हा चर्चाविषय गेल्या आठवड्यात आलेल्या न्यूजवीक मधील एका लेखा संदर्भात आहे. लेखाचे शिर्षक होते: "We are all Hindus now". लेखिकेचे नाव आहे, "Lisa Miller".
सर्वप्रथम ह्या लेखाचा दुवा आणि संक्षिप्त-स्वैर भाषांतर देण्याचे कारण हे "कसे आम्ही ग्रेट आहोत!" असे म्हणायचे नाही, याची खात्री असावी.
अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र आहे. २००८ च्या एका सर्वेक्षणाप्रमाणे ७८% जनता आजही स्वतःला ख्रिश्चन समजते (जरी ते आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक आकड्यापेंक्षा प्रमाण कमीच आहे)....मात्र तसेच नजीकच्या काळात घेतलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे, आपण ख्रिस्तीधर्मापेक्षा जास्त हिंदू मनाने विचार करू लागलो आहोत - देवाबद्दल, स्वतःबद्दल, एकमेकांबद्दल, आणि अनंताबद्दल. ऋग्वेदात म्हणले आहे, "सत्य जरी एकच असले तरी साधूसंत ते विविध प्रकारे सांगतात." हिंदू समजतात की देवाकडे जायचे अनेक रस्ते असू शकतात. येशू हा एक, महंमद हा दुसरा, (निव्वळ) योगसाधना हा तिसरा. सर्व समान आहेत आणि कुठलाच एक दुसर्यापेक्षा अधिक चांगला नाही. धार्मिक ख्रिस्ती व्यक्तीस असे कधीच शिकवले गेलेले नसते..." २००८ सालच्या प्यू सेंटरच्या सर्वेक्षणाप्रमाणे, ६५% जनता समजते की ईश्वराकडे जाण्याचे भिन्न मार्ग असू शकतात. चर्चच्या (चाकोरी) बाहेर अंतिम सत्य शोधणार्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. २००९ च्या न्यूजवीकच्या सर्वेक्षणाप्रमाणे, २००५ मधे जे २४ % प्रमाण होते ते वाढून ३०%जनता स्वतःला धार्मिक म्हणण्यापेक्षा अध्यात्मिक समजू लागली आहे. प्रा. स्टिव्हन प्रोथेरो, बॉस्टन युनिव्हर्सिटी, यांच्या मते सहज विविध गोष्टी उपलब्ध असलेल्या प्रकारात हिंदू धर्म मोडतो. परीणामी ते भावते. "हे कर्मठपणा बद्दल नाही पण काय चालू शकतेया बद्दल आहे. चर्च मधे जाण्याचा फायदा असेल तर तो घ्या. योगशिक्षणाचा असेल तर ते घ्या, दोन्ही चालले तर काय उत्तमच!" अंत्यसंस्कारासंदर्भात पण दफनविधी सोडून एक त्रितियांश ख्रिश्चन हे आता दहनविधिकडे वळू लागले आहेत. हार्वर्ड विद्यापिठाच्या प्राध्यापिका डायना एक म्हणाल्या, "(धार्मिकतेपेक्षा) आध्यात्मिक (तत्वज्ञान) विचारांनी अनेकदा पुस्तकीपद्धतीने धार्मिक समजुतीं डोक्यात ठेवून वागणे कमी होते. तेंव्हा आता आपण सारे "ओम" म्हणूया." (मूळ इंग्रजी लेखाचा दुवा)सुरवातीस म्हणल्याप्रमाणे चर्चेचा उद्देश हा "गर्वसे कहो.." म्हणूया असा नाही मात्र "ओम म्हणूया" असे म्हणायला काय हरकत आहे असे वाटते. आज हिंदू धर्म म्हणला की हिंदूनाच फक्त त्यातील कर्मकांडे आणि अंधश्रद्धा दिसणार, जातीयता आहे म्हणणार, देव-देवता दिसणार... फिलॉसॉफी बोलायला लागले तर यातले कुठले कधी झाले, कुठे झाले, मग गीता खरेच कृष्णाने सांगितली का वगैरे विचारत चर्चा करणार?... ह्यातील कुठलीच गोष्ट गैर आहे असे मला म्हणायचे नाही. पण जे चांगले आहे ते तसे आहे म्हणून आत्मसात करण्यात काय गैर आहे? जशी "मी हिंदू आहे" हे गर्वाने म्हणायची गरज नाही, तसेच त्यात काय केवळ लाजेने मान खाली घालायला लावण्यासारख्याच गोष्टी आहेत का? आज ह्या लेखिकेस तसेच त्यात उल्लेखलेल्या प्राध्यापकांना स्वत:ला हिंदू म्हणताना लाजही वाटत नाही, पॉलीटीकली इनकरेक्टही वाटत नाही आणि कुठल्याच देवाचा, कर्मकांडाचा उल्लेख अथवा व्यवहारात न आणता देखील हा हिंदू धर्मच वाटतो. आपण मग का कमी पडतो? का उद्या एखाद्या अमेरिकन अथवा युरोपिअन माणसाने सांगितले की मग सगळी लाज गळून पडणार?
वाचने
20147
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
छ्या...
In reply to आणि मग by निमीत्त मात्र
जो माणूस भारताला "पहिला देव" (देवासारखा) मानतो तो भारतीय
जीते रहो!
In reply to जो माणूस भारताला "पहिला देव" (देवासारखा) मानतो तो भारतीय by तेन्नालीराम
१. हिन्दु
सुरेख
माझी
माझा कॉमेंट माझ्या अज्ञानामुळे होता