांनी द्यायला हवा होता.

शाहरुखसाहेब, माझ्या मते जो माणूस भारताला "पहिला देव" (देवासारखा) मानतो तो भारतीय, मग तो घरी कुठल्याही देवाची पूजा वा प्रार्थना करो. भारतीयत्व ही सार्वजनिक किंवा राष्ट्रीय निवड असून धर्म ही वैयक्तिक निवड आहे. त्या दृष्टीने मी श्री. ए. पी.जे. अब्दुल कलाम याना सच्चा भारतीय मानतो. यावरून आपल्याला पुरेसा बोध झाला असेल व आपल्या डोक्यातला जाळ विझला असेल अशी आशा आहे. ते. रा.

In reply to by तेन्नालीराम

सुंदर, अतीशय सुंदर युक्तिवाद, तेन्नाली-जी.जीते रहो! मी पण अब्दुल कलाम यांना दैवतच मानतो व त्यांच्याबद्दल खूप अभिमानही आहे. केवढे उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रपती म्हणून निवडून द्यायला पाहिजे होते! ते राष्ट्रपती असतांना इथे जकार्ताला एंबसीत त्यांची व्याख्याने आपले राजदूत वाचून दाखवायचे. ती भाषणे कुठे व त्या आधीच्या किंवा नंतरच्या राष्ट्रपतींची भाषणे कुठे? एपीजे अगदी "इंद्राचा ऐरावत"च होते. व्वा भाई व्वा! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

१. हिन्दु धर्म हा एक स्वतन्त्र धर्म नसून अनेक सम्प्रदाया.म्चे व धर्मांचे मिश्रण आहे. प्राचीन भारतात शिव पूजक असा शैव धर्म होता.. ( आपण याला आज सम्प्रदाय म्हणतो.) शन्कर व पार्वती हे मुख्य दैवत, लिन्ग पूजा, शोडष्पचार मूर्तीपुजा करणे, म्रूत्यू नन्तरचे जीवन, ८४ लक्ष योनी, त्यात फिरणारा आत्मा या सन्कल्पना याच धर्मातल्या. २. याच्या इतकाच जुना दुसरा प्रमुख धर्म म्हणजे 'वैदिक धर्म' . हा आर्यांचा धर्म... हा मुळचा भारतातला की उत्तर ध्रुवावरचा हा मुद्दा आता विचार करण्याचे आता कारण नाही... इन्द्र, वरूण, मित्र, सविता,प्रजापती, भग, पूषण, रुद्र, आश्विनी अशा काही यातल्या देवता... मुळात या देवता निराकार असल्याने त्यान्च्या मूर्ती, देवळे न्व्हती... यज्ञ रुपात उपासना होती, ८४ लक्ष योनी- फिरणारा आत्मा वगिरे सन्कप्लना मात्र या धर्मात नव्हत्या.. तीर्थक्षेत्र ही सन्कल्पना नव्हती.. मूळ धर्म ग्रन्थ तीन वेद... रुग, यजु, साम ३. याखेरीज ब्रम्हदेव, मूर्तीरुप विष्णू व लक्ष्मी, गणपती, दत्त... याना मानणारे असे अनेक छोटे छोटे सम्प्रदाय ( की धर्म?) होते. ४. वर्षानु वर्शे हे सम्प्रदाय- धर्म आपापसात भान्डत होते.... व्यासानी जेन्व्हा पुराणे लिहिली ( सन्कलीत केली) तेन्व्हा मुख्य उद्देश होता... सगळे मिळून एक्सन्ध एक धर्म करणे.... यात वैदिक देवाना सारख्या अशा देवतान्चा प्रामुख्याने विचार झाला... प्रजापती= ब्रह्मा, वैदिक विष्णू= मूर्तीरूप विष्णू, रुद्र= शिव ... अशा सन्कल्पनातून मूळ वैदिक देव बाजूलाच राहिले... वेद देखील बाजूला राहिले.... वेदातील काही रुचा या यान्चे स्तवन करताना वापरल्या जाऊ लागल्या आणि मूर्ती व देवळे मात्र मूर्ती पूजक धर्मातून उचलले गेले... हे सर्व पौरोहित्य करणारे ब्राह्मण मात्र मूळचे वैदिक... अशा प्रकारे धेडगुजरी पुराणोक्त हिन्दु धर्म तयार झाला.... अथर्ववेद हा साधारण याच काळात झाला.. त्यात दोन्ही धर्मान्चे मिश्रण स्पष्ट दिसते... त्यामुळे अथर्ववेदाला पूर्वी वैदिक धर्मात स्थान नव्हते.. तेन्व्हा चतुर्वेद नव्हते--- वेद त्रयी ही सन्कल्पना होती.. गणपती अथर्व शीर्शात हे पहायला मिळते... एकीकडे मूर्ती रूप गणेशाचे वर्णनही आहे. आणि त्याच वेळी तू ब्रह्म, इन्द्र, विष्णू, अग्नि, रुद्र, वायू, सूर्य, चन्द्र आहेस, असेही लिहिलेले आढळते.. ५. पण व्यासानी जरी दोन धर्म मिसळले असले, तरी त्यापूर्वीही अनेकानी दोनी धर्मान्चा आदर केलेला दिसून येतो... उदा : राम- अश्व्मेध यज्ञ- वैदिक परम्परा... रामेश्वर लिन्ग स्थापना- शैव परम्परा... ६. आज सावरकरानी केलेली हिन्दु धर्माची व्याख्या वापरली जाते... ७. त्यामुळे हिन्दु धर्माला एक ईश्वर, एक पुस्तक, एक प्रेशीत असा प्रकार नाही... याचा गैर फायदा घेऊन 'इतर धर्माचे लोक' हिन्दु धर्माला एक पुस्तक नाही, एक प्रेशीत नाही.. त्याची व्याख्या नाही अशा कुटाळक्या करत असतात... पण त्याचा विचार करण्याचे कारण नाही... धर्म ठरव्ण्यासाठी या सगळ्या गोष्टी एक एक च असाव्यात असा कुठेही नियम नाही...

प्यारे-जी, सुरेख! आपली विधाने बरोबर आहेत कीं नाहींत (accuracy of statements) हे माहीत नाहीं , पण एकंदरीत आपला युक्तिवाद/मुद्दा आवडला. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

माझी विधाने माझ्या मते बरोबरच आहेत... अनेक पुस्तकांचा सन्दर्भ यात आहे.... १. हिन्दु धर्माचे शैव रहस्य .. लेखक सन्जय सोनावणी ( या पुस्तकातील वेद विरोधी -ब्राम्हण विरोधी सूर मात्र पटणारा नाही... इतर इतिहास समजून घ्यायला चान्गले पुस्तक.) २. सनातन प्रभात ची देवता विज्ञान आणि हिन्दु देवता यावरची पुस्तके वाचा.. त्यातील उल्लेख : देवता निर्मिती बाबत ४ काळ आहेत : १. वेद कालीन - देवता अमूर्त होत्या.. देव या निसर्गातील शक्ती असून त्या उदर निर्वाह चालवत असतात.. २. ब्राम्हणे आरण्यके- देवाना मानवी भावना मिळाल्या... उदा देव कोपतो.. देव आनन्दतो... ३. उपनिशदे- देवाना मूर्त शरीर मिळाले... ४. पुराणे- देव पूर्णपणे माणसाळले... त्यांची लग्ने झाली.. त्याना मुलेही झाली.. ( रेशन कार्ड चा पुरावा माझ्याकडे नाही , क्षमस्व !) म्हणजे त्यान्च्या मते अमूर्त ते मूर्त देव हा एकाच धर्माचा प्रवास आहे... पण काही लोकान्च्या मते अमूर्त देव मानणारे आणि मूर्त देव मानणारे हे दोन स्वतन्त्र धर्म होते.... मला देखील असेच वाटते.... ऋग्वेदात शन्कराचा किती तरी ठिकाणी शिस्न देव, लिन्ग देव असा निर्भत्सना पूर्वक उल्लेख आहे, तो यज्ञात येऊ नये अशी अग्नीला प्रार्थना आहे.. ... आणि रुद्राचा मात्र आदर पुर्वक उल्लेख आहे.. म्हणजे शिव व रुद्र वेगळे, हे नक्की... ( त्या काळात) शैव लोक हे यज्ञ विरोधी लोक होते... म्हणूनच शन्कराचे एक नाव स्मरारी आहे.. म्हणजे यज्ञाचा नाश करणारा... ( अर्थात हा नाश शन्कर नव्हे तर त्या धर्मातील लोक करत होते हे सान्गणे नको!) टिळकान्च्या आर्क्टिक होम ऑफ वेदाज मध्ये ही काही उल्लेख आहेत... पूर्वी प्रजापती, विष्णू, रुद्र हे त्रि देव होते आणि ते अनुक्रमे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा यान्चे प्रतिक होते... ( रुद्र = रडवणारा... त्राही माम करणारा) कालान्तराने ब्रम्हा, विष्णू, महेश आले... तेव्हा आज रुद्राच्या जागी शन्कर हा समानार्थी शब्द झाला.. ब्रम्हदेवाला मानणारा सम्प्रदाय देखील ५ तोन्डाचा ब्रम्हदेव मानत होता ... तेव्हा वेद तर ३ होते... म्हणजे 'तो' ब्रह्म्देव आणि वेद याण्ची सान्गड बसत नाही... आज मात्र आपण चार तोन्डे चार वेदान्चे प्रतिक मानतो... वेदात ब्रह्म आणि ब्रह्मदेव असे दोन्ही उल्लेख आहेत, पण ते विश्व या अर्थाने... चार मुखे आणि चार वेद यान्चा उल्लेख ( बहुधा ) नसावा... एका पुराणकथेत शन्कराने त्याचे पाचवे तोन्ड उडवले असा उल्लेख आहे... सध्या त्यामुळे चार मुखान्चा ब्रम्हदेव आपण मानतो... विष्णू हा ऋग्वेदात आदित्याचे मूर्त रूप मानला जातो.. ( दोघाना आजही नारायण हा कॉमन शब्द आहे ! ) तेज आणि तीन पावलात तीन लोक पादाक्रान्त करणारे,पालन पोषण करणारे ... हे त्यान्चे कॉमन फॅक्टर्स ! इन्द्र या पर्जन्य देवतेला सहाय्य करणारा असे त्याचे स्वरूप होते... वेदात विष्णूच्या नावाने फारशी सुक्ते नाहीत.. कारण इन्द्र हा पर्जन्य देवता आणि निसर्गातील अन्नसाखळीचा निर्माता म्हणून अधिक महत्वाचा आहे.. विष्णू एक उप देव होता.. सन्ध्ये मध्ये म्हणूनच विष्णूचे नाव उपेन्द्र म्हणून येते.. विष्णू लक्ष्मी हे व्यापार करणार्‍या लोकानी वाढवलेले दैवत... पुराणोत्तर काळात विष्णू हे दैवत अधिक लोकप्रिय झाले... वेदकालीन लोक मूर्ती पूजक नव्हते आणि अचानक आपला धर्म मूर्ती पूजक कसा झाला हा किडा माझ्या डोक्यात अडीच वर्षे वळवळत होता... त्यातून त्यादृष्टीने मी मुद्दाम सन्दर्भ गोळा केले... या बदलामुळे आपण वेद वान्गमयाला मात्र पारखे झालो, हा मात्र माझा पक्का समज झालेला आहे... मला तरी वेद आणि अमूर्त निसर्गदेवता अधिक भावल्या.. अर्थात ३३ कोटीपैकी आपण काय निवडावे हा चॉईस आपल्याला आहेच की ! थोडक्यात, अमूर्त देव ते मुर्ती रुप देव हा हिन्दुन्चा प्रवास आहे... हा धर्म एकच की मिश्रण हा तसा वादाचा मुद्दा आजही आहेच.. यजुर्वेद सान्गतो : न तस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद यशः ( ज्याचे नावच इतके मोठे आहे, त्याची प्रतिमा असू शकत नाही.. ) गम्मत म्हणजे काही लोक याच वाक्याचा अर्थ लावतात : नतस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद यशः ( ज्याचे नावच मोठे आहे, त्याची नत म्हणजे नम्र माणसाने प्रतिमा करावी !) आणि इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मानी मात्र याच काळात मूर्ती रूप देव ते अमूर्त देव असा प्रवास केलेला आढळतो... हजारो वर्षे मूर्ती न बसवणारे वैदिक हिन्दु मूर्त्या आणि देवळे उभारायला लागले.. आणि मूळच्या मूर्ती पूजक रोमन संस्कृतीत निर्माण झालेले मुस्लीम मात्र मुर्ती नसणार्‍या मशिदी उभारायला लागले, हे सगळे गूढ आणि चमत्कारीक आहे..

Accuracyबद्दलचा माझा कॉमेंट माझ्या अज्ञानामुळे होता, आपल्या नाहीं. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.